कापसाचा नवीन हंगाम (२०१९-२०) सुरू होऊन जवळपास दोन महिने संपायच्या बेतात आहेत, परंतु आज सु
ताज्या घडामोडी
नाशिक जिल्ह्यातील पीक नुकसानीचे पंचनामे पूर्ण
नाशिक : जिल्ह्यात जुलै व ऑगस्ट महिन्यात झालेल्या जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी पिकांचे नुकसान झाले. सर्वदूर झालेल्या पावसामुळे उद्भवलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर नुकसानीचे पंचानामे पूर्ण झाले आहेत. जिल्ह्यातील २२ हजार ३३४ हेक्टरवरील पिकांचे नुकसान, तर ३३ हजार ५५९ शेतकरी बाधित झाले आहेत, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली.

सर्वाधिक नुकसान हे निफाड आणि इगतपुरी तालुक्यांत झाले. जिल्ह्यात १२ हजार ८६५.६६ हेक्टरवर पिकांचे नुकसान झाले आहे. ८४६ गावांतील ३८ हजार ३६२२ शेतकऱ्यांना नुकसानीचा मोठा फटका बसला आहे. येवला व नांदगाव तालुक्यामध्ये पिकांचे फारसे नुकसान झाले नाही.
जिरायती पिकांमध्ये बाजरी, नागली, वरई, भात, मूग, उडीद, भुईमूग, मका, तूर सोयाबीन, खुरसणी या पिकांचे ९ हजार ५ ५२. ६६ हेक्टरवर, बागायत पिकांमध्ये कापूस, मका, भाजीपाला, ऊस व इतर पिकांचे ३ हजार १ ६५.९७ हेक्टरवर, तर बहुवार्षिक फळपिकांमध्ये १४७.०३ हेक्टरवर नुकसान झाले.
जिल्ह्यातील सातत्यपूर्ण पावसामुळे धरणातून विसर्ग करण्यात आला. त्यामुळे गोदावरी नदीला आलेल्या महापुरात अनेकांचे मोठे नुकसान झाले. उभी पिके पाण्यात गेल्यामुळे शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले आहे. प्रत्येक तालुक्यात करण्यात आलेल्या नुकसानीची माहिती कृषी अधीक्षक कार्यालयाने जाहीर केली. सर्वांत जास्त नुकसान भात, सोयाबीन, मका व भाजीपाला पिकांचे झाले. त्यामुळे उत्पादनात घट होणार आहे.
आकडे बोलतात
नुकसानग्रस्त तालुके | १३ |
बाधित गावे | ८४६ |
नुकसानग्रस्त शेतकरी | ३८ हजार ६२२ |
जिरायत पिकांचे नुकसान | ९ हजार ५५२. ६६ हेक्टर |
बागायत पिकांचे क्षेत्र | ३ हजार १६५.९७ |
बहुवार्षिक फळपिके क्षेत्र | १४७.०३ हेक्टर |
एकूण नुकसानीचे क्षेत्र | १२ हजार ८६५ .६६ हेक्टर |
- 1 of 581
- ››