agriculture news in Marathi, date extension for MSP procurement, Maharashtra | Page 2 ||| Agrowon

उडीद, मूग, सोयाबीन ऑनलाइन नोंदणीला मुदतवाढ

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 17 ऑक्टोबर 2019

हमी दराने शेतमाल खरेदीसाठीचे ऑनलाईन पोर्टल बंद केलेले नाही.शासन व नाफेडकडून नोंदणीसाठी मुदतवाढ दिल्याची सूचना आली आहे . त्यानुसार मुगाकरिता 31 ऑक्टोबर पर्यंत तर उडीद व सोयाबीन करिता 15 नोव्हेंबर पर्यंत नोंदणी करता येणार आहे
- महेंद्र भेकाने, उपव्यवस्थापक, नाफेड खरेदी मार्केटिंग फेडरेशन

औरंगाबाद: हमीदराने उडीद, मूग, सोयाबीन खरेदीसाठीच्या नोंदणीला मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती मार्केटिंग फेडरेशनच्या सूत्रांनी दिली. नवीन मुदतीनुसार उडीद, मुगाच्या हमीदराने खरेदीसाठी ३१ ऑक्‍टोबरपर्यंत तर सोयाबीनच्या खरेदीसाठी १५ नोव्हेंबरपर्यंत शेतकऱ्यांना ऑनलाइन नोंदणी करता येणार आहे.

केंद्र शासनाच्या या हमीदराने शेतमाल खरेदीसाठी राज्यात जवळपास २७६ केंद्रांना मंजुरी मिळालेली आहे. त्यामध्ये मार्केटिंग फेडरेशनचे १४४, विदर्भ मार्केटिंग फेडरेशनचे ३३ तर महा एफपीसीचे ९९ केंद्राचा समावेश आहे. यंदा मराठवाड्यात पावसाने पुन्हा एकदा आपल्या लहरीपणाचा परिचय दिल्याने खरिपाची पेरणी व त्यामुळे काढणीचा हंगाम लांबला. हंगाम लांबला असला तरी नाफेड, मार्केटिंग फेडरेशन, खरेदीविक्री संघ व महाएफपीसीअंतर्गत शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून खरेदी केंद्राला मंजूरात देण्यालाही विलंब झाला होता.  

केंद्र मंजूरीला विलंब झाला तरी उडीद मुगाची हमी दराने खरेदी करण्यासाठी १५ ऑक्‍टोबरपर्यंत तर सोयाबीनसाठी ३१ ऑक्‍टोबरपर्यंत ऑनलाईन नोंदणीची मुदत देण्यात आली होती. या मुदतीपर्यंत मराठवाड्यातील हमी दराच्या खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांच्या नोंदणीला अत्यल्प प्रतिसाद मिळाला. यामध्ये सातबारावर अद्यावत पीक पेरा नसण्याचे कारण असल्याचे समोर आले होते. संबंधित यंत्रणा इलेक्‍शन मोडवर असल्याने अद्यावत पिक पेऱ्याचा सातबारा मिळण्यात अडचणी निर्माण झाल्याचे शेतकरी सांगत आहेत.  शिवाय पावसाच्या लहरीपणाने उत्पादनात आलेली घटही नोंदणीला प्रतिसाद न मिळण्याचे कारण बनली होती. 

अडथळ्याची शर्यत बनलेल्या हमी दराच्या खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणीला वाढ देण्याची बाब शेतकरी वर्गातून पुढे येत होती. ‘ॲग्रोवन’ने १५ ऑक्‍टोबरच्या अंकात याविषयीच्या अडचणीविषयी  सविस्तर वृत्त प्रकाशीत केले होते. त्यानंतर १५ ऑक्‍टोबरलाच महाएफपीसीच्या माध्यमातून त्यांच्या अंतर्गत हमी दराने खरेदीत उतरलेल्या सर्व शेतकरी उत्पादक कंपन्यांना उडीद व मुगाच्या नोंदणीसाठी ३१ ऑक्‍टोबरपर्यंत तर सोयाबीनच्या नोंदणीसाठी १५ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याचे कळविण्यात आले होते.

याविषयी मार्केटिंग फेडरेशनच्या यंत्रणेशी मुदतवाढीविषयी संवाद साधला असता संबंधीत मुदतवाढ देण्यात आल्याचे सांगून लवकरच याविषयीचे लेखी पत्र सर्व जिल्हा कार्यालयांना पाठविण्यात येणार असल्याचे त्यांच्या वरीष्ठांनी सांगितल्याची माहिती सुत्रांनी दिली.


इतर अॅग्रो विशेष
राज्यात पावसाचा जोर सोमवारपासून वाढणार पुणे ः बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र...
किसान रेल्वेला नाशिकमधून प्रारंभ नाशिक: केंद्र सरकारने २०२० च्या अर्थसंकल्पात...
नाशवंत शेतमाल वाहतुकीसाठी किसान...नाशिक: कृषी क्षेत्रात प्रगत असलेल्या नाशिक...
संजीवनी गटाचे रास्त दरात खात्रीशीर...नाशिक जिल्ह्यातील मोह (ता.सिन्नर) येथील तरुण...
शेतकऱ्यांसाठी ‘दीपस्तंभ’ ठरलेली...मानोरी (ता. राहुरी, जि. नगर) येथील कृषीभूषण डाॅ....
बळीराजा चेतना अभियान बंद करण्याचा निर्णयमुंबई : विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्या...
विदर्भातून सूर्यफूलाचे पीक झाले हद्दपारनागपूर : सूर्यफुलाकरिता प्रसिद्ध असलेल्या भागात...
पीक कर्ज वाटपात हलगर्जीपणा करणाऱ्या...पुणे: महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेत...
ग्रामपंचायतींचे लेखापरीक्षण होणारपुणे: पंचायत राजच्या माध्यमातून देशभरातील...
सतर्क राहून मदत कार्य कराः मुख्यमंत्रीमुंबई: मुसळधार वृष्टी आणि जोरदार वारे यामुळे...
कोकणाला दणका, मराठवाड्यात दिलासापुणे: मुंबईसह कोकणला पावासाने चांगलेच झोडपून...
कोकणात पावसाचा जोर वाढणार पुणे ः गेल्या चार ते पाच दिवसांपासून अरबी...
`कृषी’चे प्रवेश सीईटीनेच होणार पुणे: राज्यात कृषी पदवी अभ्यासक्रमांचे प्रवेश ‘...
महागाई नियंत्रणासाठी रेपो दर 'जैसे थे' मुंबई: भारतीय रिझर्व्ह बँकेने आपले ऑगस्ट आणि...
पिराचीवाडी झाली उपक्रमशील गावकोल्हापूर जिल्ह्यातील पिराचीवाडी(ता.कागल) हे...
शेती शाश्वत अन् आश्वासकही!चार महिन्यांपासून देशभर सुरु असलेले लॉकडाउन आता...
दूध दराचे दुखणेइतर व्यवसाय व दूध व्यवसायातील फरक हा की कारखाने...
उद्दिष्ट - मुदतवाढीत अडकवू नका मका...‘‘आ धी नोंदणी केल्यानंतर ११ जुलैला एसएमएस...
मराठवाड्यात कर्ज पुरवठ्याचं घोडं ३७...औरंगाबाद : मराठवाड्यात खरीप पीक कर्ज पुरवठा...
मुगाचे अर्धेअधिक क्षेत्र रोगाच्या...अकोला : यंदाच्या खरिपात मुगाच्या पिकावर लिफ...