नाशिक जिल्ह्यात उसाची धोकादायक वाहतूक सुरू

ट्रॅक्टरवर टेप चालू असल्याने चालकाला पाठीमागील गाड्यांचा हॉर्न ऐकू येत नाही. त्यामुळे वळण घेताना अडचणी येतात. ट्रॅक्टरमागे रात्री काहीही चिन्हांकित स्वरूपाचे साहित्य बसविण्यात न आल्याने उसाच्या ट्रॅक्टरमुळे अपघात झाले आहेत. वाहतूक विभागाने लक्ष देऊन त्यांना नियम घालून द्यावेत. त्यामुळे शिस्त लागेल. अपघात टाळता येतील. - शांताराम कमानकर, भेंडाळी, ता. निफाड
Dangerous traffic of sugarcane started in Nashik district
Dangerous traffic of sugarcane started in Nashik district

नाशिक : जिल्ह्यातील विविध साखर कारखान्यांचे गळीत हंगाम बंद आहेत. परिणामी, ऊस उत्पादकांना शेजारच्या तालुक्यातील कारखान्यांना ऊसपुरवठा करण्याची वेळ आली आहे. विविध भागांतून उसाची वाहतूक सुरू आहे.

वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून सर्रासपणे दोन ट्रोली जोडून उसाची वाहतूक केली जात असल्याचे चित्र निफाड तालुक्यातील विविध रस्त्यांवर दिसत आहे. त्यामुळे वाहतुकीत अडथळे येण्यासह अपघात होण्याची मोठी शक्यता आहे. वाहतूक यंत्रणेचे याकडे सर्रासपणे दुर्लक्ष होत आहे. 

 जिल्ह्यात गाळप करण्यासाठी ऊसतोडी सुरू आहेत. मात्र उसाची अवैध वाहतूक सुरू आहे. ऊसतोडणी कामगारांनी तोडणी केल्यानंतर ट्रॅक्टरला जोडलेल्या ट्रॉलीमध्ये ऊस अधिक प्रमाणावर भरून वाहतूक करण्यात येत आहे. वजनापेक्षा जास्त भरती व एक ट्रॅक्टररला दोन ट्रॉली जोडून महामार्गावरून सर्रासपणे अवैधपणे उसाची वाहतूक सुरू आहे. अशा धोकादायक ऊस वाहतुकीमुळे मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

वाहतुकदराला साखर कारखान्याकडून उसाच्या वजनानुसार भाडे अदा करण्यात येते. म्हणून ट्रॅक्टरचालक क्षमतेपेक्षा अधिक ऊस ट्रॉलीमध्ये भरतात. त्यासाठी सर्रास दोन ट्रॉलींचा वापर करण्यात येतो. एका ट्रॉलीची क्षमता १४ ते १५ टन इतकी असते. परंतु, यामध्ये १८ ते २० टन ऊस भरण्यात येतो, असे ट्रॅक्टरचालक सांगतात. नफा कमाविण्यासाठी बेकायदा अधिक ऊस भरला जात असल्याने हा प्रकार इतरांचा जीव घेणारा ठरू शकतो.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com