Agriculture news in marathi To date in Chhattisgarh Most buy grain | Page 4 ||| Agrowon

छत्तीसगडमध्ये आजवरची सर्वाधिक धान खरेदी

टीम अॅग्रोवन
सोमवार, 25 जानेवारी 2021

छत्तीसगडमध्ये आजवरची सर्वाधिक धान खरेदी झाली आहे. धान खरेदीच्या नियोजनानुसार अद्याप नऊ दिवस धान खरेदी सुरू राहणार आहे, तरीही २०२०-२१च्या खरीपात  एकूण ८४.४४ लाख टन धानाची खरेदी झाली आहे

रायपूर : : छत्तीसगडमध्ये आजवरची सर्वाधिक धान खरेदी झाली आहे. धान खरेदीच्या नियोजनानुसार अद्याप नऊ दिवस धान खरेदी सुरू राहणार आहे, तरीही २०२०-२१च्या खरीप हंगामात आजवर एकूण ८४.४४ लाख टन धानाची खरेदी झाली आहे, अशी माहिती सरकारच्या जनसंपर्क विभागाने दिली आहे.

छत्तीसगड राज्याची स्थापन २०००मध्ये झाली होती. त्यापासून आजवर खरीप हंगामातील धानाची सर्वाधिक खरेदी झाली आहे. खरीप हंगामातील धान खरेदी ३१ जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहे. राज्यातील एकूण खरेदी ९० लाख टनांवर जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. राज्य सरकार सहकारी सोसायट्यांमार्फत धानाची खरेदी करीत आहे.

आजवर खरेदी करण्यात आलेले ८४.४४ लाख टन धान हमीभावाने खरेदी करण्यात आले आहे. मागील वर्षी ८३.९४ लाख टन धान खरेदी करण्यात आली होती, त्यापेक्षा यंदा ५० हजार टन जास्त धान खरेदी करण्यात आली आहे. एकूण १९ लाख ५४ हजार ३३२ शेतकऱ्यांनी धान विक्री केलेली आहे, अशी माहिती सरकारच्या जनसंपर्क विभागाने दिली आहे.

राज्यात २०१८-१९च्या खरीप हंगामात १६.९६ लाख शेतकऱ्यांकडून ८०.८३ लाख टन धानाची खरेदी झाली होती, तर २०१९-२०मध्ये १९.५५ लाख शेतकऱ्यांकडून ८३.९४ लाख टन धानाची खरेदी झाली होती. यंदा सुमारे २१.५२ लाख शेतकऱ्यांकडून धान खरेदी होण्याची शक्यता आहे.

धानापासून तांदूळ करण्यासाठी २७.७० लाख टन धान राइस मिलला देण्यात येणार आहे, त्यापैकी २५.४५ टन धान मिलमध्ये पोहोच झाला आहे. सरकारच्या वतीने योग्य नियोजन आणि स्थानिक पातळीवरील सहकारी संस्थांच्या समन्वयातून यंदाची धान खरेदी झाल्याने शेतकऱ्यांना धान विक्री करणे सोयीचे गेले आहे.


इतर अॅग्रोमनी
मोहरीला दराचा ‘तडका’ पुणे ः राजस्थानमध्ये मोहरीच्या दराने हमीभावाचा...
हळदीची आवक वाढू लागली सांगली/परभणी ः बाजार समित्यांत हळदीची आवक वाढू...
देशात विक्रमी फलोत्पादनाचा अंदाज पुणे ः देशात २०२०-२१ मध्ये फलोत्पादनात फळांचे १०३...
चीनकडून शेतीमालाची आक्रमक खरेदी पुणे ः जागतिक पातळीवर जवळपास सर्वच शेतमालाची...
हरभरा दरात घसरणीची शक्यता कमीपुणे ः हरभरा आवक वाढत असून पुढील १० ते १२ दिवसांत...
तेलबिया उत्पादनात वाढ वॉशिंग्टन ः जागतिक तेलबिया उत्पादनात फेब्रुवारी...
सांगली बाजार समितीत हळदीची आवक वाढलीसांगली ः  कोरोना विषाणूचा वाढता...
सरकारी आकड्यांपेक्षा हरभरा उत्पादनात घट यंदाच्या हंगामात सुरुवातीपासूनच पिकांना बदलत्या...
देशात साखर उत्पादनात ४० लाख टनांनी वाढलेकोल्हापूर : देशातील साखर कारखान्यांनी...
केंद्रीय गोदाम महामंडळाची क्षमता अनेक...नवी दिल्ली ः केंद्रीय गोदाम महामंडळाची क्षमता...
पाकिस्तानची भारतीय कापसाला पसंती जळगाव ः पाकिस्तान कापसासाठी भारताच्या दारात...
हरभरा बाजारात सुधाराची चिन्हे पुणे ः बाजारात हरभरा आवक सुरू झाली आहे....
बाजारात तूर खातेय भाव; वाढ कायम पुणे ः इतर कडधान्य पिकांसह तूर उत्पादनातही घट...
हळदीला दराचा ‘रंग’ पुणे ः हळद उत्पादनात घट झाल्याने यंदा हळदीचे दर...
अन्नधान्याचे विक्रमी उत्पादन नवी दिल्ली ः देशात यंदा अन्नधान्याचे विक्रमी...
राष्ट्रीय खाद्यतेल मिशनचा यंदाही चकवापुणे : राष्ट्रीय खाद्यतेल मिशनची यंदाही घोषणा न...
सोयाबीनमधील तेजी कायम पुणे ः सोयाबीनने प्लॅंट दरासह बाजार...
हरभरा बाजाराला ‘नाफेड’चा टेकू पुणे ः नाफेडने राज्यनिहाय खरेदीचे उद्दिष्ट जाहीर...
कापसाचा तुटवडा जाणवू लागला जळगाव : देशात सूतगिरण्यांसमोर कापूसटंचाई तयार...
देशातील हरभरा उत्पादनात घट होण्याची...नवी दिल्ली : यंदाच्या हंगामात देशातील हरभरा...