Agriculture news in marathi, DAP available in Nashik district; No supply to farmers | Agrowon

नाशिक जिल्ह्यात डीएपी उपलब्ध; शेतकऱ्यांना पुरवठा होईना

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 11 नोव्हेंबर 2021

नाशिक : खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे मोठा फटका बसला. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे सर्व अपेक्षा रब्बीवर आहेत. मात्र आता रब्बी हंगामात पेरणीच्या वेळी डीएपी खताची टंचाई जाणवू लागली आहे.

नाशिक : खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे मोठा फटका बसला. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे सर्व अपेक्षा रब्बीवर आहेत. मात्र आता रब्बी हंगामात पेरणीच्या वेळी डीएपी खताची टंचाई जाणवू लागली आहे. डीएपी विक्रेत्यांकडे उपलब्ध असताना पुरवठा होईना, अशी स्थिती असल्याने शेतकऱ्यांसमोर अडचणी वाढल्या आहेत. 

कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सर्वाधिक मागणी ही एनपीके संयुक्त खतांची आहे. त्यापैकी सर्वाधिक १ लाख ४ हजार टन पुरवठा मंजूर आहे. तुलनेत डीएपीची रब्बीसाठी मागणी २१ हजार मे. टन आहे. त्यापैकी २० हजार १८० मे.टन पुरवठा मंजूर आहे. चालू नोव्हेंबर महिन्यासाठी ३ हजार २७ टन पुरवठा मंजूर आहे. त्यापैकी २ हजार २३०६ मे टन साठा विक्रेत्यांकडे ई-पॉस प्रणालीवर उपलब्ध असल्याचे कृषी विभागाने माहिती दिली. मात्र ती शेतकऱ्यांसाठी उपलब्ध नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे इतर खतांच्या तुलनेत उपलब्धता कमी असल्याचे स्पष्ट झाले आहे.  

मागणीच्या तुलनेत पुरवठ्यात तफावत दिसून येत आहेत. त्यात दरात गोणीमागे ३०० ते ४०० रुपयांनी वाढ झाल्याची शेतकऱ्यांची ओरड आहे. त्यात ज्या ठिकाणी डीएपी उपलब्ध आहेत. अशा भागात दुसरी खते लिंक करून माथी मारली जात असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. येवला तालुक्यातील शेतकऱ्यांनी सांगितले की, ठराविक १०:२६:२६, डीएपी या खतांचा तुटवडा निर्माण केला जात आहे. त्यामध्ये प्रामुख्याने डीएपीचा समावेश आहे. १८:४६: ० प्रकारातील खतांच्या रॅक अद्याप लागलेल्या नाहीत. तर इतर खते अपेक्षित मात्रेत मिळत नसल्याची स्थिती आहे.

शेतकऱ्यांना डीएपी, युरिया ही खते मिळत नाहीत. विक्रेते इतर खते व स्कीममध्ये खरेदी केलेली उत्पादने शेतकऱ्यांच्या माथी मारतात. बिलेही देत नाहीत. बिलाची मागणी केली तर खते मिळत नाहीत. कृषी विक्रेत्यांच्या कामकाजात पारदर्शकता नाही.

- निवृत्ती न्याहारकर, संपर्क प्रमुख, संघर्ष शेतकरी संघटना

गेल्या सहा महिन्यांनापासून डीएपी उपलब्ध होत नसल्याची स्थिती आहे. सध्याच्या दरात उत्पादन खर्च परवडत नसल्याचे कंपन्यांचे म्हणणे आहे. कृषी विभागाकडे पाठपुरावा केल्यास रॅक उपलब्ध नसल्याचे ते सांगतात. सर्वच खतांचे दर वाढल्याने शेतकऱ्यांची मोठी ओरड होते आहे. शेतकऱ्यांना पुरवठा व दरात दिलासा मिळणे गरजेचे आहे.

- जगदीश पवार, संचालक, माफदा, पुणे 


इतर बातम्या
22 तारखेला कुठे होणार पाऊस?20 तारखेला दिवसभर राज्यातले हवामान कोरडे...
पंजाबात मोहरीच्या क्षेत्रात वाढ, मात्र...वृत्तसेवा - पंजाबमध्ये मोहरीची लागवड ३३ हजार...
लाळ्या खुरकूत साथीमुळे मलिग्रेत चार...आजरा, जि कोल्हापूर ः मलिग्रे पंचक्रोशीत लाळ्या...
वारणा साखर कारखान्याची निवडणूक...वारणानगर जि. कोल्हापूर : येथील श्री. तात्यासाहेब...
संपादित जमिनीला वाढीव मोबदला द्या अकोला : जिल्ह्यातील पारस येथील औष्णिक विद्युत...
ज्युनिअर आर. आर पाटलांनी कवठेमहांकाळचं...सांगली - संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या...
गडचिरोलीचे हत्ती गुजरातला नेण्याचा घाटगडचिरोली : जिल्ह्यातील सिरोंचा वनविभागातील अहेरी...
उन्हाचा चटका वाढला, गारठा ओसरला पुणे : राज्यात उन्हाचा चटका वाढू लागला असल्याने...
साखर कारखान्यांच्या माल तारण  कर्जावरील...कोल्हापूर : साखर कारखान्यांच्या माल तारण...
खते मुबलक; पण किंमत जादा पुणे : राज्यात रब्बी हंगामात रासायनिक खतांची...
ज्येष्ठ विचारवंत डॉ. एन. डी. पाटील...कोल्हापूर ः ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत, माजी...
खानदेशात कांदा पिकाची दहा हजार हेक्टरवर...जळगाव ः खानदेशात कांदा पिकाची लागवड सुरूच आहे....
कांदाच बनला टुमदार बंगल्याची ओळख नाशिक ः  या नभाने या भुईला दान...
ईश्‍वेद समूहाच्या टिश्‍युकल्चर ...अकोला : सिंदखेडराजा येथील ईश्‍वेद बायोटेक टिश्‍...
कापूस आयात शुल्क  रद्दच्या विषयावरील...जळगाव ः कापसावरील आयात शुल्क रद्द करण्यासह वायदा...
नाशिकच्या स्टार्टअपचा राष्ट्रीय पातळीवर...नाशिक : केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष...
तूर विक्रीसाठी शेतकऱ्यांची  खुल्या...अमरावती : सोयाबीन व कापसानंतर खरीप हंगामातील...
‘गिरणा’चे वस्त्रहरण करणाऱ्यांवर कारवाई...चाळीसगाव, जि. जळगाव ः जळगाव जिल्ह्याची जीवनवाहिनी...
चांदवडमध्ये कांदा लिलाव सुरूनाशिक : अकरा जानेवारीपासून सोमवार (ता. १७) पर्यंत...
पुणे विभागात रब्बीतील कांदा लागवडीत वाढपुणे : आगामी काळात कांद्याला चांगले दर...