नाशिक जिल्ह्यातील धरणसाठा ८३ टक्क्यांवर

नाशिक जिल्ह्यातील धरणसाठा ८३ टक्क्यांवर
नाशिक जिल्ह्यातील धरणसाठा ८३ टक्क्यांवर

नाशिक : जिल्ह्यातील ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठा ८३ टक्क्यांवर पोहोचला आहे. मागील आठच दिवसांत धरणांतील जलसाठा झपाट्याने वाढला आहे. मागील वर्षी याच कालावधीत ५९ टक्के पाणीसाठा होता. याच तुलनेत या वर्षी धरणसाठ्यात २४ टक्क्यांनी अधिक पाणी जमा झाले आहे. जिल्ह्यातील १७ प्रकल्पांमधील पाणीसाठा ९० टक्क्यांहून अधिक झालेला आहे. त्यामुळे जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याचा व सिंचनाचा प्रश्‍न सुटण्यास मदत होणार आहे. जिल्ह्यातील १९ प्रकल्पांमधून पाण्याचा विसर्ग केला जात आहे. जिल्ह्यातील काही धरणांमधील पाणीसाठा गतवर्षाच्या तुलनेत वाढला आहे. त्यात प्रामुख्याने, पालखेडमध्ये मागील वर्षी २२ टक्के साठा होता. यंदा तो ७० टक्क्यांवर गेला आहे. ओझरखेड येथील साठाही मागील वर्षी ५१ टक्के होता तो १०० टक्के झाला आहे. तिसगाव येथील साठा मागील वर्षी २० टक्के होता यंदा त्यात लक्षणीय वाढ होत ८० टक्क्यांवर जाऊन पोहोचला आहे. जिल्ह्यातील धरणांमधील जलसाठ्यात लक्षणीय वाढ झाल्याने प्रशासनाला पाणीपुरवठा करताना येणाऱ्या अडचणी सुटण्यास मदत होणार आहे.  दोन धरणे कोरडीच  जिल्ह्यात नागासाक्या व माणिकपुंज या प्रकल्पांत एक थेंबही पाणीसाठा शिल्लक नाही. त्यामुळे नांदगावची परिस्थिती गंभीर बनत चालली आहे.  जिल्ह्यातील धरणसाठा स्थिती

धरण उपलब्ध जलसाठा(दलघफु) टक्केवारी सुरू असलेला विसर्ग
गंगापूर ५०२५ ८९ ६१६०
कश्यपी १७९४  ९७ ८४४
गौतमी गोदावरी १७६४ ९४ ५७०
आळंदी ९७० १०० ९६१
पालखेड ४६० ७० ९६९९
करंजवण ५१०१ ९५ ४१८५
वाघाड २३०२ १०० १७३०
ओझरखेड २१३० १०० १३८९
पुणेगाव ५१९ ८३ १२७१ 
तिसगाव ३८९ ८४  ००
दारणा ६४६८ ९० १३५५६
भावली १४३४ १०० ४८१ 
मुकणे ६७५२ ९३ ५००
वालदेवी ११३३ १०० १४४२
कडवा १५२८    
नांदूर मध्यमेश्‍वर २१० ८२ ३९४९६ 
भोजापूर ३६१ ९१ २८४२
चणकापूर १६०१ ८२ ३९४९६
हरणबारी ११६६ १०० २५८८
केळझर ५७२ १०० १३६४
नागासाक्या  ००  ००  ००
गिरणा १२२३४ ६६  ०० 
पुनद ९३३ ५७  ००
माणिकपुंज  ००  ००  ००

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com