Agriculture News in Marathi Of damaged farmers The silence of the people's representatives for help | Agrowon

यवतमाळ :नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या  मदतीसाठी लोकप्रतिनिधींचे मौन 

टीम अॅग्रोवन
शनिवार, 23 ऑक्टोबर 2021

परतीच्या पावसाने खरीप पिकांची नासाडी झाली. पावसाने शेतीची दाणादाण केली असल्याने शेतकरी निःशब्द झाला आहे. शेतकरी आस्मानी संकटात असतानाच लोकप्रतिनिधींनी मात्र मौन पाळले आहे.

आर्णी, यवतमाळ : परतीच्या पावसाने खरीप पिकांची नासाडी झाली. पावसाने शेतीची दाणादाण केली असल्याने शेतकरी निःशब्द झाला आहे. शेतकरी आस्मानी संकटात असतानाच लोकप्रतिनिधींनी मात्र मौन पाळले आहे. अतिवुष्टीने नुकसान झाले तरीही शासकीय मदत मिळण्यासाठी खासदार, आमदारांनी कोणतेही प्रयत्न केले नाहीत. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी याकरीता कोणीही पुढे न आल्याने संकटातल्या शेतकऱ्यांचा वाली कोण, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. 

शेतकऱ्यांना मदतीसाठी ना सत्ताधारी, ना विरोधक कोणीच बोलण्यास तयार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भरपाईबाबत अस्वस्थता निर्माण झाली आहे. आर्णी तालुक्‍यात अतिवृष्टीने सोयाबीन कापसासह भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. मोठ्या कष्टाने पिकविलेल्या पिकांचा आता काढणीचा हंगाम सुरू झाला होता. मागील पंधरा दिवसांपूर्वी सुद्धा पावसाने कहर केला होता. ऐन काढण्यासाठी आलेला शेतमाल भिजला. जणू हातातोंडाशी आलेला घास हिरावला, अशी परिस्थिती पाहायला मिळत आहे. गेल्या वर्षीसुद्धा परतीच्या पावसाने पिकांची नासाडी केली होती.

या वर्षी ही निसर्ग कोपला. शासनाने अजूनही मदतीबाबत धोरण न आखल्याने दिवाळीसाठी लागणाऱ्या पैशाची सोय कशी करावी, या विवंचनेत शेतकरी आहेत. दुसरीकडे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी देखील अशा नैसर्गीक संकटात शेतकऱ्यांची साथ सोडल्याचा आरोप होत आहे. शिवारातील नुकसानीची दखल घेण्यासाठी आमदार, खासदार यापैकी कोणीच फिरकले नाही. नेत्यांची ही असंवेदनशीलता देखील शेतकऱ्यांच्या जिव्हारी लागली आहे.

पावसामुळे शिवारातील कापसाची बोंड सडली तर सोयाबीनला कोंब फुटले काही ठिकाणी शेतकऱ्यांनी पावसाच्या भीतीने सोयाबीनची काढणी आणि मळणी केली. परंतु अचानक आलेल्या पावसाने सोयाबीनचे ढीग भिजून नुकसान सोसावे लागले आहे. 


इतर बातम्या
जळगाव जिल्ह्यात बोंडअळीचा उद्रेकजळगाव ः जिल्ह्यात यंदा शेतकऱ्यांना अतिवृष्टीने...
राज्यात पावसाला पोषक हवामान पुणे : राज्याच्या किमान तापमानात आणखी घट झाल्याने...
पावसाला पोषक हवामानामुळे किमान तापमानात...पुणे : पावसाने उघडीप दिल्यानंतर राज्याच्या किमान...
वीजप्रश्नी संतप्त शेतकरी  महावितरण...नाशिक : महावितरण कंपनीकडून सटाणा तालुक्यात थकीत...
कापूस खेडा खरेदी करणाऱ्या ...बुलडाणा ः खेडा खरेदीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना...
कडुलिंबाची झाडे वाळू लागली पुणे नगर ः नगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील...
राज्यातील १२१ आदिवासी  आश्रमशाळा होणार...पुणे ः शिक्षण व्यवस्थेमधील बदलांना सामोरे जात...
लाल कांद्याला उन्हाळच्या  तुलनेत मिळतोय...नाशिक : दिवाळीनंतर जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार...
नगर पंचायतींच्या निवडणुकांची रणधुमाळी...पुणे नगर ः राज्यातील मुदत संपलेल्या परंतु,...
सत्तावीस हजार सहकारी संस्थांच्या ...पुणे ः राज्यातील कृषी पतसंस्था, बहुउद्देशीय...
‘बेरीज् एक्सलन्स सेंटर’ उभारणीसाठी ...सातारा ः स्ट्रॅाबेरी मातृ रोपांवरील आयात शुल्क...
शेतकरी उत्पन्न दुपटीच्या बैठकीला २३... नवी दिल्ली ः संसदेच्या कृषी विषयक स्थायी...
दिवाळी सुटीनंतरच्या बेदाणा  सौद्यात...सांगली ः दिवाळीच्या सुटीनंतर सांगली कृषी उत्पन्न...
स्टॉक लिमिटला नकार;  सोयाबीन बाजाराला...पुणे ः राज्य सरकारने सोयाबीनवर स्टॉक लिमिट लावणार...
भात खरेदीच्या जाचक अटीतून शेतकऱ्यांना...सिंधुदुर्गनगरीः ज्या शेतकऱ्यांच्या सात-बारामध्ये...
बीज प्रक्रियेसाठी यंत्राचा वापर वाढलावाशीम : शेतकऱ्यांमध्ये बीजप्रक्रियेचे महत्त्व...
सांगलीत कृषिपंपांची वीजजोड तोडणी सुरुसांगली ः कृषिपंपांच्या वीज बिल वसुलीसाठी...
सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचे तीन...पुणे ः सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या...
फेरफार नोंदीत पुणे जिल्हा आघाडीवरपुणे ः शेत जमिनी खरेदी विक्री दरम्यान अंत्यत...
सोलापूर जिल्ह्यात खरिपातील पीक ...सोलापूर ः सोलापूर जिल्ह्यात यंदाच्या खरीप...