Agriculture News in Marathi DAP will not be expensive | Agrowon

  ‘डीएपी’ महागणार नाही 

टीम अॅग्रोवन
रविवार, 17 ऑक्टोबर 2021

रब्बी हंगामात देशातील खत उत्पादक कंपन्यांना साडेसहा हजार कोटींपेक्षा जास्त अतिरिक्त अनुदान मंजूर करण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना ‘डीएपी’सह इतर रासायनिक खतांचा सुरळीत व किफायतशीर दरात पुरवठा होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

पुणे : रब्बी हंगामात देशातील खत उत्पादक कंपन्यांना साडेसहा हजार कोटींपेक्षा जास्त अतिरिक्त अनुदान मंजूर करण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना ‘डीएपी’सह इतर रासायनिक खतांचा सुरळीत व किफायतशीर दरात पुरवठा होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

डीएपीला जादा ४३८ रुपये अनुदान 
एक ऑक्टोबर २०२१ ते ३१ मार्च २०२२ या कालावधीत रब्बी हंगामातील खत वापराचा कालावधी गृहीत धरला जातो. या कालावधीत ५० किलोच्या डीएपी १८:४६:०:० गोणीसाठी ४३८ रुपये, तर एनपीएस २०:२०:०:१३, एनपीके १०:२६:२६:० आणि एनपीके १२:३२:१६च्या गोणीसाठी प्रत्येकी १०० रुपये अतिरिक्त अनुदान मिळणार आहे. 
या शिवाय रब्बी हंगामात अन्नद्रव्यनिहाय अनुदानाचे दरदेखील केंद्राने घोषित केले आहेत. या दरांकडे खत उद्योगाचे लक्ष लागून असते. नत्रासाठी प्रतिकिलो १८.७८९ रुपये, स्फुरद ४५.३२३ रुपये, पालाश १०.११६ तर गंधकाकरिता २.३७४ रुपये अनुदान दर असेल. अतिरिक्त अनुदानाचा चांगला निर्णय बघता डीएपीसाठी ५,७१६ कोटी रुपये, तर अन्य तीन संयुक्त श्रेणींसाठी ८३७ कोटी रुपये जादा मिळणार आहेत. रब्बीच्या हंगामातील सर्व श्रेणींवर एकूण २८ हजार ६५५ कोटी रुपयांपेक्षा जास्त अनुदान सरकारकडून वाटले जाणार आहे. 

चार श्रेणींना लाभ : झेंडे 
राज्याचे कृषी संचालक दिलीप झेंडे (निविष्ठा व गुणनियंत्रण विभाग) यांच्या म्हणण्यानुसार, डीएपी, २०:२०:०:१३, १०:२६:२६ व १२:३२:१६ या चार श्रेणींचा वापर राज्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात करतात. केंद्राने दिलेल्या विशेष पॅकेजमुळे खतांच्या किमती परवडणाऱ्या पातळीत राहतील. मात्र माती परीक्षण अहवालाप्रमाणेच शेतकऱ्यांनी रासायनिक खतांचा संतुलित वापर करावा. त्यासाठी कृषिक ॲपचा वापर मार्गदर्शक ठरू शकतो. 

दरम्यान, मळीपासून उत्पादित पालाश (पीडीएम) या खताचा प्रथमच अनुदानात समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे साखर कारखान्यांना उत्पन्नाचे एक नवे साधन मिळणार आहे. त्याच वेळी पालाश आयातीवरील अवलंबित्व काही प्रमाणात कमी होणार आहे. मात्र सर्वांत जास्त वापर होणाऱ्या युरियाची किंमत २६६.५० रुपये (प्रति ४५ किलो गोणी) यापुढेही स्थिर राहणार आहे, असे कृषी विभागाचे म्हणणे आहे. 

जादा रक्कम देऊ नका : कलंत्री 
ऑल इंडिया अॅग्रो इनपुट डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष मनमोहन कलंत्री म्हणाले, ‘‘डीएपीचा दर विदेशी बाजारात ५० किलोसाठी २८५० रुपये झाला आहे. सरकारकडून पूर्वीपासून डीएपीला १२१२ अनुदान मिळत होते. ते कमी पडत असल्याने किमती वाढतील, अशी अटकळ होती. एकतर अतिवृष्टीने खरीप हंगाम नष्ट झालेला आहे. त्यात पुन्हा रब्बीसाठी खतांच्या किमतीचे संकट शेतकऱ्यांसमोर होते. पण आता सरकारकडून डीएपीला ४३८ रुपये जादा म्हणजेच एकूण १६५० रुपये अनुदान मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना रब्बीत ५० किलोची गोणी केवळ १२०० रुपयांमध्ये मिळेल. त्यामुळे शेतकऱ्यांनी जादा रक्कम देऊ नये.’’ 

...असे आहेत अनुदानाचे दर 
केंद्राकडून युरियासह २४ श्रेणींमधील रासायनिक खतांना अनुदान दिले जाते. ते थेट खत उत्पादक कंपन्यांना मिळते. रब्बीसाठी ५० किलोच्या गोणीमागे वाटले जाणारे अनुदान असे ः डीएपी १८:४६:०:०- १२१२ रुपये, एमओपी ०:०:६०:० - ३०४ रुपये, एसएसपी (जी) ०:१६:०:११- ३७६ रुपये, एनपीएस २०:२०:०:१३-६५७ रुपये, एनपीके १०:२६:२६:०-८१५ रुपये, एनपी २०:२०:०:०-६४१ रुपये, एनपीके १५:१५:१५-५५७ रुपये, एनपी २४:२४:०:०-७६९ रुपये, एएस २०.५:०:०:२३-२२० रुपये, एनपी २८:२८:०:० -८९८ रुपये, एनपीके १७:१७:१७-६३१ रुपये, एनपीके १९:१९:१९-७०५ रुपये, एनपीके १६:१६:१६:०-५९४ रुपये, टीएसपी ०:४६:०:०-१०४२ रुपये, एनपीके १२:३२:१६-९१९ रुपये, एनपीके १४:२८:१४-८३७ रुपये, एनपीकेएस १५:१५:१५:०९-५६७ रुपये, एनपी १४:२८:०:०-७६६ रुपये, एनपीके ८:२१:२१-६५७ रुपये, एनपीके ९:२४:२४-७५० रुपये, पीडीएम (०:०:१४.५:०)-७३ रुपये, एनपीएस १६:२०:०:१३-६१९ रुपये, एनपीके १४:३५:१४-९९६ रुपये, एनपीएस २४:२४:०:८-७६९ रुपये, एमएपी ११:५२:०:०-१२८२ रुपये.
 


इतर बातम्या
कापूस उत्पादकांचा बळी नकोकापसाचे दर वाढल्यामुळे कापूस प्रक्रिया...
मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कोकणात...पुणे : राज्यात सुरू असलेला पाऊस कमी होण्याची...
रब्बी पिकांसह फळबागांना फटकापुणे ः राज्यात मागील तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण...
ढगाळ वातावरणामुळे पिकांवर किडींचा...परभणी ः परभणी, हिंगोली जिल्ह्यांत गेल्या काही...
ऊस वाहतूक दरासाठी टप्पा पद्धतीला...पुणे ः उसाची तोडणी व वाहतूक दर ठरवताना आधीची...
आंदोलनातील मृत शेतकऱ्यांची सरकारकडे...नवी दिल्ली : कृषी कायदे रद्द करण्यासाठी झालेल्या...
उन्हाळी कांद्याच्या घसरलेल्या दरामुळे...नाशिक : साठवलेल्या उन्हाळी कांद्याचा हंगाम अंतिम...
जळगाव जिल्ह्यात २५ हजार कृषिपंपांची वीज...जळगाव ः  जिल्ह्यात वीजबिले भरल्याशिवाय...
सोयाबीन वायद्यांत सुधारणापुणे ः बाजारात सोयाबीनचे दर पडल्यानंतर केंद्रीय...
वऱ्हाडावर ढगांचे आच्छादन;  तूर, हरभरा...अकोला ः हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार...
यवतमाळ जिल्ह्यात शाळा  महावितरणच्या ‘...यवतमाळ : वीज महावितरण कंपनीची वाढती थकबाकी वसूल...
शेतकरी संघटनेने केली  चुकीच्या...बुलडाणा : थकीत वीजबिल वसुलीसाठी महावितरणने...
‘फॅसिझमविरोधात लढण्यास  सक्षम पर्याय...मुंबई : देशात सुरू असलेल्या फॅसिझमविरोधात लढण्यास...
आझाद मैदानावर बुधवारपासून  गट सचिवांचे...सांगली ः राज्यातील गट सचिवांचे सेवा व वेतनाचे...
विमा कंपनीच्या कार्यालयात  मुक्काम...जालना : मोसंबीचा विमा संरक्षण कालावधी १५ सप्टेंबर...
पीडीसीसी’च्या निवडणुकीसाठी २९ अर्ज दाखल पुणे : राज्यात अग्रेसर असलेल्या पुणे जिल्हा...
मालेगांव पाटबंधारे विभागात पाटपाणी व...नाशिक : रब्बी हंगाम २०२१-२२ मध्ये पिण्यासाठी व...
मराठवाड्यात ढगांची दाटी; भुरभुर औरंगाबाद : मराठवाड्यातील बहुतांश भागात पुन्हा...
खानदेशात लाल कांद्याचे दर नीचांकी...जळगाव ः खानदेशात लाल कांद्याचे दर नीचांकी स्थितीत...
सोलापूर ः ‘सिद्धेश्‍वर’चे गाळप चार...सोलापूर ः सहवीजप्रकल्प, गाळपक्षमता वाढवणे, बॉयलर...