पुणे जिल्ह्यातील धरणांमधून विसर्ग वाढला

पुणे जिल्ह्यातील धरणांमधून विसर्ग वाढला
पुणे जिल्ह्यातील धरणांमधून विसर्ग वाढला

पुणे : पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागात असलेल्या घाटमाथ्यावर आणि धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. खडकवासला, चासकमान, वीर, आंध्र, वडीवळे, येडगाव आदी धरणांतून पाण्याचा विसर्ग वाढला आहे. पावसाचा जोर कायम असल्याने इरतही धरणे भरण्याच्या मार्गावर असून, लवकर पाणी सोडावे लागणार आहे. उपनद्यांमधून येणाऱ्या पाण्यामुळे भीमेला पूर आला असून, अचल पातळीत गेलेले उजनी धरण उपयुक्त पाणी साठ्यात आले आहे. 

उजनीसह भीमा खोऱ्यातील सर्व २७ धरणांची एकूण उपयुक्त क्षमता ११८.४० टीमएसी आहे. मंगळवारी (ता. ३०) सकाळपर्यंत सर्व प्रकल्पांमध्ये मिळून ११५.९५ टीएमसी (५३ टक्के) उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. पुणे शहर, हवेली, दौंड, इंदापूरला पिण्यासाठी आणि शेतीसाठी पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पात सकाळपर्यंत २१.८८ टीएमसी (७५ टक्के) पाणीसाठा झाला आहे. खडकवासला धरण शंभर टक्के भरल्याने १३ हजार क्युसेकहून अधिक वेगाने मुठा नदीपात्रात पाणी सोडण्यात येत आहे. 

नीरा नदीच्या खोऱ्यातील वीर धरणातूनही पाण्याचा मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू आहे. मंगळवारी (ता. ३०) सकाळी धरणातून सुमारे २५ हजार क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात येत होते. तर जिल्ह्यातील कासारसाई धरणातून ६०० क्युसेक, कलमोडी १ हजार ९००, चासकमान ११ हजार, आंद्रा ३ हजार, वडीवळे २ हजार ५००, येडगाव धरणातून ३ हजार १००, वडज ३ हजार २५०, तर चिल्हेवाडी धरणातूनही ५०० क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात येत आहे. पिंपळगाव जोगे आणि नाझरे धरणांचा पाणीसाठा अद्यापही मृत पातळीतच आहे. तर घोड धरणातचा पाणीसाठा उपयुक्त साठ्यात आला आहे. 

मंगळवारी (ता. ३०) जिल्ह्यातील धरणांचा पाणीसाठा (टीएमसीमध्ये) कंसात टक्केवारी : टेमघर २.२५(६१), वरसगाव ८.७७ (६८), पानशेत ८.९० (८४), खडकवासला १.९७ (१००), पवना ६.३१ (७४), कासारसाई ०.५४ (९४), मुळशी १४.१५ (७७), कळमोडी १.५१ (१००), चासकमान ७.३६ (९७), भामा आसखेड ६.३१ (८२), आंद्रा २.९२ (१००), वडीवळे ०.९९ (९३), गुंजवणी ३.०६ (८३), भाटघर १६.३५ (७०), नीरा देवघर ९.०८ (७७), वीर ९.२४ (९८), नाझरे ० (०), पिंपळगाव जोगा ० (०), माणिकडोह ३.७८ (३७), येडगाव १.७४ (६२), वडज ०.५० (५१), डिंभे ८.८१ (७१), चिल्हेवाडी ०.६५ (६८), घोड ०.६७ (१२).

मंडळनिहाय पडलेला पाऊस  जिल्ह्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावली असून, पश्चिम भागात पावसाचा जोर कायम आहे. मंगळवारी (ता. ३०) जिल्ह्यात मंडळनिहाय पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये (स्रोत : महसूल विभाग) : खेड शिवापूर ४०, पौड ७२, घोटावडे ११०, माले १२४, मुठा १४२, पिरंगूट ७५, भोर ८८, भोलावडे १२३, आंबवडे १०७, संगमनेर ७४, निगुडघर १२१, वडगाव मावळ १०९, तळेगाव ९२, काळे १४६, कार्ला १८२, खडकाळा १७१, लोणावळा २२६, शिवणे ६८, वेल्हा १२६, पानशेत १४७, विंझर ७३, आंबवणे ७१, जुन्नर ४३, राजूर १९७, डिंगोरे ६६, आपटाळे ८५, वाडा ६५, कुडे ७२, पाईट ५६, शेलपिंपळगाव ५१.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com