agriculture news in marathi, dams will full if Damananga's water stops: Gadkari | Agrowon

दमणगंगेचे पाणी अडविल्यास धरणे भरतील : गडकरी
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 26 ऑक्टोबर 2018

नाशिक : नाशिक-नगरचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी दमणगंगा प्रकल्प अंतिम टप्प्यात आहे, तर ठाणे जिल्ह्यातील वाहून जाणारे पाणी अडवून तेथे धरण बांधण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. या धरणामुळे नाशिक, नगरमधील सर्व धरणे पूर्ण भरतीलच शिवाय जायकवाडीही भरेल आणि पाण्यावरून होणारी भांडणे होणार नाहीत, असे प्रतिपादन केंद्रीय परिवहन आणि जलसंधारणमंत्री नितीन गडकरी यांनी केले.

नाशिक : नाशिक-नगरचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी दमणगंगा प्रकल्प अंतिम टप्प्यात आहे, तर ठाणे जिल्ह्यातील वाहून जाणारे पाणी अडवून तेथे धरण बांधण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. या धरणामुळे नाशिक, नगरमधील सर्व धरणे पूर्ण भरतीलच शिवाय जायकवाडीही भरेल आणि पाण्यावरून होणारी भांडणे होणार नाहीत, असे प्रतिपादन केंद्रीय परिवहन आणि जलसंधारणमंत्री नितीन गडकरी यांनी केले.

 के. के. वाघ शिक्षण संस्थेच्या वतीने पद्मश्री कर्मवीर काकासाहेब वाघ स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित कर्मयोगी आणि कृषी तपस्वी पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी गडकरी बोलत होते. व्यासपीठावर पालकमंत्री गिरीश महाजन, खासदार हेमंत गोडसे, हरिश्चंद्र चव्हाण, आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, बाळासाहेब सानप, अनिल कदम, राहुल अहेर, किशोर दराडे, नरेंद्र दराडे, जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे, नीलिमा पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

या वेळी गडकरी म्हणाले, की ठाणे जिल्ह्यातील पाणी हे समुद्रात वाहून जाते. हे पाणी अडवून ठाणे जिल्ह्यात धरण बांधण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. हे धरण बांधण्यासाठी ३० हजार कोटींचा खर्च येणार असून, ९० टक्के खर्च करण्याची तयारी केंद्राने दर्शविली आहे. ठाणे जिल्ह्यात धरण बांधल्यामुळे नाशिक, नगरमधील सर्व धरणे पूर्ण भरतीलच, शिवाय जायकवाडी धरणदेखील भरले जाईल; त्यामुळे पाण्यावरून निर्माण होणारे वाद होणार नाहीत.

नाशिक, अहमदनगर येथील पाणीप्रश्न सोडविण्यासाठी दमणगंगा-पिंजाळ आणि तापी-नर्मदा या दोन्ही प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली असून, १ लाख कोटी रुपये सिंचनासाठी मंजूर करण्यात आलेले आहेत, असे गडकरी यांनी म्हणाले. निफाड येथे ड्रायपोर्टला मंजुरी मिळाली असल्याचे सांगून विक्रीकरावरून प्रकरण अडले अाहे, असेही गडकरी या वेळी म्हणाले.

 

इतर ताज्या घडामोडी
नांदेड, परभणी, हिंगोलीत पाऊसनांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील २८...
सांगली जिल्ह्यातील ४६८ गावांमधील...सांगली  : जिल्ह्यात ४६८ गावांमधील गावठाणांचा...
लातूर, उस्मानाबाद, जालना, बीड...लातूर : लातूर, उस्मानाबाद, जालना आणि बीड...
अकोला जिल्ह्यात दुबार पेरणीचे संकटअकोला ः पावसाचा खंड आणि त्यातच दिवसाचे...
जलसंधारण कामासाठी जलशक्ती योजना :...वाल्हे, जि. पुणे  : राज्यात जलयुक्त...
अनधिकृत बंधारे काढण्यासाठी ‘स्वाभिमानी’...नगर  : भंडारदरा धरणापासून ते ओझर...
बचत गटांना प्रोत्साहनासाठी ‘हिरकणी...सोलापूर  : राज्याच्या औद्योगिक आणि आर्थिक...
केरळच्या धर्तीवर काजू प्रक्रिया ...रत्नागिरी  ः परदेशी चलन मिळवून देणाऱ्या काजू...
`गोकुळ` मल्टिस्टेटमुळे शेतकऱ्यांचा...मुंबई : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक...
संगमनेर तालुक्यातील लिंबू बागांना घरघर संगमनेर, जि. नगर : दर्जेदार कागदी लिंबांच्या...
दूध वाहतुकीतून रेल्वेला ६ कोटी १२ लाख...दौंड, जि. पुणे  : दौंड रेल्वे स्थानकावरून...
कृषक विकिरण केंद्रातून अमेरिका, ...नाशिक  : जिल्ह्यातील लासलगाव येथील कृषक...
आसाम, बिहारमध्ये पुराचे ११४ बळीनवी दिल्ली: आसाम आणि बिहारमध्ये पुराचे थैमान...
सौरऊर्जेमुळे शेतकऱ्यांना मुबलक वीज...कोल्हापूर ः शेतकऱ्यांना दिवसा व उद्योगांना स्वस्त...
उशिरा पेरणीसाठी पीक नियोजन आतापर्यंत पडलेला पाऊस व पुढे येणारा पाऊस याचा...
परभणी जिल्ह्यात साडेचार लाख हेक्टरवर...परभणी : जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...
कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे काही आमदार लवकरच...सोलापूर : कॉंग्रेस-राष्ट्रवादीतील अनेक विद्यमान...
पीकविमा प्रश्‍न आठ दिवसांत सोडवा : `...सोलापूर : शेतकऱ्यांनी विमा काढावा, यासाठी...
विमा कंपन्यांविरोधात किसान सभेचा तीन...औरंगाबाद : पंतप्रधान पीकविमा योजनेतील सदोष तरतुदी...
बागलाणात खरीप हंगामातील पिके धोक्यात नाशिक : या वर्षी बागलाण तालुक्यातील रोहिणी, मृग व...