gram
gram

हरभरा खरेदीसाठी नोंदणीला मुदतवाढ 

किमान आधारभूत किमतीने हरभरा खरेदीसाठी शेतकऱ्यांना ऑनलाइन नोंदणीसाठीच्या कालावधीत १८ जूनपर्यंत वाढ करण्यात आली आहे. शिवाय खरेदीचा कालावधी ही एक महिन्याने वाढवून २५ जूनपर्यंत करण्यात आलेला आहे.

औरंगाबाद : किमान आधारभूत किमतीने हरभरा खरेदीसाठी शेतकऱ्यांना ऑनलाइन नोंदणीसाठीच्या कालावधीत १८ जूनपर्यंत वाढ करण्यात आली आहे. शिवाय खरेदीचा कालावधी ही एक महिन्याने वाढवून २५ जूनपर्यंत करण्यात आलेला आहे.  खरीप हंगाम २०२०-२१ मध्ये किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत हमीभावाने हरभरा खरेदीसाठी १५ फेब्रुवारी २०२१ पासून ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. प्रत्यक्षात खरेदीची प्रक्रिया २५ फेब्रुवारी २०२१ पासून सुरू झाली होती. हमीभावाने हरभरा खरेदीचा कालावधी २५ फेब्रुवारी ते २५ मे २०२१ असा होता. खरेदी प्रक्रिया सुरळीतपणे चालावी याकरिता नोंदणी प्रक्रिया १७ मे २०२१ पर्यंत सुरू ठेवण्यात आली होती. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत विदर्भ, मराठवाडा विभागात मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्याने मार्च २०२१ मध्ये कडक निर्बंध लागू करण्यात आले होते. या निर्बंधामुळे अनेक शेतकऱ्यांना नोंदणी करता आली नाही. तसेच नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांकडून अपेक्षित प्रमाणात हरभरा खरेदी झाली नाही. त्यामुळे खरेदीचा कालावधी एक महिन्याने वाढवून तो २५ जूनपर्यंत करण्यात आला होता. त्याला केंद्र शासनाने मान्यता दिली होती.  ज्या शेतकऱ्यांना लॉकडाउनमुळे नोंदणी करता आलेली नाही. त्यामुळे किमान आधारभूत योजनेचा लाभ मिळविता आला नाही अशा शेतकऱ्यांना नोंदणी करता यावी व हमीभावाचा लाभ मिळावा याकरिता ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यासाठी केंद्र शासनाला प्रस्ताव सादर करण्यात आला होता. या प्रस्तावास ७ जून २०२१ च्या पत्रान्वये केंद्र शासनाने मान्यता दिली आहे. केंद्र शासनाने दिलेल्या मान्यतेच्या अनुषंगाने आता नोंदणी प्रक्रियेचा कालावधी १८ जून २०२१ पर्यंत करण्यात आला आहे.  असे आहेत नियम 

  • ज्या तालुक्यात जमीन त्याच तालुक्यातील खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांनी नोंदणी करावी 
  • नोंदणीकरिता आधार कार्डची छायांकित प्रत व हरभरा पिकाची नोंद असलेला सातबारा उतारा बँक पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत इत्यादी कागदपत्रे तपासावीत. 
  • शेतकऱ्यांचा कार्यान्वित असलेला मोबाईल नंबर खरेदी केंद्रावर नोंदणी करावा. 
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com