agriculture news in Marathi dams from Nagar District Maharashtra | Page 2 ||| Agrowon

नगर जिल्ह्यातील धरणे तुडूंब

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 29 सप्टेंबर 2020

दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या आणि पाणी नसल्याने बहुतांश भागातील शेतीही सातत्याने अडचणीत असलेल्या नगर जिल्ह्यात पाच वर्षांत यंदा प्रथमच सप्टेंबर महिन्यात सर्व धरणे फुल्ल झाली आहेत. 

नगर ः दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या आणि पाणी नसल्याने बहुतांश भागातील शेतीही सातत्याने अडचणीत असलेल्या नगर जिल्ह्यात पाच वर्षांत यंदा प्रथमच सप्टेंबर महिन्यात सर्व धरणे फुल्ल झाली आहेत. जिल्ह्यातील सर्व धरणांची मिळून सुमारे ७० टीएमसी पाणी साठवण क्षमता आहे. सध्या सर्व धरणांत ६८ टीएमसीच्या जवळपास पाणी उपलब्ध झाले आहे. गेल्या महिनाभर झालेल्या सततच्या पावसाने पिकांचे नुकसान झाले असली तरी टॅंकरच्या पाण्याने तहान भागवणाऱ्या भागांतही यंदा मुबलक पाणी उपलब्ध झाले आहे. त्यामुळे शेतकरी समाधानी आहेत. 

जिल्ह्याने गेल्या दहा वर्षांत सुमारे सहा वर्षे तीव्र दुष्काळ सोसला आहे. केवळ पाणी नसल्याने काही तालुक्याचा अपवाद वगळता जिल्हाभरातील शेतकऱ्यांनी शेतीत मोठा आर्थिक फटका सोसला आहे. फळबागाही पाण्याअभावी वाया गेल्या आहेत. त्यामुळे सर्व बाजूने संकटात असलेला शेतकरी आर्थिककदृष्ट्या हतबल होता. यंदा पावसाळ्याच्या सुरवातीपासूनच चांगला पाऊस झाला आहे. जिल्ह्यात पावसाने कधीच सरासरी ओलांडली आहे.

सर्वाधिक पाऊस पडत असलेल्या अकोल्यातही यंदा दुपटीपेक्षाही जास्त पाऊस झाला आहे. मुळा, भंडादरा, निळवंडे ही धरणे महिनाभरापूर्वी भरली आहे. विशेष करून अनेक वर्षांपासून न भरलेले सीना धरण यंदा सर्वप्रथम भरले. आढळा, भोजापूर, येडगाव, वडज, डिंभे, घोड, मांडओहोळ, सीना, खैरी व विसापूर ही धरणे पूर्ण क्षमतेने भरली आहेत. 

दुष्काळग्रस्त भाग झाला आहे पाणीदार 
जिल्ह्यात गेल्या १५ दिवसांपासून पाऊस रोज हजेरी लावत आहे. शिवाय ढगाळ हवामानामुळे देखील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याचा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसला आहे. मात्र यंदा गेल्या अनेक वर्षानंतर पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झाला आहे. मोठ्या, धरणांसोबत सर्वच गावतलाव, पाझर तलाव भरले असून नदी, नाले, ओढे भरभरून वाहत आहेत. त्यामुळे पाणीपातळी वाढण्यास मदत झाली असून दुष्काळग्रस्त भाग पाणीदार झाल्याने सुखावला आहे.


इतर अॅग्रो विशेष
पाच हजार शेतकऱ्यांची ‘रिसोर्स बॅंक’कऱ्हाड, जि. सातारा ः शेतकऱ्यांवर सातत्याने...
राज्यात तुरळक ठिकाणी पावसाचा दणका पुणे ः राज्यात गेल्या दोन दिवसांपासून कोकणातही...
‘जीआय’प्राप्त शेतकरी ‘वापरकर्ते’ करणारपुणे: राज्यातील पिकांना भौगोलिक निर्देशांक मिळाले...
तीन दिवसांत मदतीबाबत निर्णय: मुख्यमंत्रीसोलापूर ः हवामान विभागाने आणखी दोन-तीन दिवस...
राज्यात पावसासाठी पोषक स्थिती पुणे ः बंगालचा उपसागर व दक्षिण आंध्रप्रदेश...
शेतकऱ्यांना मदतीसाठी कर्जाशिवाय गत्यंतर...तुळजापूर, जि. उस्मानाबाद: स्थानिक लोकांशी...
कोरोनामुळे वाढल्या कृषी व्यापार संधीचीनच्या तुलनेत आपली अर्थव्यवस्था मजबूत करायची...
कृषी ‘समृद्धी’चा मार्गबाळासाहेब ठाकरे मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गालगत...
अकोले तालुक्यात होतेय डांगी गोवंशाचे...अकोले तालुक्यातील (जि. नगर) डोंगराळ, अति...
सोशल मिडीयावर ‘#ओला_दुष्काळ’ ट्रेंडनांदेड : राज्यात अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूर...
`समृद्धी`वर उभारणार गोदामे, शीतगृहे पुणेः मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांना शेतमाल...
पुण्यातील फूल बाजाराच्या कामाला गती पुणे: पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने...
राज्यात ठिकठिकणी जोरदार पाऊस पुणेः राज्यातील पावसाचा प्रभाव कमी...
केळी निर्यातीसाठी ‘बनानानेट’च्या...नागपूर: राज्यातून केळीची निर्यात वाढल्यानंतर आता...
देशातील सूतगिरण्या ९५ टक्के क्षमतेने...जळगाव ः देशातील सुमारे ७१५ सूतगिरण्या ९५ टक्के...
जिल्हानिहाय ऑनलाइन निविष्ठा परवाने वाटप...पुणे: राज्यात खते, बियाणे व कीडनाशकांच्या...
ओतूरमध्ये कांद्याला किलोला कमाल ८०...पुणे: पुणे जिल्ह्यातील जुन्नर बाजार समितीच्या...
जोरदार पावसाचा अंदाज पुणे ः राज्यात पुढील पाच ते सहा दिवस काही ठिकाणी...
राज्यांचा निर्धार नि केंद्राची माघार‘जीएसटी’ अंतर्गत राज्यांना द्यावयाच्या...
भुकेला भारतजागतिक भूक निर्देशांक-२०२० नुकताच प्रसिद्ध झाला...