डोणगावात होणार खजूर लागवड

खजूर
खजूर

अकोला ः पारंपरिक पिकांना पर्याय शोधण्यासाठी शेतकरी सातत्याने धडपडत आहेत. रोख पैसे देणाऱ्या, वातावरणाशी एकरूप होणाऱ्या पिकांच्या पर्यायांचा शोध शेतकरी घेत आहेत. डोणगाव (ता. मेहकर) येथील शेतकरी उत्पादक कंपनीच्या पुढाकाराने येत्या काळात या कंपनीच्या कार्यक्षेत्रात १०० एकरांवर खजूर लागवडीचे नियोजन सुरू करण्यात आले आहे. लागवड करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांनी नुकतीच भूज (गुजरात) येथे भेट देत खजूर शेतीची पाहणीसुद्धा केली आहे.  गुजरातमध्ये कच्छ प्रांतात भूज जिल्ह्यात मिर्झापूर येथे खजुराची शेती केली जाते. ही शेती पाहण्यासाठी कंपनीच्या पुढाकाराने ३२ शेतकरी आशापुरा फार्मला भेट देऊन आले. या वेळी या फार्मचे मालक हरीभाई यांनी आपल्याकडे १५० एकरांत खजुराची बाग लागवड केली असून, मागील तीन वर्षांत अत्यल्प पाऊस होऊनही ही बाग हिरवीगार असल्याचे सांगितले. सध्या या बागेतील प्रत्येक झाड खजुरांनी लदबदलेले आहे. तीन वर्षांपासून तर १५ वर्षे वयाची झाडे या बागेत आहेत. प्रत्येक झाडाला ठिबकच्या साह्यानेच पाणी देण्यात येते. यामध्ये आंतरपीक म्हणून टरबूज, रताळे, आंबे, डाळिंब, शेडनेटमध्ये भाजीपाला अशी पैसे देणारी ही शेती हरीभाई करीत आहेत, अशी माहिती शेतकरी कंपनीचे अध्यक्ष गजानन आखाडे यांनी दिली. या दौऱ्याबाबत शेतकरी कंपनीतील प्रमुख शेतकऱ्यांची जिल्हा परिषद सदस्य राजू पळसकर यांच्याकडे बैठक घेत नियोजन करण्यात आले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com