Agriculture news in Marathi Dapoli Agricultural University distributes seeds on the dam | Agrowon

दापोली कृषी विद्यापीठातर्फे बांधावर बियाणे वाटप

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 26 मे 2020

रत्नागिरी ः दापोली कृषी विद्यापीठाच्या विस्तार शिक्षण विभागातर्फे खरीप हंगामासाठी विविध उपक्रम राबविले जातात. दरवर्षीप्रमाणे महाविद्यालयाने घेतलेली दत्तक खेडी व त्या परिसरातील गावांमध्ये खरीप हंगामात भात, नागली व भाजीपाला बियाणे वाटप करण्यात आले.

रत्नागिरी ः दापोली कृषी विद्यापीठाच्या विस्तार शिक्षण विभागातर्फे खरीप हंगामासाठी विविध उपक्रम राबविले जातात. दरवर्षीप्रमाणे महाविद्यालयाने घेतलेली दत्तक खेडी व त्या परिसरातील गावांमध्ये खरीप हंगामात भात, नागली व भाजीपाला बियाणे वाटप करण्यात आले.

या विभागामार्फत खरीप हंगामात प्रात्यक्षिकांकरिता विद्यापीठाने विकसित केलेल्या भाताच्या ट्रॉम्बे कर्जत कोलम, कर्जत-१०, कर्जत-८, रत्नागिरी-८, रत्नागिरी-६ नाचणीच्या दापोली-२ आणि दापोली सफेद -१ तसेच भाजीपाला बियाण्यांमध्ये कोकण कारली, पडवळ (कोकण श्‍वेता), कोकण घोसाळी, दोडकी (कोकण हरीता), भेंडी (वर्षा उपहार) आणि कोकण वाली या बियाण्यांचे दापोली तालुक्‍यातील सडवे, साखळोली, वाकवली, इनामपांगारी, जालगांव व खेड तालुक्‍यातील उधळे, कळंबणी व मंडणगड तालुक्‍यातील दहागाव येथील

शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन वाटप करण्यात आले. ग्राम बीजोत्पादन कार्यक्रमाअंतर्गत ट्रॉंम्बे कर्जत कोलम, कर्जत-२ हे भात बियाणे, दापोली-२ व नागली बियाणे दहागांव (मंडणगड), वाकवली, असोंड, उंबर्ले, ओळंगाव, इनामपांगारी (ता. दापोली) या गावातील निवडक शेतकऱ्यांच्या बांधावर सामाजिक अंतर ठेवून वाटप करण्यात आले.

यावेळी विभागाचे वरिष्ठ संशोधन सहायक प्रवीण झगडे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना खरीप हंगामातील वाटप करण्यात आलेल्या बियाण्याची माहिती सांगितली. सध्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाबाबत शेतात काम करताना कोणती काळजी घ्यावी, याबाबत मार्गदर्शन केले. हा कार्यक्रम विस्तार शिक्षण विभागाचे प्रमुख डॉ. प्रमोद सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली झाला.

 


इतर ताज्या घडामोडी
वऱ्हाडातील शेतकऱ्यांचा सोयाबीनकडे अधिक...अकोला ः खरिपातील पेरण्या अंतिम टप्प्यात पोचल्या...
औरंगाबादमध्ये निम्म्याच शेतकऱ्यांची मका...औरंगाबाद  : जिल्ह्यात आधारभूत किमतीने भरड...
नांदेड, परभणी, हिंगोलीतील १२४ मंडळांत...नांदेड  ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील...
औरंगाबाद जिल्ह्यात आठवड्यात १५१ खत कृषी...औरंगाबाद : ‘‘कृषी विभाग व जिल्हा परिषद...
दुभत्या जनावरांच्या किमतीतही चाळीस...नगर ः दुधाचे दर कमी-जास्ती झाले की दुभत्या...
रत्नागिरीत नऊ हजार हेक्टरवर फळबाग...रत्नागिरी  ः कोरोनाच्या सावटातही जिल्ह्यात...
हमाल, मापाडी तोलणारांचे प्रश्‍न सोडवा ः...पुणे ः राज्यातील अनेक भागांत हमाल तोलाईदारांना...
खते, बी- बियाणे विक्रेत्यांची दुकाने...कोल्हापूर : निकृष्ट बियाणे प्रकरणी बियाणे...
‘सारथी’ बंद होणार नाही, आठ कोटींचा निधी...मुंबई : राज्य सरकारने मराठी तरुणांच्या व्यावसायिक...
फळपीक विमा योजना शेतकऱ्यांसाठी की कंपन्...नगर : नवीन निकषांप्रमाणे फळपीक विमा योजनेचा लाभ...
वऱ्हाडातील अडीच हजारांवर कृषी...अकोला ः कृषी विक्रेत्यांच्या विविध मागण्यांसाठी...
हिंगोली जिल्ह्यात आतापर्यंत ७१.२० टक्के...हिंगोली : जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात बुधवार...
पीकपद्धतीमधील बदल अधिक लाभदायक ः...अकोला ः रासायनिक खतांचा अवाजवी वापर, मशागतीच्या...
सोलापूर जिल्ह्याच्या वाट्याला ५६७ कोटी...सोलापूर : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
यवतमाळ जिल्ह्यात कर्जमुक्तीसाठी...यवतमाळ : महात्मा जोतिराव फुले कर्जमाफी योजनेतील...
सोयाबीनची पेरणी खानदेशात वाढलीजळगाव  ः खानदेशात तेलबियांमध्ये सोयाबीनचे...
सोलापुरात निकृष्ट सोयाबीन...सोलापूर  ः जिल्ह्यात निकृष्ठ सोयाबीनबाबत...
बागलाण तालुक्यात खत पुरवठा करून पिळवणूक...सटाणा, जि. नाशिक : बागलाण तालुक्यात गेल्या...
शेतकऱ्यांच्या प्रश्नी रयत क्रांती...नाशिक : खरिपाच्या तोंडावर सध्या शेती कामांना वेग...
मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेला दोन...मुंबई: मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रम...