agriculture news in Marathi, dates planting in dongaon, buldhana, maharashtra | Agrowon

डोणगावात होणार खजूर लागवड

टीम अॅग्रोवन
शनिवार, 20 जुलै 2019

अकोला ः पारंपरिक पिकांना पर्याय शोधण्यासाठी शेतकरी सातत्याने धडपडत आहेत. रोख पैसे देणाऱ्या, वातावरणाशी एकरूप होणाऱ्या पिकांच्या पर्यायांचा शोध शेतकरी घेत आहेत. डोणगाव (ता. मेहकर) येथील शेतकरी उत्पादक कंपनीच्या पुढाकाराने येत्या काळात या कंपनीच्या कार्यक्षेत्रात १०० एकरांवर खजूर लागवडीचे नियोजन सुरू करण्यात आले आहे. लागवड करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांनी नुकतीच भूज (गुजरात) येथे भेट देत खजूर शेतीची पाहणीसुद्धा केली आहे. 

अकोला ः पारंपरिक पिकांना पर्याय शोधण्यासाठी शेतकरी सातत्याने धडपडत आहेत. रोख पैसे देणाऱ्या, वातावरणाशी एकरूप होणाऱ्या पिकांच्या पर्यायांचा शोध शेतकरी घेत आहेत. डोणगाव (ता. मेहकर) येथील शेतकरी उत्पादक कंपनीच्या पुढाकाराने येत्या काळात या कंपनीच्या कार्यक्षेत्रात १०० एकरांवर खजूर लागवडीचे नियोजन सुरू करण्यात आले आहे. लागवड करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांनी नुकतीच भूज (गुजरात) येथे भेट देत खजूर शेतीची पाहणीसुद्धा केली आहे. 

गुजरातमध्ये कच्छ प्रांतात भूज जिल्ह्यात मिर्झापूर येथे खजुराची शेती केली जाते. ही शेती पाहण्यासाठी कंपनीच्या पुढाकाराने ३२ शेतकरी आशापुरा फार्मला भेट देऊन आले. या वेळी या फार्मचे मालक हरीभाई यांनी आपल्याकडे १५० एकरांत खजुराची बाग लागवड केली असून, मागील तीन वर्षांत अत्यल्प पाऊस होऊनही ही बाग हिरवीगार असल्याचे सांगितले. सध्या या बागेतील प्रत्येक झाड खजुरांनी लदबदलेले आहे.

तीन वर्षांपासून तर १५ वर्षे वयाची झाडे या बागेत आहेत. प्रत्येक झाडाला ठिबकच्या साह्यानेच पाणी देण्यात येते. यामध्ये आंतरपीक म्हणून टरबूज, रताळे, आंबे, डाळिंब, शेडनेटमध्ये भाजीपाला अशी पैसे देणारी ही शेती हरीभाई करीत आहेत, अशी माहिती शेतकरी कंपनीचे अध्यक्ष गजानन आखाडे यांनी दिली. या दौऱ्याबाबत शेतकरी कंपनीतील प्रमुख शेतकऱ्यांची जिल्हा परिषद सदस्य राजू पळसकर यांच्याकडे बैठक घेत नियोजन करण्यात आले. 


इतर बातम्या
नगर जिल्ह्याच्या विकासासाठी ९७१ कोटींची...नगर ः जिल्ह्याच्या विकासासाठी शासनाकडे ९७१...
खानदेशातील ‘रब्बी’ला ढगाळ वातावरणाचे...जळगाव : खानदेशात यंदा हुडहुडी भरविणारी थंडी दोन-...
उद्योगमंत्र्यांनी जाणली रेशीम...औरंगाबाद : जिल्ह्यात रेशीम कोषाचे उत्पादन,...
फुलकिड्यांच्या प्रादुर्भावामुळे काजू...सिंधुदुर्ग : ढेकण्या, शेंडेमर, फांदीमर रोगांमुळे...
दहा वर्षांत सातारा जिल्ह्यातील १३८०...सातारा  ः जिल्ह्यात गोपीनाथ मुंडे शेतकरी...
मुळा, भंडारदरा धरणांतून आजपासून आवर्तननगर  ः यंदा पाऊस चांगला झाल्याने...
पुणे कृषी महाविद्यालयातील ...पुणे  ः विद्यार्थी वसतिगृहाचे प्रवेशद्वार...
भीमा खोऱ्यातील धरणांमध्ये ८५ टक्के पाणीपुणे  : जिल्ह्याच्या धरणक्षेत्रात यंदा दमदार...
हिंगोली, नांदेड, परभणी जिल्ह्यांत...हिंगोली : पाऊस लांबल्यामुळे हिंगोली, नांदेड,...
‘पोकरा’अंतर्गत तांत्रिक सहकार्यासाठी...औरंगाबाद: नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या...
शिरवाडे वणीत जलसंधारणासाठी...नाशिक : कर्मवीर काकासाहेब वाघ कला विज्ञान आणि...
अनियमित थंडी ऊस रिकव्हरीच्या मुळावरकोल्हापूरः जानेवारीच्या पहिल्या आठवड्यातही ऊस...
कुरखेडा तालुक्यात सेवा सोसायट्यांचा धान...गडचिरोली  ः कमिशन व हमालीची रक्‍कम मिळत...
देशात केवळ ३५ तेलबिया हबनिर्मितीनवी दिल्ली: देशातील तेलबिया उत्पादन वाढावे आणि...
नवव्या जागतिक कृषी महोत्सवास उद्यापासून...नाशिक : श्रीस्वामी समर्थ सेवा मार्ग दिंडोरी...
राज्यात गारठा कमी, उकाडा वाढलापुणे : उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचे प्रवाह...
संवादासाठी तंत्रज्ञान महोत्सव फायदेशीर...सोलापूर : ‘‘शेतीतील नवे ज्ञान, तंत्रज्ञान, बदल...
धान खरेदी केंद्रासाठी शेतकऱ्यांचा...भंडारा  ः गेल्या दोन महिन्यांपासून बंद...
काँग्रेसचा दर बुधवारी मुंबईत ‘लोकदरबार’ मुंबई  : विविध कामांसाठी मंत्रालयात येणाऱ्या...
अलिबागचा पांढरा कांदा ‘जीआय’च्या वाटेवरपुणे : औषधी गुणधर्मांसाठी प्रसिद्ध असलेल्या...