उडीद, मूग, सोयाबीन ऑनलाइन नोंदणीला मुदतवाढ

हमी दराने शेतमाल खरेदीसाठीचे ऑनलाईन पोर्टल बंद केलेले नाही.शासन व नाफेडकडून नोंदणीसाठी मुदतवाढ दिल्याची सूचना आली आहे . त्यानुसार मुगाकरिता 31 ऑक्टोबर पर्यंत तर उडीद व सोयाबीन करिता 15 नोव्हेंबर पर्यंत नोंदणी करता येणार आहे - महेंद्र भेकाने, उपव्यवस्थापक, नाफेड खरेदीमार्केटिंग फेडरेशन
उडीद, मूग, सोयाबीन ऑनलाइन नोंदणीला मुदतवाढ
उडीद, मूग, सोयाबीन ऑनलाइन नोंदणीला मुदतवाढ

औरंगाबाद: हमीदराने उडीद, मूग, सोयाबीन खरेदीसाठीच्या नोंदणीला मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती मार्केटिंग फेडरेशनच्या सूत्रांनी दिली. नवीन मुदतीनुसार उडीद, मुगाच्या हमीदराने खरेदीसाठी ३१ ऑक्‍टोबरपर्यंत तर सोयाबीनच्या खरेदीसाठी १५ नोव्हेंबरपर्यंत शेतकऱ्यांना ऑनलाइन नोंदणी करता येणार आहे. केंद्र शासनाच्या या हमीदराने शेतमाल खरेदीसाठी राज्यात जवळपास २७६ केंद्रांना मंजुरी मिळालेली आहे. त्यामध्ये मार्केटिंग फेडरेशनचे १४४, विदर्भ मार्केटिंग फेडरेशनचे ३३ तर महा एफपीसीचे ९९ केंद्राचा समावेश आहे. यंदा मराठवाड्यात पावसाने पुन्हा एकदा आपल्या लहरीपणाचा परिचय दिल्याने खरिपाची पेरणी व त्यामुळे काढणीचा हंगाम लांबला. हंगाम लांबला असला तरी नाफेड, मार्केटिंग फेडरेशन, खरेदीविक्री संघ व महाएफपीसीअंतर्गत शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून खरेदी केंद्राला मंजूरात देण्यालाही विलंब झाला होता.   केंद्र मंजूरीला विलंब झाला तरी उडीद मुगाची हमी दराने खरेदी करण्यासाठी १५ ऑक्‍टोबरपर्यंत तर सोयाबीनसाठी ३१ ऑक्‍टोबरपर्यंत ऑनलाईन नोंदणीची मुदत देण्यात आली होती. या मुदतीपर्यंत मराठवाड्यातील हमी दराच्या खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांच्या नोंदणीला अत्यल्प प्रतिसाद मिळाला. यामध्ये सातबारावर अद्यावत पीक पेरा नसण्याचे कारण असल्याचे समोर आले होते. संबंधित यंत्रणा इलेक्‍शन मोडवर असल्याने अद्यावत पिक पेऱ्याचा सातबारा मिळण्यात अडचणी निर्माण झाल्याचे शेतकरी सांगत आहेत.  शिवाय पावसाच्या लहरीपणाने उत्पादनात आलेली घटही नोंदणीला प्रतिसाद न मिळण्याचे कारण बनली होती.  अडथळ्याची शर्यत बनलेल्या हमी दराच्या खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणीला वाढ देण्याची बाब शेतकरी वर्गातून पुढे येत होती. ‘ॲग्रोवन’ने १५ ऑक्‍टोबरच्या अंकात याविषयीच्या अडचणीविषयी  सविस्तर वृत्त प्रकाशीत केले होते. त्यानंतर १५ ऑक्‍टोबरलाच महाएफपीसीच्या माध्यमातून त्यांच्या अंतर्गत हमी दराने खरेदीत उतरलेल्या सर्व शेतकरी उत्पादक कंपन्यांना उडीद व मुगाच्या नोंदणीसाठी ३१ ऑक्‍टोबरपर्यंत तर सोयाबीनच्या नोंदणीसाठी १५ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याचे कळविण्यात आले होते. याविषयी मार्केटिंग फेडरेशनच्या यंत्रणेशी मुदतवाढीविषयी संवाद साधला असता संबंधीत मुदतवाढ देण्यात आल्याचे सांगून लवकरच याविषयीचे लेखी पत्र सर्व जिल्हा कार्यालयांना पाठविण्यात येणार असल्याचे त्यांच्या वरीष्ठांनी सांगितल्याची माहिती सुत्रांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com