नवी दिल्ली : देशातील कोरोनाच्या संसर्गाची लाट अधिक तीव्र झाली असताना सर्वोच्च न्यायालयान
बातम्या
दरे खुर्दच्या पाण्याचा प्रश्न मार्गी
सायगाव, जि. सातारा ः दरे खुर्द, जावळेवाडी (ता.जावळी) येथे दरवर्षी उन्हाळ्यात पाणीटंचाई जाणवत होती. मात्र, यंदा सकाळ रिलीफ फंडातून मिळालेल्या निधीतून येथील तलावातील गाळ काढल्यामुळे तलाव पूर्ण क्षमतेने भरला आहे. त्यामुळे पाणीटंचाई भासणार नाही.
येथील तनिष्का गटाच्या माध्यमातून येथील तलावाचे खोलीकरण, रुंदीकरण व गाळ काढल्यामुळे येथील तलावामध्ये मोठा पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे दरवर्षी येथे जाणवणारी टंचाई जाणवणार नसल्याने ग्रामस्थ आनंद व्यक्त करीत असून, ‘सकाळ’ला धन्यवाद देत आहेत.

येथील सरपंच सखाराम पवार, उपसरपंच व तनिष्का सदस्या वैशाली मोरे, गटप्रमुख ललिता करंजकर, प्रदीप मोरे, चंद्रकांत साखरे यांच्या मार्गदर्शनाखाली तनिष्का गटाच्या माध्यमातून परिसरात मोरेवाडी, जावळेवाडी परिसरात असणाऱ्या इतर तलावांतीलही गाळ काढल्यामुळे परिसरातील शेतीसाठी असणाऱ्या विहिरीचा पाणीसाठा प्रथमच मोठ्या प्रमाणात वाढला आहे. अनेक वर्षांपासून येथील ओढेनाले पूर्णपणे आटले होते. मात्र, यंदा ते वाहत आहेत. परिसरातील विहिरींची पाणीपातळी वाढली आहे. परिसरातील छोटे-मोठे बंधाऱ्यातील गाळ काढल्याने व तलावाचे रुंदीकरण व खोलीकरण केल्यामुळे मोठा पाणीसाठा झाला आहे.
उन्हाळ्यात नेहमी दुष्काळाच्या झळा येथील गावांना बसत असत. यंदा ‘सकाळ’च्या माध्यमातून मिळालेल्या मदतीमुळे सध्या तलावात भरपूर पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे परिसरातील पिण्याच्या पाण्याचा व शेतीसाठी पाण्याचा प्रश्न मिटणार आहे.
- ललिता करंजकर, तनिष्का गटप्रमुख
- 1 of 1594
- ››