राज्यातील जिरायती शेतीतील कापूस हे एकमेक नगदी पीक आहे.
ताज्या घडामोडी
सोलापूर जिल्ह्यात नुकसानीचे पंचनामे पूर्ण; मदतीकडे डोळे
सोलापूर : ऑक्टोबर महिन्यात मॉन्सुनोत्तर पावसाने घातलेल्या धुमाकूळाने जिल्ह्यातील एक हजार ७६ महसुली गावांतील नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. त्यानुसार एक लाख ९१ हजार ६४६ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. यामध्ये दोन लाख २९ हजार १२४ शेतकरी बाधित झाले आहेत. आता शेतकऱ्यांचे डोळे मदतीकडे लागले आहेत.

मान्सूनोत्तर पावसामुळे द्राक्ष, डाळिंब, भाजीपाला, सोयाबीन, कांद्यासह अन्य पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मागील आठवड्यापासून पंचनामे करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू होते. विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी बैठक घेऊन पंचनामे त्वरित करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पंचनामे पूर्ण झाल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख यांनी दिली.
जिल्ह्यातील एक हजार ७६ गावे बाधित आहेत. यात ६५ हजार २७ बागायती खातेदारांच्या पिकांचे नुकसान झाले. ५० हजार ६२८ हेक्टर बागायती क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. ३१ हजार ४० बहुवार्षिक फळपीक घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या २४ हजार ७२५ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील एक लाख ९१ हजार ६४६ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. खरिपाच्या शेवटी आणि रब्बीच्या तोंडावर मुसळधार पावसामुळे शेतपिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.
राष्ट्रपती राजवटीमुळे मदतीबाबत संभ्रम
पूर्ण झालेल्या पंचनाम्यांचा अहवाल शासनाकडे पाठविण्यात येणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले. गेल्या पंधरवड्यापासून नुकसान आणि त्याचे पंचनामे यावरून प्रशासनाची धावपळ सुरू होती. अखेर ही सगळी प्रक्रिया आता संपली. त्यामुळे शेतकऱ्यांचे डोळे आता सरकारच्या मदतीकडे लागले आहेत. राज्यात सध्या राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. त्यामुळे ही मदत कधी आणि कशी मिळणार, याबाबतही साशंकता आहे.