Agriculture news in marathi; Dams in Nashik district at 83% | Page 3 ||| Agrowon

नाशिक जिल्ह्यातील धरणसाठा ८३ टक्क्यांवर

टीम अॅग्रोवन
रविवार, 11 ऑगस्ट 2019

नाशिक : जिल्ह्यातील ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठा ८३ टक्क्यांवर पोहोचला आहे. मागील आठच दिवसांत धरणांतील जलसाठा झपाट्याने वाढला आहे. मागील वर्षी याच कालावधीत ५९ टक्के पाणीसाठा होता. याच तुलनेत या वर्षी धरणसाठ्यात २४ टक्क्यांनी अधिक पाणी जमा झाले आहे.

नाशिक : जिल्ह्यातील ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठा ८३ टक्क्यांवर पोहोचला आहे. मागील आठच दिवसांत धरणांतील जलसाठा झपाट्याने वाढला आहे. मागील वर्षी याच कालावधीत ५९ टक्के पाणीसाठा होता. याच तुलनेत या वर्षी धरणसाठ्यात २४ टक्क्यांनी अधिक पाणी जमा झाले आहे.

जिल्ह्यातील १७ प्रकल्पांमधील पाणीसाठा ९० टक्क्यांहून अधिक झालेला आहे. त्यामुळे जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याचा व सिंचनाचा प्रश्‍न सुटण्यास मदत होणार आहे. जिल्ह्यातील १९ प्रकल्पांमधून पाण्याचा विसर्ग केला जात आहे. जिल्ह्यातील काही धरणांमधील पाणीसाठा गतवर्षाच्या तुलनेत वाढला आहे. त्यात प्रामुख्याने, पालखेडमध्ये मागील वर्षी २२ टक्के साठा होता.

यंदा तो ७० टक्क्यांवर गेला आहे. ओझरखेड येथील साठाही मागील वर्षी ५१ टक्के होता तो १०० टक्के झाला आहे. तिसगाव येथील साठा मागील वर्षी २० टक्के होता यंदा त्यात लक्षणीय वाढ होत ८० टक्क्यांवर जाऊन पोहोचला आहे. जिल्ह्यातील धरणांमधील जलसाठ्यात लक्षणीय वाढ झाल्याने प्रशासनाला पाणीपुरवठा करताना येणाऱ्या अडचणी सुटण्यास मदत होणार आहे. 

दोन धरणे कोरडीच 
जिल्ह्यात नागासाक्या व माणिकपुंज या प्रकल्पांत एक थेंबही पाणीसाठा शिल्लक नाही. त्यामुळे नांदगावची परिस्थिती गंभीर बनत चालली आहे. 

जिल्ह्यातील धरणसाठा स्थिती

धरण उपलब्ध जलसाठा(दलघफु) टक्केवारी सुरू असलेला विसर्ग
गंगापूर ५०२५ ८९ ६१६०
कश्यपी १७९४  ९७ ८४४
गौतमी गोदावरी १७६४ ९४ ५७०
आळंदी ९७० १०० ९६१
पालखेड ४६० ७० ९६९९
करंजवण ५१०१ ९५ ४१८५
वाघाड २३०२ १०० १७३०
ओझरखेड २१३० १०० १३८९
पुणेगाव ५१९ ८३ १२७१ 
तिसगाव ३८९ ८४  ००
दारणा ६४६८ ९० १३५५६
भावली १४३४ १०० ४८१ 
मुकणे ६७५२ ९३ ५००
वालदेवी ११३३ १०० १४४२
कडवा १५२८    
नांदूर मध्यमेश्‍वर २१० ८२ ३९४९६ 
भोजापूर ३६१ ९१ २८४२
चणकापूर १६०१ ८२ ३९४९६
हरणबारी ११६६ १०० २५८८
केळझर ५७२ १०० १३६४
नागासाक्या  ००  ००  ००
गिरणा १२२३४ ६६  ०० 
पुनद ९३३ ५७  ००
माणिकपुंज  ००  ००  ००

 


इतर ताज्या घडामोडी
सोलापुरी गुळाला ब्रॅंडिंगची संधीसोलापूर ः मधुरतेची वेगळी ओळख असलेला सोलापुरी...
उसाला पर्याय ठरण्याची उन्हाळी नाचणीत...कोल्हापूर : उन्हाळी नाचणी उसाचे कमी उत्पादन...
सिंचन योजना सौरऊर्जेवर चालविण्याबाबत...सांगली ः टेंभू, ताकारी व म्हैसाळ उपसा सिंचन...
सौर प्रकल्पासाठी ८६ ग्रामपंचायतींचे...नागपूर : महा कृषी ऊर्जा धोरणांतर्गत शेतीला...
‘श्रद्धा’चा दूध व्यवसाय युवा पिढीला...नगर ः श्रद्धा नवीन पिढीला दूध व्यवसायात प्रेरणा...
कृषी विद्यापीठाच्या दीक्षान्त समारंभाला...नागपूर : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या...
डाळिंबातील कीड- रोग नियंत्रणबहर व्यवस्थापन छाटणी मे महिन्यामध्ये केली असल्यास...
शेतकरी नियोजन पीक : शेवंतीमाझ्याकडे एकूण १० एकर शेती असून, पारंपरिक...
देवराई संवर्धनातून आदिवासींसाठी...मेघालयामध्ये देवराई संरक्षण आणि संवर्धनाला...
नांदेडमध्ये ४२ हजार ६४९ क्विंटल हरभरा...नांदेड : जिल्ह्यात किमान हमी दरानुसार सुरू...
व्हर्च्युअल क्लासरूममुळे कृषी शिक्षणाची...नगर ः व्हर्च्युअल क्लासरूम आणि अॅग्री-दीक्षा वेब...
‘एमआरपी’नुसारच खतांची खरेदी करावी सोलापूर ः यंदाच्या खरीप हंगामाच्या पार्श्‍वभूमीवर...
खरीप हंगामासाठी ११४० कोटी रुपये पीककर्ज...अकोला : अकोला जिल्ह्यात या खरीप हंगामासाठी ११४०...
सटाणा बाजार समिती आवाराबाहेर अवैध...नाशिक : सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काही...
नाशिक जिल्ह्यात विहिरींनी गाठला तळ नाशिक : जिल्ह्यात गत मॉन्सूनमध्ये अनेक भागांत...
भोकरखेडात चार वर्षांपासून शेतकरी वीज...वाशीम : शेतात वीज जोडणी घेऊन सिंचन करता येईल....
टेंभू योजनेचे पाणी सोडले; ‘बंदिस्त पाइप...आटपाडी, जि. सांगली : आटपाडी तालुक्‍यात टेंभू...
प्रत्येक गावाचा होणार कृषी विस्तार...जालना : कृषी विभागाच्या वतीने खरीप हंगामाचे...
तमाशा कलावंतांसाठी सरसावले मदतीचे हात नगर ः : कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे टाळेबंदी...
पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत चुरस सोलापूर ः पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा...