Agriculture news in marathi Danger of Congo fever in animals | Agrowon

जनावरात ‘काँगो फिवर’चा धोका

टीम अॅग्रोवन
रविवार, 4 ऑक्टोबर 2020

मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव जगभरात वाढत असताना आता ‘क्रायमिन काँगो हेमोरेजिक फीव्हर’ या आजाराचा धोका निर्माण होऊ लागला आहे.

मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव जगभरात वाढत असताना आता ‘क्रायमिन काँगो हेमोरेजिक फीव्हर’ या आजाराचा धोका निर्माण होऊ लागला आहे. बाधित जनावरांच्या संपर्कात आल्यास किंवा त्याचे मांस खाल्ल्यास हा आजार मानवाला होतो, असा निष्कर्ष काढत पालघर जिल्ह्यातील आरोग्य विभागाने यासंबंधी धोक्याची सूचना दिली आहे.

ठाणे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणाही सतर्क झाली आहे. गुजरातमधील सीमावर्ती भागात काँगो तापाची लक्षणे दिसल्याने पालघरपाठोपाठ ठाणे जिल्ह्यातही यंत्रणांना दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.

पशुसंवर्धन विभागाकडून गोचिड निर्मूलन कार्यक्रम हाती घेण्यास सुरुवात करण्यात आली आहे. त्यानुसार जनावरे आणि गोठ्यामध्ये गोटिडनाशकाची फवारणी करण्यात येत आहे. तसेच गुजरात राज्यातून जनावरांची वाहतूक होणार नाही, याकडे लक्ष ठेवले जात आहे. गुजरातमधील कच्छ आणि बोताड जिल्ह्यांमध्ये काँगो फीव्हर या आजाराचे रुग्ण आढळून आले आहेत. जनावरांवरील गोचीड, पिसवा यामुळे हा आजार होतो, असा प्राथमिक निष्कर्ष आहे. 

एखाद्या बाधित जनावरांच्या रक्ताशी संपर्क झाल्यास किंवा बाधित जनावराचे मांस खाल्ल्यास हा आजार बळावत असल्याचे समोर आले आहे. गुजरातमधून शेळी, मेंढी यांची मोठ्या प्रमाणात पालघर, ठाणे आणि मुंबईमध्ये वाहतूक होत असते. त्यामुळे पालघरमध्ये इशारा देण्यात आला आहे. गुजरातमधून येणाऱ्या या जनावरांची पालघरच्या तपासणी नाक्यांवर चाचणी केली जात आहे.
ठाणे जिल्हा हा पालघर जिल्ह्याला लागून आहे. तसेच गुजरातहून आलेल्या जनावरांची पालघर मार्गे ठाण्यात वाहतूक केली जाते.

तपासणी इशाऱ्यामुळे ठाणे जिल्ह्याला सध्या तरी या रोगाचा धोका नाही, असे आरोग्य यंत्रणेकडून स्पष्ट करण्यात आले. तरीही जिल्ह्यातही पशुसंवर्धन विभागाकडून उपाययोजना सुरू आहेत.  २०१२ च्या पशुगणनेनुसार जिल्ह्यात सुमारे ७ लाख २६ हजार पशुधन आहे. त्यामुळे वाहतूक रोखण्यासोबतच गाई, बैल, मेंढी, बकरे यांच्यासह इतर पाळीव जनावरे आणि भटक्या प्राण्यांवर गोचीड निर्मूलनासाठी फवारणी केली जाणार आहे, तर तालुका पातळीवरही या संदर्भात बैठकांचे आयोजन केले जात आहे. 

‘काँगो ताप’ काय आहे?

एखाद्या बाधित जनावराच्या संपर्कात आल्यास मानवाला हा आजार होण्याची शक्यता असते. तसेच हा आजार बळावल्यास मृत्यूचे प्रमाण ३० टक्के आहे. या आजारावर अद्याप उपचार उपलब्ध नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांनी आणि पशुपालकांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना करून नियंत्रण मिळवणे 
आवश्यक आहे.

      आजाराची लक्षणे

  • बाधित व्यक्तींमध्ये सुरुवातीला डोके दुखणे, जास्त ताप येणे, सांधेदुखी, पोटदुखी, उलटीचा त्रास.
  • डोळे लाल होणे, घशात तसेच जबड्याच्या वरच्या भागात फोडी येणे
  • आजार बळावल्यास रक्तस्राव, नाकातून रक्त
  • मृत्यूचे प्रमाण ३० टक्के

    प्रतिबंधात्मक उपाय

  • शेतकरी, पशुपालक, पशुवैद्यकांनी गोठ्याची स्वच्छता राखावी, मुखपट्टी, हातमोजे, पायांना पूर्ण झाकणाऱ्या बुटांचा वापर.
  • रोगाचा प्रसार आणि प्रादुर्भाव टाळण्यासाठी जागृतीवर भर, गोचिड निर्मूलन कार्यक्रम कीटकनाशक फवारणी.
  • गोचिड हाताने काढणे वा मारणे कटाक्षाने टाळावे

ठाणे जिल्ह्याला ‘काँगो फीव्हर’ आजाराचा अद्याप धोका नाही. मात्र, जिल्ह्यात आम्ही सर्व ठिकाणी गोचीड निर्मूलन कार्यक्रम हाती घेतला आहे. तसेच पशुपालन करणाऱ्यांनाही या आजाराची माहिती देत आहोत.
– डॉ. व्ही. व्ही. धुमाळ, उपायुक्त, पशुसंवर्धन विभाग, ठाणे जिल्हा


इतर ताज्या घडामोडी
ट्रायकोडर्मा वापरण्याच्या पद्धतीट्रायकोडर्मा ही उपयुक्त बुरशी असून, ती रोपांच्या...
जनावरांचे पावसाळ्यातील व्यवस्थापनपावसाळ्यात होणाऱ्या वातावरणातील अचानक बदलामुळे...
खानदेशात अत्यल्प पेरणीजळगाव ः खानदेशात या महिन्यात अपवाद वगळता हवा तसा...
नांदेडमध्ये सोयाबीनचे क्षेत्र वाढण्याची...नांदेड : जिल्ह्यात यंदा चार लाख हेक्टरवर...
परभणीत १२.६४ टक्के पेरणीपरभणी ः जिल्ह्यात यंदाच्या (२०२१) खरीप हंगामात...
देशात वीज पडून दरवर्षी दोन हजार...पुणे : हरिताच्छादन कमी झाल्याने होणारी तापमान वाढ...
कांदा उत्पादक शेतकऱ्याचा प्रामणिकपणानाशिक : जगात प्रामाणिकपणा लोप पावत चालला असल्याची...
अन्नद्रव्यांवरून खतांचे व्यवस्थापन...गेवराई, जि. बीड : जमिनीतील उपलब्ध...
आंबेओहळ प्रकल्पात  ३० टक्के पाणीसाठाकोल्हापूर : आजरा तालुक्यात असलेल्या आंबेओहळ...
वनौषधी पानपिंपरीचे दर वाढल्याने...अकोला ः जिल्ह्यात सातपुड्याच्या पायथ्याशी अकोट,...
नुकसान टाळण्यासाठी  मिश्र पिकांवर भरराळेगाव, जि. यवतमाळ : गेल्या वर्षी कपाशीवर आलेली...
यवतमाळमध्ये अनधिकृत खतांचा साठा जप्तयवतमाळ : परवान्यात नसतानाही खतांचा अनधिकृतपणे...
सांगली जिल्ह्यात खरिपाची २५ टक्के...सांगली : जिल्ह्यात खरीप हंगामाचे सरासरी क्षेत्र २...
सूक्ष्म खाद्य उन्नयन योजनेसाठी अर्ज...वाशीम : जिल्ह्यात २०२०-२१ ते २०२४-२५ या...
पुण्याचा पर्यटन विकास आराखडा तयार करा पुणे : जिल्ह्याच्या पर्यटन विकासासाठी सविस्तर...
प्रताप सरनाईकांचे ठाकरेंना पत्र; ...मुंबई : शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी...
काळानुरूप बदल स्वीकारा : नितीन गडकरीवर्धा : बाजार समित्यांनी केवळ शेतमाल खरेदी विक्री...
संत्रा आयात शुल्कप्रकरणी बांगलादेशशी...अमरावती : नागपुरी संत्र्याचा सर्वात मोठा आयातदार...
मॅग्नेट ः फलोत्पादन पिकांसाठी एकात्मिक...राज्यातील कृषी हवामान विभागनिहाय फळे, भाजीपाला व...
शेतीवरील आर्थिक ताण कमी करण्यासाठी...हरितक्रांतीनंतर काही दशकांमध्ये विपरीत परिणाम...