भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या संचालकांनी ''कॅच द रेन'' या भूजल योजनेच्या जनजागृती अभियानाच
ताज्या घडामोडी
छत्तीसगडमध्ये आजवरची सर्वाधिक धान खरेदी
छत्तीसगडमध्ये आजवरची सर्वाधिक धान खरेदी झाली आहे. धान खरेदीच्या नियोजनानुसार अद्याप नऊ दिवस धान खरेदी सुरू राहणार आहे, तरीही २०२०-२१च्या खरीपात एकूण ८४.४४ लाख टन धानाची खरेदी झाली आहे
रायपूर : : छत्तीसगडमध्ये आजवरची सर्वाधिक धान खरेदी झाली आहे. धान खरेदीच्या नियोजनानुसार अद्याप नऊ दिवस धान खरेदी सुरू राहणार आहे, तरीही २०२०-२१च्या खरीप हंगामात आजवर एकूण ८४.४४ लाख टन धानाची खरेदी झाली आहे, अशी माहिती सरकारच्या जनसंपर्क विभागाने दिली आहे.
छत्तीसगड राज्याची स्थापन २०००मध्ये झाली होती. त्यापासून आजवर खरीप हंगामातील धानाची सर्वाधिक खरेदी झाली आहे. खरीप हंगामातील धान खरेदी ३१ जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहे. राज्यातील एकूण खरेदी ९० लाख टनांवर जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. राज्य सरकार सहकारी सोसायट्यांमार्फत धानाची खरेदी करीत आहे.
आजवर खरेदी करण्यात आलेले ८४.४४ लाख टन धान हमीभावाने खरेदी करण्यात आले आहे. मागील वर्षी ८३.९४ लाख टन धान खरेदी करण्यात आली होती, त्यापेक्षा यंदा ५० हजार टन जास्त धान खरेदी करण्यात आली आहे. एकूण १९ लाख ५४ हजार ३३२ शेतकऱ्यांनी धान विक्री केलेली आहे, अशी माहिती सरकारच्या जनसंपर्क विभागाने दिली आहे.
राज्यात २०१८-१९च्या खरीप हंगामात १६.९६ लाख शेतकऱ्यांकडून ८०.८३ लाख टन धानाची खरेदी झाली होती, तर २०१९-२०मध्ये १९.५५ लाख शेतकऱ्यांकडून ८३.९४ लाख टन धानाची खरेदी झाली होती. यंदा सुमारे २१.५२ लाख शेतकऱ्यांकडून धान खरेदी होण्याची शक्यता आहे.
धानापासून तांदूळ करण्यासाठी २७.७० लाख टन धान राइस मिलला देण्यात येणार आहे, त्यापैकी २५.४५ टन धान मिलमध्ये पोहोच झाला आहे. सरकारच्या वतीने योग्य नियोजन आणि स्थानिक पातळीवरील सहकारी संस्थांच्या समन्वयातून यंदाची धान खरेदी झाल्याने शेतकऱ्यांना धान विक्री करणे सोयीचे गेले आहे.
- 1 of 1059
- ››