agriculture news in Marathi date expand of drip subsidy application Maharashtra | Agrowon

‘ठिबक’च्या ऑनलाइन अर्जासाठी मुदतवाढ

टीम अॅग्रोवन
सोमवार, 24 फेब्रुवारी 2020

पुणे ः ठिबक सिंचन योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी २० फेब्रुवारी ही अंतिम मुदत होती. मात्र, अर्ज करण्याच्या शेवटच्या टप्प्यात संकेतस्थळ सातत्याने बंद पडत असल्याने अनेक शेतकऱ्यांना अर्ज करता आला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मागणीचा विचार करून २९ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

पुणे ः ठिबक सिंचन योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी २० फेब्रुवारी ही अंतिम मुदत होती. मात्र, अर्ज करण्याच्या शेवटच्या टप्प्यात संकेतस्थळ सातत्याने बंद पडत असल्याने अनेक शेतकऱ्यांना अर्ज करता आला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मागणीचा विचार करून २९ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

राज्यातील बहुतांश भागात गेल्या काही वर्षांपासून सातत्याने दुष्काळी परिस्थितीमुळे पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. अशा परिस्थितीत सुक्ष्म सिंचन पद्धतीचा वापर करण्यास शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकार ठिबकसाठी अनुदान  देते.  

काही भागात ठिबक सिंचनामुळे कमी पाण्यावर पिकांचे चांगले उत्पादन घेता आले. यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी ठिबक सिंचनाचा वापर करावा, यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू 
आहेत.

२० फेब्रुवारीच्या अखेरीस मुदत संपण्याअगोदर अनेक ठिकाणी अर्ज करताना संकेतस्थळे बंद पडल्याने बहुतांशी शेतकऱ्यांना अर्ज करता आले नाहीत. त्यामुळे मुदतवाढ दिली आहे. ठिबक सिंचनासाठी केंद्र सरकार ५५ टक्के व राज्य सरकार २५ टक्के अनुदान देत आहे. दोन वर्षांपासून शेतकऱ्यांना ठिबक व तुषार सिंचनाचा कृषी विभागाकडून लाभ मिळावा यासाठी ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

अडीच लाख अर्ज पात्र
यंदा ठिबक अनुदानासाठी जवळपास तीन लाख ५७ हजार ६०८ अर्ज दाखल झाले. त्यापैकी एक लाख १४ हजार ५६० अर्ज किरकोळ त्रुटीच्या कारणास्तव रद्द झाले आहेत. दोन लाख ४३ हजार ४८ अर्ज पात्र ठरविण्यात आले आहेत. यापैकी दोन लाख ९ हजार ९०२ अर्जांना पूर्वसंमती देण्यात आली आहे. 


इतर अॅग्रो विशेष
प्रयोगशीलतेतून मिळवले आर्थिक स्थैर्यनाशिक जिल्ह्यातील आडगाव येथील शिवाजी शंकर देशमुख...
...शेतकरी मात्र 'फार्म क्वाॅरंटाइन' !सांगली : कोरोनाने सर्वांची झोप उडाली आहे. संपूर्ण...
केसरची चव यंदा दुर्मिळ; संकटांमुळे आंबा...औरंगाबाद: यंदा बहुतांश आंबा बागांना मोजकाच मोहर...
राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या...मुंबई : राज्यात कोरोनाबाधित १४५ नवीन रुग्णांची आज...
दूध भुकटी योजनेसाठी १८७ कोटी मंजूर मुंबई: कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या विपरीत...
फळे, भाजीपाला थेट विक्रीसाठी ...नगर : फळे, भाजीपाला विक्रीसाठी नगर जिल्ह्यामधील...
पहिल्याच दिवशी २६० किलो मोसंबी वाजवी...औरंगाबाद : आधी बागवानाने मागितली तेव्हा दिली नाही...
कृषी उत्पादनांसह निर्धारीत अत्यावश्‍यक...नवी दिल्ली: देशात कोरोना विषाणूचा प्रसार...
समाजविघातक वृत्तींवर कडक कायदेशीर...मुंबई: कृपा करून शिस्त पाळा, सहकार्य करा असे मी...
शेती अवजारे, स्पेअरपार्टस् दुकानांना...नवी दिल्ली: केंद्रीय गृहमंत्रालयाने शुक्रवारी (ता...
मराठवाड्यात आजही वादळी पावसाची शक्यता पुणे: उन्हाचा ताप वाढल्याने सोलापूर, मालेगाव,...
करडई संशोधन प्रकल्‍पास मान्यता परभणी: वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील...
भारत - इस्राईल मैत्रीतून उजळणार...भारत आणि इस्राईल देशातील पंतप्रधानांच्या भेटीतून...
राज्य अंधारात जाण्याचा धोकाः डॉ. नितीन...मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (ता.५...
चारशे वर्षात पहिल्यांदाच वारकऱ्यांविना...सोलापूर ः सुमारे ४०० वर्षाची परंपरा असलेल्या...
शेतकरी कंपन्यांचाही ‘ई-नाम’मध्ये समावेश नवी दिल्ली: केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर...
राज्यात उन्हाचा चटका वाढला पुणे: एप्रिल महिना सुरू होताच राज्यात उन्हाच्या...
पिंपळगाव बसवंत बाजार समितीत ३० हजार...नाशिक: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मजुरटंचाई...
कोल्हापुरात तीस हजार ऊस तोडणी कामगार...कोल्हापूर: जिल्ह्यातील सुमारे तीस हजार ऊस तोडणी...