Agriculture news in Marathi, The dams of Kolhapur district are half full | Agrowon

कोल्हापूर जिल्ह्यातील धरणे निम्मी भरली 
टीम अॅग्रोवन
सोमवार, 22 जुलै 2019

कोल्हापूर : जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाला असला तरी बहुतांशी धरणे पन्नास टक्केपर्यंत भरली आहेत. राधानगरी धरणात आजअखेर ५.९१ टीएमसी पाणीसाठा आहे. कोदे लघुप्रकल्प व जांबरे मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत. 

इतर धरणांमध्ये तुळशी २.०२, वारणा १९.७५, दूधगंगा १०.५४, कासारी १.७८, कडवी १.८७, कुंभी १.६२, पाटगाव २.२७, चिकोत्रा ०.७५ टीएमसी, चित्री १.०९, जंगमहट्टी ०.८८, घटप्रभा १.५६, जांबरे ०.८२, कोदे (ल. पा.) ०.२१ टीएमसी पाणीसाठा आहे. कोयना धरणात ४७.६४ टीएमसी तर अल्लमट्टी धरणात ९९.९०५ इतका पाणीसाठा आहे. 

कोल्हापूर : जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाला असला तरी बहुतांशी धरणे पन्नास टक्केपर्यंत भरली आहेत. राधानगरी धरणात आजअखेर ५.९१ टीएमसी पाणीसाठा आहे. कोदे लघुप्रकल्प व जांबरे मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत. 

इतर धरणांमध्ये तुळशी २.०२, वारणा १९.७५, दूधगंगा १०.५४, कासारी १.७८, कडवी १.८७, कुंभी १.६२, पाटगाव २.२७, चिकोत्रा ०.७५ टीएमसी, चित्री १.०९, जंगमहट्टी ०.८८, घटप्रभा १.५६, जांबरे ०.८२, कोदे (ल. पा.) ०.२१ टीएमसी पाणीसाठा आहे. कोयना धरणात ४७.६४ टीएमसी तर अल्लमट्टी धरणात ९९.९०५ इतका पाणीसाठा आहे. 

गेल्या दोन दिवसांपासून धरणक्षेत्रातही पावसाचा जोर ओसरल्याने दोन दिवसांपासून धरणातील पाणी धीम्या गतीने वाढत आहे. गेल्या दहा ते बारा दिवसांत धरणांच्या पाणीसाठ्यात चांगली वाढ झाल्याचे पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी सांगितले. अद्यापही पाटबंधारे विभागाच्या नियोजनानुसार जोरदार पाऊस नसल्याने धरणे तातडीने भरण्याची शक्‍यता कमी असल्याचे विभागाच्या सूत्रांनी सांगितले. सलग एक दोन दिवस पाऊस पडून पुन्हा तीन चार दिवसांची विश्रांती असे स्वरूप पावसाचे असल्याने गतीने धरणे भरण्याची प्रकिया होत नसल्याची माहिती पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी दिली. 

जो पर्यंत ८० टक्क्‍यांहून अधिक धरणे भरणार नाहीत तोपर्यंत कोणत्याही धरणांतून जादाचे पाणी सोडले जाण्याची शक्‍यता कमी आहे. जे लघुपाटबंधारे प्रकल्प पूर्ण भरले आहेत. त्यांच्या सांडव्यावरुन होणारा विसर्ग तेवढाच सुरू आहे. दूधगंगा, वारणा या मोठ्या धरणांवरील विसर्ग सुरू करण्यात आला नाही. पावसात संततधार पणा नसल्याने आम्ही अजूनही पाणी सोडण्याबाबत नियोजन केले नसल्याचे पाटबंधारे विभागाने सांगितले. 

मंगळवारी (ता. १६) सकाळपर्यंत नद्यांना आलेला पूर ओसरत असून सध्या केवळ बारा बंधारे पाण्याखाली आहेत. चार दिवसांपूर्वी तब्बल ७० बंधारे पाण्याखाली गेले होते. पाणी ओसरल्याने या बंधाऱ्यावरुन होणारी वाहतूक पूर्ववत झाली आहे.

इतर बातम्या
महाजनादेश यात्रेला बुधवारपासून नंदूरबार...नंदुरबार ः राज्यातील पूरस्थितीमुळे स्थगित झालेली...
पुणे बाजार समिती प्रशासकपदी वर्णी...पुणे  : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे...
प्रतिकूल हवामानामुळे जुन्नर तालुक्यातील...नारायणगाव, जि. पुणे  : दोन महिन्यांपासून...
नगर जिल्ह्यातील दहा ते अकरा तालुक्यांवर...नगर  ः राज्याच्या काही भागांत जोरदार पावसाने...
पीक नुकसानीबाबत शेतकऱ्याने मांडली कृषी... कऱ्हाड, जि. सातारा ः घरात हुतं नव्हतं...
बागलाण तालुक्यात पूर्वहंगामी...नाशिक ः पूर्वहंगामी अर्ली द्राक्ष उत्पादनासाठी...
खानदेशात कापूस पिकात मर रोग, मूळकूजजळगाव ः खानदेशात जळगाव, धुळे व नंदुरबार...
नांदेड, परभणी जिल्ह्यात गुलाबी बोंड...परभणी: परभणी, नांदेड जिल्ह्यांतील बीटी कपाशीवरील...
...अन् नारायण राणे काँग्रेसमध्ये गेले...मुंबई  ः कोणताही अन्याय सहन करायचा नाही, या...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात केळी, नारळ, सुपारी... सिंधुदुर्ग  ः कुणी तीन लाख तर कुणी दोन...
राष्ट्रपतींनी घेतला सूतकताईचा अनुभववर्धा  ः राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी...
पीएच.डी.साठी गुरुवारी सामाईक प्रवेश...पुणे ः  राज्यातील चारही कृषी विद्यापीठांतील...
विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस-... भंडारा  ः विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस...
कोयना धरणातून ६७ टीएमसी पाण्याचा विसर्गसातारा : या महिन्याच्या सुरवातीपासून मुसळधार...
राज्यात पावसाची उघडीपपुणे : ऑगस्ट महिन्याच्या सुरवातीला मुसळधार...
कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील ऊस...कोल्हापूर : साखर कारखाने म्हटले की सर्वांच्या...
परभणी दुग्धशाळेतील संकलनात सव्वादोन लाख...परभणीः शासकीय दूध योजनेअंतर्गत परभणी येथील...
मराठवाड्यात पाणीसाठ्याची स्थिती विदारकऔरंगाबाद : अर्धा पावसाळा लोटला तरीही मराठवाड्यात...
बुलडाणा जिल्ह्यात निर्माण झाली १३२५...बुलडाणाः जिल्हा प्रशासन व भारतीय जैन संघटना...
कोकणात नुकसानभरपाईचे वेगळे निकष लावा :...रत्नागिरी : ‘‘सांगली, कोल्हापूरप्रमाणेच कोकणातील...