सांगलीत दोन महिन्यांत डीएपीचा रॅक आलाच नाही 

सांगली : जिल्ह्यात रब्बी हंगामाची पेरणी ५२ टक्क्यांपेक्षा जास्त झाली आहे. डीएपी २ हजार ६२६ टन खत आले आहे. मात्र गेल्या दोन महिन्यांपासून डीएपीसह अन्य खतांचे रॅकच आले नाही.
सांगलीत दोन महिन्यांत डीएपीचा रॅक आलाच नाही
सांगलीत दोन महिन्यांत डीएपीचा रॅक आलाच नाही

सांगली : जिल्ह्यात रब्बी हंगामाची पेरणी ५२ टक्क्यांपेक्षा जास्त झाली आहे. डीएपी २ हजार ६२६ टन खत आले आहे. मात्र गेल्या दोन महिन्यांपासून डीएपीसह अन्य खतांचे रॅकच आले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना टंचाईचा सामना करावा लागत असल्याचे चित्र आहे. 

रब्बी आणि उन्हाळी हंगाम अशा दोन्ही हंगामांसाठी ११ हजार २५० टनांची मागणी केली आहे. आतापर्यंत जिल्ह्याला २६२६ टनांचा पुरवठा झाला आहे. सप्टेंबर ते मार्चअखेर प्रति महिन्याला खताचे रॅक येत असतात. मात्र गेल्या दोन महिन्यांपासून कोणत्याही खताचे रॅक आलेले नाही. वाळवा, पलूस, कडेगाव हे दोन तालुके वगळता अन्य तालुक्यांत गेल्या काही दिवसांपासून खतांची टंचाई भासू लागली आहे. 

लिंकिंग सुरूच...  कृषी निविष्ठा केंद्रात डीएपी खत खरेदी करण्यासाठी गेल्यानंतर शिल्लक नाही, पण तुम्ही दुसरी खते घेतली तरच तुम्हाला डीएपी खत मिळेल, असे काही कृषी निविष्ठा केंद्र चालकांकडून सांगण्यात येत असल्याने शेतकऱ्यांची कोंडी होत असल्याचे चित्र आहे. 

डीएपीचा स्टॉक  गेल्या दोन महिन्यांपासून डीएपीचे रॅकच आले नाही. त्यामुळे मोठ्या दुकानदारांनी डीएपीचा स्टॉक केला. यातील काहींनी कृषी सेवा केंद्रांना डीएपीचा पुरवठाच केला नाही. त्यामुळे जिल्ह्यात टंचाईस्थिती आहे. 

प्रतिक्रिया.. गेल्या महिन्यात मला डीएपी खत मिळाले. परंतु सध्या पिकाला डीएपी खत टाकण्याचे नियोजन केले असून दुकानातून खत मिळत नाही. परिसरामध्ये खताची टंचाई असल्याचे दिसत दिसत आहे.  - चन्नाप्पा तनांगी, वळसंग, ता. जत 

जिल्ह्यात सध्या ३६७३ टन डीएपी खताचा साठा आहे. डीएपी या खत किती शिल्लक आहे, हे अभ्यास करून सांगता येईल असे वाटते. डीएपी खताला पर्यायी खताचा मुकलक साठा आहे.  - विनायक पवार, कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद, सांगली. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com