agriculture news in marathi, dams overflow due to rain, akola, maharashtra | Agrowon

वऱ्हाडातील प्रकल्प तुडुंब

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 12 नोव्हेंबर 2019

अकोला  ः गेल्या महिन्यात सतत झालेल्या पावसाने खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले. मात्र याच पावसामुळे धरण प्रकल्प यंदा तुडुंब भरले आहेत. त्यामुळे येत्या रब्बीसाठी पाणी मिळण्याची अपेक्षा आहे. खरिपात झालेले नुकसान काहीअंशी रब्बीत भरून काढण्यासाठी शेतकरी प्रयत्न करणार आहेत. 

अकोला  ः गेल्या महिन्यात सतत झालेल्या पावसाने खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले. मात्र याच पावसामुळे धरण प्रकल्प यंदा तुडुंब भरले आहेत. त्यामुळे येत्या रब्बीसाठी पाणी मिळण्याची अपेक्षा आहे. खरिपात झालेले नुकसान काहीअंशी रब्बीत भरून काढण्यासाठी शेतकरी प्रयत्न करणार आहेत. 

मागील काही वर्षांत अत्यल्प पावसामुळे नागरिकांना कोरड्या दुष्काळाचा सामना करावा लागला. मागील वर्षी दुष्काळाच्या दाहकतेने पाण्याअभावी उभी पिके करपली होती. गावांना पाणीपुरवठा करणारे जलस्रोत कोरडे पडल्याने पाणीपुरवठा करणाऱ्या टॅंकरच्या संख्येनेही उच्चांक गाठला होता. या वर्षी चांगला पाऊस झाला. कोरड्या दुष्काळाच्या विरुद्ध चित्र तयार झाले. अति पावसामुळे शेतकऱ्यांना ओल्या दुष्काळाला तोंड द्यावे लागत आहे. या सततच्या पावसामुळे सहा ते सात वर्षांपासून कोरडे पडलेले प्रकल्प शंभर टक्के भरले आहे. या प्रकल्पांतून पाणी ओसंडून वाहत आहे. 

अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा, वाण या मोठ्या प्रकल्पांसह  मोर्णा, निर्गुणा हे प्रकल्प १०० टक्के भरले. बुलडाणा जिल्ह्यातील नळगंगा, खडकपूर्णा व पेनटाकळी या मोठ्या प्रकल्पांसह ज्ञानगंगा, मस, कोराडी, पलढग, मन, तोरणा, उतावळी हे मध्यम प्रकल्प १०० टक्के भरले आहेत. वाशीम जिल्ह्यातील प्रकल्पांचीही अशीच स्थिती आहे. यासोबतच लघू प्रकल्प, छोटे-मोठे बंधारे, नाला खोलीकरणाची कामे पावसामुळे काठोकाठ भरलेली आहेत. हे पाणी आता रब्बी व उन्हाळी पिकांसाठी फायदेशीर ठरणार आहे. 
 

अशी आहे पाणीसाठा स्थिती

  • अकोला ः लघू, मध्यम, मोठ्या प्रकल्पांची एकूण क्षमता ः ३४८.३८ दलघमी.
  • प्रकल्पांमधील उपयुक्त साठा ः ३३३.०९ दलघमी.
  • प्रकल्पांमधील पाणीसाठा टक्केवारी ः ९५.६१.
  • बुलडाणा ः प्रकल्पांची एकूण क्षमता ः ५३३.५६ दलघमी.
  • प्रकल्पांमधील उपयुक्त साठा ः ४९८.१० दलघमी.
  • प्रकल्पांमधील पाणीसाठा टक्केवारी ः ९३.३५.

इतर ताज्या घडामोडी
सामूहिकपणे शंखी गोगलगायींचे नियंत्रण...शंखी गोगलगायी जून ते सप्टेंबर या कालावधीत जास्त...
सोलापुरात कांद्याला सरासरी २१०० रुपयेसोलापूर : सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या...
कोल्हापुरात कांद्याचे सौदे शेतकऱ्यांनी...कोल्हापूर : कांद्याच्या दरात घसरण झाल्याने...
बार्शी तालुक्‍यात सोयाबीनचे मोठे नुकसानवैराग, जि. सोलापूर : बार्शी तालुक्‍यात...
`पांगरी परिसरातील पीक नुकसानीचा अहवाल...पांगरी : पांगरी (ता.बार्शी) भागात गेल्या दहा,...
परभणी जिल्ह्यात दीड लाख हेक्टर कपाशी...परभणी : यंदाच्या खरिप हंगामात जिल्ह्यात ५ लाख १९...
खानदेशात सव्वालाख क्विंटल हरभरा...जळगाव : खानदेशात रब्बी हंगामाची तयारी लवकरच सुरू...
खानदेशात केळीची उधारीने खरेदीजळगाव : खानदेशात कांदेबाग केळीची पुन्हा कमी दरात...
साखर कारखान्यांनी कामगारांची जबाबदारी...कोल्हापूर : राज्यातील साखर कामगारांची आरोग्याची...
नाशिक जिल्ह्यात पिकांचे ३७ हजार...नाशिक : चालू महिन्याच्या मध्यापासून जिल्ह्यात...
मराठवाड्यात पाऊस खरीप पिकांची पाठ सोडेनाऔरंगाबाद : जिल्ह्यात बहुतांश भागात हलका ते जोरदार...
मराठवाड्यात औरंगाबाद जिल्ह्याची पीक...औरंगाबाद ः मराठवाड्यात खरीप पीक कर्जवाटपात...
कांदा निर्यातबंदी उठवा; नगर जिल्हा...नगर : केंद्राने कांदा निर्यातबंदीचा निर्णय...
लातूर विभागात १५ लाख हेक्टरवर रब्बीचे...लातूर : येथील विभागीय कृषी सहसंचालक...
नांदेडमध्ये पावसाने ८३ हजार हेक्टर...नांदेड : अतिवृष्टी, पूरामुळे जिल्ह्यातील...
वऱ्हाडात पावसाचा पुन्हा धुमाकूळअकोला ः वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा व वाशीम या...
शेतकरी विधवांकडून कंगना राणावतच्या...यवतमाळ : केंद्र सरकारच्या कृषी संबंधित नव्या...
सिंधुदुर्गाच्या काही भागात मुसळधार सुरूचसिंधुदुर्ग ः जिल्ह्याच्या काही भागात पावसाचा जोर...
सांगलीत रब्बीसाठी ३३ हजार क्विंटल बियाणेसांगली ः सांगली जिल्ह्यात रब्बी हंगामात युरियासह...
निळवंडे धरण तुडुंबअकोले, जि. नगर : उत्तर नगर जिल्ह्याला वरदान...