Agriculture news in marathi, Damages inspections completed in Solapur district; Eyes to help | Agrowon

सोलापूर जिल्ह्यात नुकसानीचे पंचनामे पूर्ण; मदतीकडे डोळे

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 14 नोव्हेंबर 2019

सोलापूर : ऑक्‍टोबर महिन्यात मॉन्सुनोत्तर पावसाने घातलेल्या धुमाकूळाने जिल्ह्यातील एक हजार ७६ महसुली गावांतील नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. त्यानुसार एक लाख ९१ हजार ६४६ हेक्‍टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. यामध्ये दोन लाख २९ हजार १२४ शेतकरी बाधित झाले आहेत. आता शेतकऱ्यांचे डोळे मदतीकडे लागले आहेत. 

सोलापूर : ऑक्‍टोबर महिन्यात मॉन्सुनोत्तर पावसाने घातलेल्या धुमाकूळाने जिल्ह्यातील एक हजार ७६ महसुली गावांतील नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. त्यानुसार एक लाख ९१ हजार ६४६ हेक्‍टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. यामध्ये दोन लाख २९ हजार १२४ शेतकरी बाधित झाले आहेत. आता शेतकऱ्यांचे डोळे मदतीकडे लागले आहेत. 

मान्सूनोत्तर पावसामुळे द्राक्ष, डाळिंब, भाजीपाला, सोयाबीन, कांद्यासह अन्य पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मागील आठवड्यापासून पंचनामे करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू होते. विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी बैठक घेऊन पंचनामे त्वरित करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पंचनामे पूर्ण झाल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख यांनी दिली. 

जिल्ह्यातील एक हजार ७६ गावे बाधित आहेत. यात ६५ हजार २७ बागायती खातेदारांच्या पिकांचे नुकसान झाले. ५० हजार ६२८ हेक्‍टर बागायती क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. ३१ हजार ४० बहुवार्षिक फळपीक घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या २४ हजार ७२५ हेक्‍टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील एक लाख ९१ हजार ६४६ हेक्‍टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. खरिपाच्या शेवटी आणि रब्बीच्या तोंडावर मुसळधार पावसामुळे शेतपिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. 

राष्ट्रपती राजवटीमुळे मदतीबाबत संभ्रम 

पूर्ण झालेल्या पंचनाम्यांचा अहवाल शासनाकडे पाठविण्यात येणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले. गेल्या पंधरवड्यापासून नुकसान आणि त्याचे पंचनामे यावरून प्रशासनाची धावपळ सुरू होती. अखेर ही सगळी प्रक्रिया आता संपली. त्यामुळे शेतकऱ्यांचे डोळे आता सरकारच्या मदतीकडे लागले आहेत. राज्यात सध्या राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. त्यामुळे ही मदत कधी आणि कशी मिळणार, याबाबतही साशंकता आहे.


इतर ताज्या घडामोडी
शेती उत्पादन वाढीसाठी मधमाश्‍यांचा मोठा...नाशिक: मधमाश्‍यांचे संगोपन करून त्यांच्या...
कृत्रिम रेतनावर नियंत्रण योग्यचपुणे : कृत्रिम रेतन करताना शास्त्रोक्त...
कडधान्यवर्गीय बियाणे उत्पादकांना अनुदान...अकोला  ः कडधान्यवर्गीय पिकांच्या पायाभूत...
अमरावती ‘एसआयटी’कडूनही अजित पवार निर्दोषमुंबई : नागपूर विभागातील सिंचन घोटाळ्यापाठोपाठ...
नांदेड जिल्ह्यात कृषी योजनेंतर्गत १...नांदेड : जिल्हा परिषदेच्या कृषी...
पुणे विभागात गळीत हंगामात १८ साखर...पुणे : गळीत हंगाम सुरू होऊन जवळपास दीड महिना होत...
खानदेशात ज्वारीची आवक नगण्य, दरही...जळगाव  ः खानदेशातील प्रमुख बाजार...
नगर जिल्ह्यात पाण्याअभावी २४० पाणी...नगर : आक्टोबर महिन्यात जिल्हाभर जोरदार पाऊस...
जळगाव जिल्ह्यात सिंचनासाठी धरणांतून पाच...जळगाव  ः पावसाळ्यात सरासरीच्या तीस टक्के...
सोलापुरात दरवाढीनंतर कांद्याच्या आवकेत...सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सातारा जिल्ह्यात रब्बी पीककर्जाचे सात...सातारा : जिल्ह्यात खरीप हंगामाप्रमाणेच रब्बी...
‘पांडुरंग', 'विठ्ठल’च्या निवडणुकांकडे...सोलापूर : आगामी वर्षात जिल्ह्यातील आघाडीच्या...
शेतीमधील गरज ओळखा ः डॉ. सिंगजालना : ‘‘कृषी विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञांनी...
सिद्धेश्‍वर कारखान्याची चिमणी तीन...सोलापूर : सिद्धेश्‍वर साखर कारखान्याची चिमणी...
लोणंद बाजार समितीत कांद्याला ११...लोणंद, जि. सातारा : कांद्याची आवक घटल्याने लोणंद...
किमान तापमानात घसरण, थंडीत चढ-उतार...महाराष्ट्राच्या समुद्र किनारपट्टीवर उत्तर दिशेने...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ढगाळ वातावरणाचा...सिंधुदुर्ग : गेले पाच दिवस जिल्ह्यात असलेल्या...
उसाला प्रतिटन चार हजार रुपये दर द्यावासातारा : ‘‘उसाला प्रतिटन चार हजार रुपये द्या, दोन...
टेंभू, ताकारी, म्हैसाळच्या पूर्णत्वाची...सांगली : टेंभू, ताकारी आणि म्हैसाळ योजनांच्या...
चोरट्यांपासून कांद्याच्या रक्षणासाठी...नगर ः बाजारात टंचाई असल्याने महिनाभरापासून...