Agriculture news in marathi In dams in Pune district 78 TMC water storage | Agrowon

पुणे जिल्ह्यातील धरणांत ७८ टीएमसी पाणीसाठा

टीम अॅग्रोवन
सोमवार, 19 एप्रिल 2021

गेल्या दीड महिन्यापासून उन्हाच्या झळा तीव्र झाल्या आहेत. धरणातील पाण्याची मागणी वाढू लागली आहे. धरणातील उपलब्ध असलेल्या पाणीसाठ्याची पातळी वेगाने  कमी होत आहे

पुणे : गेल्या दीड महिन्यापासून उन्हाच्या झळा तीव्र झाल्या आहेत. धरणातील पाण्याची मागणी वाढू लागली आहे. धरणातील उपलब्ध असलेल्या पाणीसाठ्याची पातळी वेगाने  कमी होत आहे. आतापर्यंत सुमारे १३४.९२ टीएमसी पाणीसाठ्याचा वापर झाला असून, अजूनही ७८.२१ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे. येत्या काळात उन्हाचा चटका वाढल्यास आणखी वाढण्याची शक्यता जलसंपदा विभागाच्या सूत्रांनी वर्तविली आहे.

 पुणे जिल्ह्यातील एकूण धरणात गेल्या वर्षी २१३.१३ टीएमसी एवढी उपयुक्त पाणी साठा होता. यामध्ये उजनी धरणाचाही समावेश आहे. राज्यासह, पुणे जिल्ह्यातही  फेब्रुवारीच्या अखेरीपासून उन्हाचा पारा हळूहळू वाढू लागला. त्यामुळे धरणातील पाण्याची मोठ्या प्रमाणात गरज भासू लागली. उजनी धरण वगळता उर्वरित सर्वच धरणे पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागात आहे. त्यातच पुणे व पिंपरी शहराची वाढती लोकसंख्या विचारात घेतली असता या दोन्ही शहरांना खडकवासला, चासकमान,  पवना या धरणातून पाण्याचा पुरवठा होतो. या शिवाय पूर्वेकडील पुरंदर, दौंड, बारामती, इंदापूर, खेड, शिरूर, जुन्नर आणि आंबेगाव या पूर्व भागातील तालुक्यांना पश्चिमेकडील धरणातून शेतीसाठी पाण्याचा विसर्ग सोडला जातो.

सध्या पिंपळगाव जोगे, डिंभे, घोड, चासकमान, खडकवासला, वीर, नाझरे, उजनी या धरणातून शेतीच्या उजव्या आणि डाव्या अशा दोन्ही कालव्यांना पाण्याचा विसर्ग सोडण्यात आलेला आहे. या शिवाय वडज, पवना, खडकवासला या धरणातून बंद जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. धरणात अजूनही मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झाला असला तरी मे महिन्यात पाण्याची मागणी आणखी वाढणार आहे. धरणातील पाणीपातळी वेगाने कमी होत आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा योग्य पद्धतीने वापर करण्याचे आवाहन जलसंपदा विभागाच्या सूत्रांनी केले. 

धरणनिहाय उपलब्ध असलेला पाणीसाठा (टीएमसी) 
पिंपळगाव जोगे ०.१०, माणिकडोह ०.८५, येडगाव ०.६४, वडज ०.४७, डिंभे ५.६५, घोड १.०८, विसापूर ०.३३, कळमोडी ०.९८, चासकमान ३.१२, भामाआसखेड ३.९७, वडीवळे ०.३६, आंध्रा २.०८, पवना ३.९१, कासारसाई ०.२८, मुळशी ४.९६, टेमघर ०.४५, वरसगाव ६.४५, पानशेत ६.६०, खडकवासला ०.३६, गुंजवणी १.८८, नीरा देवधर ४.४१, भाटघर १०.३४, वीर ५.८६, नाझरे ०.२८, उजनी १२.५१, चिल्हेवाडी ०.२९.


इतर ताज्या घडामोडी
सोयाबीन बियाणे निर्बंध मध्य प्रदेशकडून...पुणे ः परराज्यांत सोयाबीन बियाणे विक्रीवर निर्बंध...
‘महाबीज’चे सोयाबीन बियाणे दर ‘जैसे थे’अकोला : खरीप हंगामासाठी ‘महाबीज’ने सोयाबीन...
देशाच्या तुलनेत निम्मी साखर एकट्या...कोल्हापूर : देशाच्या साखरनिर्यात कोट्यापैकी जवळ...
‘गोकुळ’चा कल सत्तांतराकडेकोल्हापूर : अत्यंत चुरशीने झालेल्या कोल्हापूर...
‘सह्याद्री’च्या पर्वतरांगेमधून...नाशिक : सह्याद्रीच्या पर्वतरांगेत पश्‍चिम घाट...
राज्यात आंब्याचा हंगाम ऐन बहरातअकोल्यात बदाम आंबा ४००० ते ४५०० रुपये क्विंटल...
सोशल मीडियाद्वारे ६५ टन कलिंगड विक्रीपुणे : कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षी एप्रिल...
मध्य प्रदेश सरकारकडून बियाणे विक्रीवर...पुणे ः सोयाबीन बीजोत्पादनात देशात सर्वात मोठा...
पशुखाद्य निर्मितीचा कच्चा माल दुपटीने...सांगली : पशुखाद्य तयार करण्यासाठी लागणाऱ्या...
दक्षिण भागात गारपिटीची शक्यतापुणे :  गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा चटका...
परभणी जिल्ह्यात कडक निर्बंध लागूपरभणी ः  कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी...
परभणी जिल्ह्यात लघु तलावांत सरासरी १९...परभणी ः वाढते तापमान, बाष्पीभवनाचा वाढलेला वेग,...
नाशिक जिल्ह्यात बाजार समित्यांमध्ये...नाशिक : पणन विभागाच्या परिपत्रकात सलग ३...
नाशिक : 'ऑक्सिजन एक्स्प्रेस'द्वारे २७....नाशिक : ‘‘जिल्ह्यातील प्राणवायूची तूट भरून...
सांगलीत केळीच्या क्षेत्रात घट होण्याची...सांगली ः जिल्ह्यात गेल्या दोन वर्षात झालेल्या...
रत्नागिरीत ३७ टन काजू बी तारणरत्नागिरी ः काजूचे बाजारातील दर घसरल्यानंतर...
आदिवासी विकास मंडळ करणार गव्हाची खरेदीयवतमाळ : आदिवासी विकास महामंडळाकडून राज्यात...
परभणीत सोयाबीनचे दीड हजार क्विंटल...परभणी ः परभणी तालुक्यात यंदा ११० हेक्टरवर उन्हाळी...
भुईमुगाचे वाण निकृष्ट, कंपन्यांवर...यवतमाळ : जिल्ह्यात भुईमुगाच्या शेंगा न धरण्याचे...
नगरमध्ये महावितरणच्या पायाभूत सुविधांचे...नगर : कृषिपंप वीज धोरण २०२०च्या अंमलबजावणीमुळे...