Agriculture news in Marathi, Damages from cattle flock in Koyana, Kara department | Agrowon

कोयना, केरा विभागांत गव्यांच्या कळपाकडून नुकसान
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 12 जुलै 2019

पाटण, जि. सातारा ः तालुक्यातील कोयना व केरा विभागांत गव्यांच्या कळपाने धुमाकूळ घातला आहे. पुनर्लावणीसाठी तयार झालेले भात व नाचणीचे तरवे गव्यांनी फस्त केले असल्याने भात व नाचणी लागवडीचे क्षेत्र पडून राहील, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. नुकसानभरपाई देण्यासाठी कृषी विभागाने पंचनामे करावेत, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.

पाटण, जि. सातारा ः तालुक्यातील कोयना व केरा विभागांत गव्यांच्या कळपाने धुमाकूळ घातला आहे. पुनर्लावणीसाठी तयार झालेले भात व नाचणीचे तरवे गव्यांनी फस्त केले असल्याने भात व नाचणी लागवडीचे क्षेत्र पडून राहील, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. नुकसानभरपाई देण्यासाठी कृषी विभागाने पंचनामे करावेत, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.

दमदार पावसाने हजेरी लावल्याने तालुक्याच्या पश्‍चिम भागात नाचणी व भात लावणीस वेग आला आहे. मात्र गव्यांचे कळप पेरणी केलेले व लागणीस आलेले तरवे रात्रीत खाऊन टाकत आहेत. कोयना विभागातील, येराड, जोतिबाचीवाडी, शिरळ, मारुल तर्फ पाटण, वाजेगांव व कराटे या गावातील तर केरा विभागातील आरल, चाफोली, निवकणे, तामकणे, घाणव व खिवशी या गावांच्या शिवारत गव्यांनी धुमाकूळ घातला आहे.

येराड ते गोष्टवाडीच्या उत्तर बाजूच्या डोंगरातील व केरा विभागाच्या निवकणे ते तामकडेच्या पश्‍चिम बाजूच्या डोंगरावर वन विभागाच्या हद्दीत घनदाट जंगल आहे. या जंगलाचा फायदा घेऊन गव्यांचा शेतकऱ्यांना दररोज उपद्रव सुरू आहे. रात्री शिवारात गव्यांचे कळप येतात. उगवलेले व पुनर्लावणीस योग्य आलेले तरवे नाचणी व भात पिकांचे तरवे खातात व सुरक्षिततेसाठी 
दिवस उगवण्या अगोदर जवळच्या जंगलांचा आधार घेतात. 

गवे तरवे खातात हा भाग थोडा नुकसानीचा असला तरी त्यांच्या चालण्यामुळे तरव्यांचे मोठे नुकसान झाले आहे. नाचणी व भाताचे तरवे गव्यांनी फस्त केल्याने पुनर्लावणीचे मोठे क्षेत्र या विभागातील पडून राहणार आहे. वन विभागाने गव्यांचा बंदोबस्त करावा व कृषी विभागाने तत्काळ पंचनामे करून नुकसानभरपाई वन विभागाने द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

इतर ताज्या घडामोडी
नांदेड, परभणी, हिंगोलीत पाऊसनांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील २८...
सांगली जिल्ह्यातील ४६८ गावांमधील...सांगली  : जिल्ह्यात ४६८ गावांमधील गावठाणांचा...
लातूर, उस्मानाबाद, जालना, बीड...लातूर : लातूर, उस्मानाबाद, जालना आणि बीड...
अकोला जिल्ह्यात दुबार पेरणीचे संकटअकोला ः पावसाचा खंड आणि त्यातच दिवसाचे...
जलसंधारण कामासाठी जलशक्ती योजना :...वाल्हे, जि. पुणे  : राज्यात जलयुक्त...
अनधिकृत बंधारे काढण्यासाठी ‘स्वाभिमानी’...नगर  : भंडारदरा धरणापासून ते ओझर...
बचत गटांना प्रोत्साहनासाठी ‘हिरकणी...सोलापूर  : राज्याच्या औद्योगिक आणि आर्थिक...
केरळच्या धर्तीवर काजू प्रक्रिया ...रत्नागिरी  ः परदेशी चलन मिळवून देणाऱ्या काजू...
`गोकुळ` मल्टिस्टेटमुळे शेतकऱ्यांचा...मुंबई : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक...
संगमनेर तालुक्यातील लिंबू बागांना घरघर संगमनेर, जि. नगर : दर्जेदार कागदी लिंबांच्या...
दूध वाहतुकीतून रेल्वेला ६ कोटी १२ लाख...दौंड, जि. पुणे  : दौंड रेल्वे स्थानकावरून...
कृषक विकिरण केंद्रातून अमेरिका, ...नाशिक  : जिल्ह्यातील लासलगाव येथील कृषक...
आसाम, बिहारमध्ये पुराचे ११४ बळीनवी दिल्ली: आसाम आणि बिहारमध्ये पुराचे थैमान...
सौरऊर्जेमुळे शेतकऱ्यांना मुबलक वीज...कोल्हापूर ः शेतकऱ्यांना दिवसा व उद्योगांना स्वस्त...
उशिरा पेरणीसाठी पीक नियोजन आतापर्यंत पडलेला पाऊस व पुढे येणारा पाऊस याचा...
परभणी जिल्ह्यात साडेचार लाख हेक्टरवर...परभणी : जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...
कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे काही आमदार लवकरच...सोलापूर : कॉंग्रेस-राष्ट्रवादीतील अनेक विद्यमान...
पीकविमा प्रश्‍न आठ दिवसांत सोडवा : `...सोलापूर : शेतकऱ्यांनी विमा काढावा, यासाठी...
विमा कंपन्यांविरोधात किसान सभेचा तीन...औरंगाबाद : पंतप्रधान पीकविमा योजनेतील सदोष तरतुदी...
बागलाणात खरीप हंगामातील पिके धोक्यात नाशिक : या वर्षी बागलाण तालुक्यातील रोहिणी, मृग व...