Agriculture News in Marathi Darwha due to village purchase The market committee fell | Agrowon

खेडा खरेदीमुळे दारव्हा  बाजार समिती पडली ओस 

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 25 नोव्हेंबर 2021

दारव्हा तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी आपल्या शेतीमालाची विक्री बाजार समितीच्या माध्यमातूनच करावी, असे आवाहन सहायक निबंधक बी. जी. जाधव यांनी केले आहे. 

यवतमाळ ः दारव्हा तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी आपल्या शेतीमालाची विक्री बाजार समितीच्या माध्यमातूनच करावी, असे आवाहन सहायक निबंधक बी. जी. जाधव यांनी केले आहे. 

बाजार समितीत शेतीमाल विक्रीकरिता आणला जात नाही. त्यामुळे जाहीर लिलाव प्रक्रिया बंद पडली आहे. बहुतांश शेतकरी खेडा खरेदी किंवा बाजार समित्यांबाहेरच व्यापाऱ्यांना आपला शेतीमाल विकतात. या व्यवहाराची कोणतीच पावती दिली जात नाही. परिणामी, अशा व्यवहारांमध्ये शेतकऱ्यांची फसवणूक होण्याची शक्‍यता अधिक राहते.

पावती नसल्याने अशा प्रकरणात तक्रार ही करता येत नाही. परिणामी पुढे कायदेशीर अडचणी निर्माण होतात व शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होण्याची शक्‍यता अधिक राहते. बाजार समिती सेसचे सुद्धा यामुळे नुकसान होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी लिलावाद्वारे शेतीमाल विक्री करावी व फसगत टाळून बाजार समितीला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. 

दारव्हा तालुक्‍यात खासगी व्यापाऱ्यांकडून शेतीमालाची खरेदी जोरात सुरू आहे. परिणामी, शेतकरी बाजार समितीकडे फिरकत नसल्याने बाजार समिती ओस पडली आहे. कोणताही व्यवहार होत नसल्याने बाजार समिती प्रशासनाची चिंता वाढली आहे. त्याची दखल घेत अनधिकृत व्यवहाराविरोधात धडक कारवाईचा निर्णय बाजार समिती प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. व्यापाऱ्यांचे परवाने निलंबित करणे, दुकानातील साहित्याची जप्ती तसेच वेळ पडल्यास फौजदारी कारवाईदेखील करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

नोंदणीकृत अडत्या नसल्याचा परिणाम 
बाजार समिती प्रशासनाने मात्र खेडा खरेदीच नाही, तर अन्य कारणामुळे बाजार समितीत आवक होत असल्याचे सांगितले. त्यामध्ये बाजार समितीअंतर्गत एकही नोंदणीकृत अडत्या नाही. त्यासोबतच नजीकच्या वाशीम जिल्ह्यातील कारंजा बाजार समितीमध्ये शेतकरी आपला शेतीमाल विक्रीसाठी नेतात. इतरही काही बाजार समित्या दारव्हापासून कमी अंतरावर आहे, त्याचा परिणामदेखील आवकेवर होतो, असे बाजार समितीकडून सांगण्यात आले.


इतर बातम्या
...तर विमा कंपन्यांवर  गुन्हे दाखल...पुणे : शेतकऱ्यांना पीकविम्याचे पैसे वेळेत न...
आंदोलन सुरूच राहणार : संयुक्त किसान...नवी दिल्ली : शेतकऱ्यांच्या मागण्यांसदर्भात...
राज्यात मुख्यतः कोरड्या हवामानाचा अंदाज पुणे : राज्यात सुरू असलेल्या पावसाने उघडीप दिली...
परळी थर्मलमध्ये इंधनासाठी बांबूचा वापर...लातूर ः परळी येथील औष्णिक वीजनिर्मिती केंद्रात...
पेप्सिकोच्या बटाटा वाणाचे  मालकी हक्क...नवी दिल्ली (वृत्तसंस्था) ः केंद्र सरकारच्या...
मेंढ्यांच्या संरक्षणासाठी लवकरच योजना ...सुपे, जि. पुणे ः पावसाची संततधार, अतिवृष्टी व...
शेतकऱ्यांनी करून दाखवलं : डॉ. गौहर रझा नाशिक : नव्या भारताचे स्वप्न साकारण्यासाठी शेतकरी...
द्राक्ष पीकविमा योजना  विभागनिहाय...नाशिक : दोन दिवसांपासून राज्यात झालेल्या...
सोयाबीन दरातील सुधारणा  आठवड्याच्या...पुणे ः चालू आठवड्यात बुधवारनंतर सोयाबीन दरात...
‘जवाद’ चक्रीवादळाची  तीव्रता कमी होणारपुणे : बंगालच्या उपसागरातील ‘जवाद’ चक्रीवादळ...
दर्जेदार कृषी विद्यापीठांत  राज्याला...पुणे ः देशातील पहिल्या २० दर्जेदार कृषी...
पुणे जिल्ह्यात १,२४५ ‘विकेल ते पिकेल’...पुणे : शेतीमालाला केवळ हमीभाव नाही तर हमखास भाव...
पुणे जिल्ह्यात धरणांत एक टीएमसी...पुणे : जिल्ह्यात दोन दिवसांपासून धुमाकूळ...
कोल्हापूर जिल्हा बँकेसाठी ३६८...कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा बॅंकेच्या...
सांगली जिल्ह्यातील नुकसानग्रस्त पिकांचे...सांगली : जिल्ह्यामध्ये दोन दिवसांपूर्वी मुसळधार...
सांगली जिल्हा बँकेच्या उपाध्यक्ष पदाची...सांगली ः जिल्हा बँकेत अध्यक्षपदी आमदार मानसिंगराव...
नंदुरबार : पशुसंवर्धन विभागाच्या...नंदुरबार : पशुसंवर्धन विभागामार्फत सन २०२१-२२ या...
नंदुरबार : रब्बीचे अनुदानित बियाणे...नंदुरबार : कृषी विभागाच्या राष्ट्रीय अन्नसुरक्षा...
खानदेशात मका लागवड घटणार  गहू, बाजरीची...जळगाव ः खानदेशात मका लागवड घटेल, असे संकेत आहेत....
नांदेड जिल्ह्यात नुकसानीच्या मदतीचे...नांदेड : अतिवृष्टिग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी...