agriculture news in Marathi dasara festival celebrated in Kolhapur Maharashtra | Agrowon

कोल्हापुरात दसरा सोहळा साध्या पध्दतीने साजरा 

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 27 ऑक्टोबर 2020

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर यंदाचा दसरा सोहळा येथील ऐतिहासिक भवानी मंडपातील तुळजाभवानी मंदिरात मोजक्‍याच लोकांच्या उपस्थितीत प्रतिकात्मक पध्दतीने साजरा झाला.

कोल्हापूर ः कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर यंदाचा दसरा सोहळा येथील ऐतिहासिक भवानी मंडपातील तुळजाभवानी मंदिरात मोजक्‍याच लोकांच्या उपस्थितीत प्रतिकात्मक पध्दतीने साजरा झाला. सायंकाळी सहा वाजून चार मिनिटांनी श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, खासदार संभाजीराजे छत्रपती, मालोजीराजे छत्रपती, शहाजीराजे छत्रपती, यशराजराजे छत्रपती यांच्या प्रमुख उपस्थितीत शमीपूजन झाल्यानंतर सोने लुटले गेले. 

दरम्यान, कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर आवश्‍यक ती सर्व खबरदारी घेण्यात आली. यानिमित्ताने मंगलवाद्यांच्या निनादाने मंदिर परिसर दुमदुमून गेला. 

खंडेनवमी व दसऱ्यानिमित्त करवीर निवासिनी श्री अंबाबाईची रथारूढ रूपात सालंकृत पूजा बांधण्यात आली. तत्पूर्वी देवस्थान समितीतर्फे श्री अंबाबाई, महाकाली व महासरस्वती या देवींना महावस्त्रे अर्पण करण्यात आली. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास श्री अंबाबाईची पालखी पूर्व दरवाजामार्गे फुलांनी सजवलेल्या वाहनातून भवानी मंडपात आली. तुळजाभवानी मंदिरात पालखी विराजमान होताच छत्रपती परिवाराचे आगमन झाले. त्यानंतर मंत्रोच्चार आणि आरती होऊन शमीपूजनाचा सोहळा सजला. 
 


इतर बातम्या
चक्रीवादळांचा तडाखा यंदा वाढलापुणे : चक्रीवादळ निर्मिती नैसर्गिक असली, तरी...
खानदेशात यात्रांअभावी अनेकांवर...सोनगीर, जि. धुळे  : खानदेशात पावसाळा वगळता...
नाशिक जिल्ह्यात रब्बीच्या पेरणीसाठी...गिरणारे, जि. नाशिक : खरीप हंगामातील भात, भुईमूग,...
खांबाळे, पडवणे येथील आंबा, काजूची ६००...सिंधुदुर्ग ः जिल्ह्यातील खांबाळे (ता....
बोडखा येथे ‘स्वाभिमानी’चे झाडावर...बुलडाणा : केंद्र सरकारने पारित केलेले शेतकरी...
औरंगाबादमध्ये केंद्राच्या कृषी...औरंगाबाद : केंद्र सरकारने पारित केलेले तीन कृषी...
खानदेशात सव्वा लाख हेक्टरवर पेरणीजळगाव : खानदेशात मक्याची लागवड सुरूच आहे. रब्बी...
परभणी जिल्ह्यात कापूस विक्रीच्या...परभणी : ‘‘राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन...
नाशिक विभागात रोज एक लाख टन उसाचे गाळपनगर  ः नाशिक विभागातील ३२ पैकी २५ साखऱ...
औरंगाबाद, नगर जिल्ह्यात कापसाची ३४ हजार...औरंगाबाद : राज्य कापूस उत्पादक पणन महासंघाच्या...
कृषी कायद्यांविरोधात साताऱ्यात धरणेसातारा : शेतकरी विरोधी कायदे मागे घेण्यासाठी...
साखरेची ‘एमएसपी’पेक्षा कमी किमतीने मागणीकोल्हापूर : देशांतर्गत बाजारात साखरेची विक्री...
जालना जिल्ह्यात दहा हजार क्‍विंटलवर...जालना : ‘‘जिल्ह्यात मक्याची किमान आधारभूत...
काजू उत्पादकांना दिलासामुंबई : महाविकास आघाडी सरकारने राज्यातील काजू...
का येताहेत चक्रीवादळे? भारताच्या पूर्व भागात असलेला बंगालचा उपसागर,...
कृषी कायद्यांविरोधात राज्यात...पुणे ः केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी आणि पणन...
किसान समन्वय समितीचा अकोले येथे मोर्चा नगर ः केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायद्यांना...
महिनाभर जमीन आरोग्य सुधार अभियानऔरंगाबाद : जमिनीच्या सुपीकतेवर भर देण्याची गरज...
दक्षिण भारतात मुसळधार पाऊसपुणे ः बंगालच्या उपसागरात तयार झालेले बुरेवी...
खत विक्रीत वाढपुणे : देशात कोविड १९ ची समस्या तसेच लॉकडाउन...