agriculture news in marathi, data upload for prime minister kisan sanman scheme, buldhana, maharashtra | Agrowon

‘शेतकरी सन्मान’साठी ९१.३३ टक्के खात्यांची माहिती अपलोड
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 18 जुलै 2019

अकोला  ः पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी (पीएम किसान) योजनेचे निकष केंद्र शासनाने शिथिल केल्याने लाभार्थी संख्या वाढत आहे. राज्यात शुक्रवारपर्यंत (ता. १२) ८६ लाख ३४ हजार ४४६ खात्यांची माहिती अपलोड झाली आहे. आता केवळ आठ लाख ४१ हजार ७४१ खात्यांची माहिती भरण्याचे काम शिल्लक राहिले आहे. राज्यातील शेतकऱ्यांच्या याद्या अपलोड करण्याचे काम ९१.३३ टक्के पूर्ण झाले आहे.

अकोला  ः पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी (पीएम किसान) योजनेचे निकष केंद्र शासनाने शिथिल केल्याने लाभार्थी संख्या वाढत आहे. राज्यात शुक्रवारपर्यंत (ता. १२) ८६ लाख ३४ हजार ४४६ खात्यांची माहिती अपलोड झाली आहे. आता केवळ आठ लाख ४१ हजार ७४१ खात्यांची माहिती भरण्याचे काम शिल्लक राहिले आहे. राज्यातील शेतकऱ्यांच्या याद्या अपलोड करण्याचे काम ९१.३३ टक्के पूर्ण झाले आहे.

केंद्र सरकारने जाहीर केलेल्या योजनेनुसार आता शेतकरी कुटुंबांसाठी दोन हेक्टरची मर्यादा रद्द करण्यात आली आहे. सरसकट शेतकरी कुटुंबे योजनेसाठी पात्र मानली जात आहेत. राज्यातील सुमारे ९४ लाख ५४ हजार शेतकरी कुटुंब या योजनेसाठी पात्र ठरण्याची शक्यता आहे. आतापर्यंत दोन टप्प्यांत राज्यातील लाखो शेतकऱ्यांच्या खात्यात निधी जमा करण्यात आला आहे. क्षेत्र मर्यादेची अट काढून टाकण्यात आल्याने पात्र लाभार्थी शेतकरी कुटुंबांच्या याद्या संकलित करण्याचे काम युद्धपातळीवर करण्यात आले. शासनाने निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार पीएम किसान पोर्टलवर ही माहिती अपलोड केली जात आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील शेतकऱ्यांच्या याद्या अपलोड करण्याचे काम ९१.३३ टक्के पूर्ण झाले आहे. यामध्ये नागपूर विभागाने ९ लाख ३७१ शेतकऱ्यांच्या याद्या अपलोड करीत ९२.७० टक्के काम पूर्ण केले. कोकण विभागाने ५ लाख ४९ हजार १३७ शेतकऱ्यांची माहिती अपलोड करीत ८५.६८ टक्के असे सर्वांत कमी काम केले आहे. देशातील शेतकऱ्यांना उत्पन्न मिळण्यासाठी केंद्राने ही योजना सुरू केली आहे.

योजनेअंतर्गत शेतकरी कुटुंबाला सहा हजारांचे आर्थिक सहकार्य तीन टप्प्यांमध्ये देण्यात येणार आहे. योजना राबविण्यासाठी कृषी विभागाने राज्यात चार फेब्रुवारीला एक परिपत्रक काढले असून, यंत्रणांना त्यासाठी निर्देश दिले आहेत.
 

विभागनिहाय याद्या अपलोड झाल्याचा तपशील
विभाग एकूण यादी अपलोड टक्केवारी शिल्लक
कोकण  ५,४९,१३७ ८५.६८ ९१,८०९
पुणे   २१,०१,२७४ ९२.९६ १,५९,१७५
नाशिक १७,०४,२६० ८९.६९ १,९५,९२९
औरंगाबाद   २२,६९,५०४   ९२.५४ १,८२,८३२
अमरावती  ११,०९,९०० ९०.३० १,१९,१८७
नागपूर  ९,००,३७१   ९२.७०  ९२,८०९

 

इतर ताज्या घडामोडी
वांग्यावरील शेंडा व फळे पोखरणाऱ्या...वांगी पिकामध्ये येणाऱ्या शेंडा व फळे पोखरणारी...
पूरस्थितीतील द्राक्ष बागेचे व्यवस्थापनसां गली, कोल्हापूर व कर्नाटक शेजारील काही भागांत...
अकोल्यातील प्रकल्पात अत्यल्पच साठाअकोला : यंदाच्या पावसाळ्याचे सुमारे अडीच महिने...
सांगलीत गूळ ३३०० ते ४४०० रुपये...सांगली : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी...
अकोला जिल्ह्यात ६० हजार हेक्टर क्षेत्र...अकोला ः यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात असमतोल...
सिंधुदुर्गात कालव, जिताडा मस्त्यबीज...मुंबई : राज्यात सागरी उत्पादनवाढीस...
ठिबकला ८० टक्के अनुदान; आंदोलनाला...भोसे, जि. सोलापूर : राज्य शासनाने कोरडवाहू...
मांडाखळीत संत्रा बागांत फळगळपरभणी : कमी पाण्यामुळे जमिनीमध्ये ओलाव्याची...
रश्‍मी बागल यांचा शिवसेनेत प्रवेशसोलापूर : जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसची...
माशांच्या पाच नव्या जातींचा घेतला शोध अरुणाचल प्रदेश राज्यातील इटानगर येथील राजीव गांधी...
कोल्हापुरात मोहीम स्वरूपात पंचनाम्यास...कोल्हापूर: महापुराच्या प्रलयानंतर आता...
सांगली जिल्हा बॅंकेच्या १२ शाखांचे...सांगली   ः महापुराचा फटका शेती आणि...
एकात्मिक शेती पद्धत वापरासाठी ‘कृषी’...मुंबई  : पीक उत्पादन वाढून शेतकऱ्यांचे...
पूरग्रस्तांसह अतिवृष्टीत पिके...कोल्हापूर   : पूरग्रस्तांसह अतिवृष्टीत...
युतीतील अनेक जण आमच्या संपर्कात ः अजित...यवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आणि...
मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन शरद पवार...मुंबई  ः कोल्हापूर, सांगली, सातारा या...
खानदेशात शेतीकामात मजूरटंचाईजळगाव : खानदेशात जुलैमधील अखेरचे १० दिवस व...
पोल्ट्रीधारकांना सवलतीच्या दरात धान्यविटा, जि. सांगली : पोल्ट्रीधारकांना...
नाशिक जिल्ह्यात पावसामुळे पूर्वहंगामी...नाशिक : संततधार सुरू असलेल्या पावसामुळे...
नांदेड जिल्ह्यात पीककर्जाचे ७३ हजारांवर...नांदेड : चालू आर्थिक वर्षाच्या (२०१९-२०) पहिल्या...