विधान परिषदेत दरेकर विरोधी पक्षनेते

Darekar opposition leader in Legislative Council
Darekar opposition leader in Legislative Council

नागपूर ः भाजप आमदार प्रवीण दरेकर यांची विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आल्याची घोषणा सभापती रामराजे निंबाळकर यांनी केली. दरेकर यांच्या नावाची घोषणा होताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि परिषदेचे सभागृहनेते सुभाष देसाई यांनी त्यांचे अभिनंदन केले. त्यानंतर त्यांना विरोधी पक्षनेतेपदाच्या आसनाजवळ नेण्यात आले. 

रामराजे निंबाळकर म्हणाले, ‘‘विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी प्रवीण दरेकर यांना मान्यता देण्यात यावी, अशी विनंती भाजपाने आपल्याकडे केलेली आहे. त्यांची सदस्यसंख्या लक्षात घेऊन अधिकृत विरोधी पक्ष म्हणून भाजपाला मान्यता देत आहे.’’

यापूर्वी धनंजय मुंडे विरोधी पक्षनेते होते. त्यांचा कालावधी २४ नोव्हेंबर रोजी संपुष्टात आलेला आहे. दरेकर यांचे अभिनंदन करताना विधान परिषदेचे सभागृह नेते सुभाष देसाई म्हणाले, ‘‘रात्री - अपरात्री बदल होण्याची परंपरा आजही कायम आहे. त्यामुळे अभिनंदन कोणाचे करावे हे कळत नाही.’’ सचिवालयाकडून मिळालेल्या पत्रात सुरजितसिंग ठाकूर यांचे नाव विरोधी पक्षनेते म्हणून आले होते. त्यानुसार त्यांचे अभिनंदन करण्याची तयारीही सुरू केली होती. सकाळी पूर्वीचे शिवसैनिक व आमचे सहकारी दरेकरांचे नाव कळाले. हा त्यांच्या पक्षाचा निर्णय असल्याचे सांगून भाजपला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. दरेकर यांचे सहकार क्षेत्रात मोठे योगदान आहे. पुढेही चालू राहील.’’ मुंबईचे अनेक प्रश्‍न मार्गी लावलेत, पुढेही लावतील, असा विश्‍वासही देसाई यांनी व्यक्त केला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com