agriculture news in marathi Damaged in Khamaswadi There will be site inspections of crops | Agrowon

खामसवाडीत नुकसानग्रस्त पिकांची होणार स्थळपंचनामे

टीम अॅग्रोवन
रविवार, 28 फेब्रुवारी 2021

खामसवाडी, जि. उस्मानाबाद : परिसरात १९ फेबुवारी रोजी झालेल्या पावसाने रब्बी पिकांचे नुकसान होताच ७२ तासांच्या आत १६०० शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे तक्रार अर्ज सादर केले.

खामसवाडी, जि. उस्मानाबाद : परिसरात १९ फेबुवारी रोजी झालेल्या पावसाने रब्बी पिकांचे नुकसान होताच ७२ तासांच्या आत १६०० शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे तक्रार अर्ज सादर केले. त्याची दखल घेत २६ फेब्रुवारी रोजी बजाज विमा कंपनीच्या प्रतिनिधींनी तक्रारदार शेतकऱ्यांकडून कागदपत्रे घेतली. दोन दिवसांत पिकांची प्रत्यक्ष पाहणी करून स्थळपंचनामे करण्यात येतील, अशी माहिती त्यांनी दिली. 

रब्बी २०१९ व खरीप २०२० चा पीक विमा मिळाला नाही. नुकसान झाल्यापासून ७२ तासाच्या आत संबंधित पीक विमा कंपनीला नुकसानीची माहिती देण्याची अट आहे. या अटीमुळे  ८० ते ९० टक्के शेतकऱ्यांना विमा मिळाला नाही. शासनाने नुकसानी पोटी हेक्टरी दहा हजार रुपये दोन हेक्टरपर्यंत जाहीर केले होते.

खामसवाडीत २७०० खातेदार शेतकरी आहेत. पैकी ११०० शेतकऱ्यांनी नुकसानीसाठी तलाठ्याकडे अर्ज केले. ज्यांनी अर्ज केले त्याच शेतकऱ्यांना दोन टप्प्यात दहा हजार मिळाले. बाकीचे वंचित राहिले. पुन्हा ४०० शेतकऱ्यांनी अर्ज केले. त्यांना काहीच मिळाले नाही. 

शेतकऱ्यांची तत्काळ कार्यवाही

विमा कंपनी व शासनाच्या जाचक अटीमुळे त्रस्त २१०० शेतकऱ्यांनी सावध भूमिका घेत अवकाळी पावसाने नुकसान होताच २६ फेब्रुवारीपर्यंत तलाठी कार्यालयास अर्ज सादर केले. बजाज विमा कंपनीस १६०० विमाधारक शेतकऱ्यांनी तक्रार केली.  

त्यानंतर कंपनीचे दोन प्रतिनिधींनी विमा संबंधित कागदपत्रे घेतली. दोन दिवसांत प्रत्यक्षात पिकांची पाहणी करून स्थळ पंचनामे कंपनीस पाठविणार आहे, असे त्यांनी सांगितले.


इतर ताज्या घडामोडी
नांदेडमध्ये ४२ हजार ६४९ क्विंटल हरभरा...नांदेड : जिल्ह्यात किमान हमी दरानुसार सुरू...
व्हर्च्युअल क्लासरूममुळे कृषी शिक्षणाची...नगर ः व्हर्च्युअल क्लासरूम आणि अॅग्री-दीक्षा वेब...
‘एमआरपी’नुसारच खतांची खरेदी करावी सोलापूर ः यंदाच्या खरीप हंगामाच्या पार्श्‍वभूमीवर...
खरीप हंगामासाठी ११४० कोटी रुपये पीककर्ज...अकोला : अकोला जिल्ह्यात या खरीप हंगामासाठी ११४०...
सटाणा बाजार समिती आवाराबाहेर अवैध...नाशिक : सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काही...
नाशिक जिल्ह्यात विहिरींनी गाठला तळ नाशिक : जिल्ह्यात गत मॉन्सूनमध्ये अनेक भागांत...
भोकरखेडात चार वर्षांपासून शेतकरी वीज...वाशीम : शेतात वीज जोडणी घेऊन सिंचन करता येईल....
टेंभू योजनेचे पाणी सोडले; ‘बंदिस्त पाइप...आटपाडी, जि. सांगली : आटपाडी तालुक्‍यात टेंभू...
प्रत्येक गावाचा होणार कृषी विस्तार...जालना : कृषी विभागाच्या वतीने खरीप हंगामाचे...
तमाशा कलावंतांसाठी सरसावले मदतीचे हात नगर ः : कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे टाळेबंदी...
पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत चुरस सोलापूर ः पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा...
कांदा बाजारावर ‘कोरोना’चा परिणाम नगर : कोरोना व्हायरसची बाधा वाढत असल्याचा बाजार...
महाराष्ट्राला रेमडिसिव्हिर देण्यास ‘...मुंबई : केंद्र सरकारकडून रेमडिसिव्हिर निर्यातीवर...
डाळिंब सल्लाहस्त बहर उशिरा घेतला असेल तर फळांना बटर पेपर बॅग...
कृषी सल्ला : आंबा, काजू, नारळ, सुपारीनवीन आंबा लागवडीसाठी निवडलेल्या क्षेत्रातील...
कृषी सल्ला : सुरु ऊस, कांदा, फळपिकेवातावरणातील उष्णता वाढल्यामुळे जनावरांच्या...
राज्यात उष्ण, ढगाळ हवामानसोमवार ते बुधवारपर्यंत (ता.१९ ते २१) १००८...
नांदेड जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी वसंत...नांदेड : नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या...
देशात ‘जमीन सुपोषन व संरक्षण जनजागरण’...औरंगाबाद : संपूर्ण देशभरात मंगळवारपासून (ता. १३...
निराधार महिला शेतकऱ्यांसाठी ‘ट्रँक्टर...अमरावती : अचलपूर विधानसभा मतदारसंघातील निराधार,...