agriculture news in marathi DAPs rack has not arrived in Sangli in two months | Page 2 ||| Agrowon

सांगलीत दोन महिन्यांत डीएपीचा रॅक आलाच नाही 

टीम अॅग्रोवन
बुधवार, 10 नोव्हेंबर 2021

सांगली : जिल्ह्यात रब्बी हंगामाची पेरणी ५२ टक्क्यांपेक्षा जास्त झाली आहे. डीएपी २ हजार ६२६ टन खत आले आहे. मात्र गेल्या दोन महिन्यांपासून डीएपीसह अन्य खतांचे रॅकच आले नाही. 

सांगली : जिल्ह्यात रब्बी हंगामाची पेरणी ५२ टक्क्यांपेक्षा जास्त झाली आहे. डीएपी २ हजार ६२६ टन खत आले आहे. मात्र गेल्या दोन महिन्यांपासून डीएपीसह अन्य खतांचे रॅकच आले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना टंचाईचा सामना करावा लागत असल्याचे चित्र आहे. 

रब्बी आणि उन्हाळी हंगाम अशा दोन्ही हंगामांसाठी ११ हजार २५० टनांची मागणी केली आहे. आतापर्यंत जिल्ह्याला २६२६ टनांचा पुरवठा झाला आहे. सप्टेंबर ते मार्चअखेर प्रति महिन्याला खताचे रॅक येत असतात. मात्र गेल्या दोन महिन्यांपासून कोणत्याही खताचे रॅक आलेले नाही. वाळवा, पलूस, कडेगाव हे दोन तालुके वगळता अन्य तालुक्यांत गेल्या काही दिवसांपासून खतांची टंचाई भासू लागली आहे. 

लिंकिंग सुरूच... 
कृषी निविष्ठा केंद्रात डीएपी खत खरेदी करण्यासाठी गेल्यानंतर शिल्लक नाही, पण तुम्ही दुसरी खते घेतली तरच तुम्हाला डीएपी खत मिळेल, असे काही कृषी निविष्ठा केंद्र चालकांकडून सांगण्यात येत असल्याने शेतकऱ्यांची कोंडी होत असल्याचे चित्र आहे. 

डीएपीचा स्टॉक 
गेल्या दोन महिन्यांपासून डीएपीचे रॅकच आले नाही. त्यामुळे मोठ्या दुकानदारांनी डीएपीचा स्टॉक केला. यातील काहींनी कृषी सेवा केंद्रांना डीएपीचा पुरवठाच केला नाही. त्यामुळे जिल्ह्यात टंचाईस्थिती आहे. 

प्रतिक्रिया..
गेल्या महिन्यात मला डीएपी खत मिळाले. परंतु सध्या पिकाला डीएपी खत टाकण्याचे नियोजन केले असून दुकानातून खत मिळत नाही. परिसरामध्ये खताची टंचाई असल्याचे दिसत दिसत आहे. 
- चन्नाप्पा तनांगी, वळसंग, ता. जत 

जिल्ह्यात सध्या ३६७३ टन डीएपी खताचा साठा आहे. डीएपी या खत किती शिल्लक आहे, हे अभ्यास करून सांगता येईल असे वाटते. डीएपी खताला पर्यायी खताचा मुकलक साठा आहे. 
- विनायक पवार, कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद, सांगली. 


इतर ताज्या घडामोडी
रब्बीसाठी खानदेशात आवर्तन सुटले गिरणा,...जळगाव ः  खानदेशात विविध प्रकल्पांमधून मागील...
उसाच्या थकीत रकमेसाठी शेतकऱ्यांचा...चोपडा, जि.जळगाव : चोपडा शेतकरी सहकारी साखर...
परभणी जिल्ह्यात ‘पोकरा’अंतर्गत योजनांचा...परभणी ः जिल्ह्यात नानाजी देशमुख कृषी संजीवनी...
कोल्हापूर बाजार समितीत शिवसेनेतर्फे...कोल्हापूर : ‘‘शेतकऱ्यांना बंदुकीची भाषा...
पीकविमा न मिळाल्यास अन्नत्याग आंदोलनऔरंगाबाद: ‘‘आमचा फळपीक विमा  व इतर पिकांचा...
रयत क्रांतीचा बडोदा बँकेवर आक्रोश मोर्चानांदेड : बँक ऑफ बडोदा शाखेकडून मुखेड तालुक्यातील...
सांगली जिल्हा बँकेच्या थकबाकी वसुलीसाठी...सांगली : जिल्हा बँकेची थकबाकी सुमारे ६५० कोटीहून...
मकर संक्रांतीसाठी सांगलीत गुळाची आवक...सांगली : संक्रांतीनिमित्त सांगली बाजार समितीत...
पुणे जिल्हा बँकेवर राष्ट्रवादीचे वर्चस्वपुणे : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या...
शेतकऱ्यांनाही थंडी जाणवते भाऊ!जलालखेडा, जि. नागपूर ः नरखेड तालुक्यात रब्बी...
‘मँगोनेट’ अंतर्गत सात वर्षांत ४, ५६६... रत्नागिरी : हापूसची परदेशात निर्यात होऊन येथील...
‘जलजीवन मिशन’च्या कामात सातारा अग्रेसरसातारा : जलजीवन मिशनअंतर्गत जिल्ह्यात २३७...
नाशिकमधील उन्हाळ कांद्याचा साठा अखेरीकडेनाशिक : फेब्रुवारी २०२१पासून उन्हाळ कांद्याची...
पाणीपट्टी ऊसबिलातून वसूल केल्यास आंदोलनसांगली ः  शेतकऱ्यांकडील पाणीपट्टीची रक्कम...
अकोला जिल्हा परिषदेत नववर्षातही राजकीय...अकोला ः गेले वर्षभर जिल्हा परिषदेत सुरू असलेले...
पुणे विभागात ज्वारी क्षेत्रात...पुणे : परतीच्या पावसाने चांगलाच धुमाकूळ घातल्याने...
येल्लकी वाणाच्या केळीला क्विंटलला चार...जळगाव  ः वढोदा (ता. चोपडा, जि. जळगाव) येथील...
घरच्या घरी भाजीपाल्यासाठी ‘जिजाई नॅनो...सोलापूर ः घरच्या घरी सेंद्रिय पद्धतीने आणि अगदी...
बलून बंधाऱ्यांसाठी गिरणा परिक्रमा सुरू जळगाव ः  गिरणा नदीवर प्रस्तावित बलून...
घाटणे बॅरेजमध्ये गेलेल्या जमीनीची...सोलापूर ः मोहोळ तालुक्यातील आष्टी उपसा सिंचन...