Agriculture news in marathi; Daughter of grape growers planted by MLA Deepika Chavan | Agrowon

आमदार दीपिका चव्हाण यांनी मांडली द्राक्ष उत्पादकांची व्यथा
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 20 जून 2019

नाशिक : जिल्ह्यातील बागलाण व चांदवड तालुक्यातील सुमारे पस्तीस द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची एक कोटी ९० लाख रुपयांची फसवणूक करून निर्यातदार पळून गेल्याची घटना घडली. हे खरे आहे का आणि त्याबाबत शासनाने काय चौकशी केली, असा सवाल बागलाणच्या आमदार दीपिका चव्हाण यांनी शासनाला केला. पावसाळी अधिवेशनादरम्यान आमदार चव्हाण यांनी मंगळवारी (दि.१८) तारांकित प्रश्न उपस्थित करून शासनाला जाब विचारला. या प्रश्नाबाबत थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले असून, दोन्ही प्रकरणांत गुन्ह्याची नोंद झाल्याची माहिती त्यांनी सभागृहाला दिली.
  

नाशिक : जिल्ह्यातील बागलाण व चांदवड तालुक्यातील सुमारे पस्तीस द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची एक कोटी ९० लाख रुपयांची फसवणूक करून निर्यातदार पळून गेल्याची घटना घडली. हे खरे आहे का आणि त्याबाबत शासनाने काय चौकशी केली, असा सवाल बागलाणच्या आमदार दीपिका चव्हाण यांनी शासनाला केला. पावसाळी अधिवेशनादरम्यान आमदार चव्हाण यांनी मंगळवारी (दि.१८) तारांकित प्रश्न उपस्थित करून शासनाला जाब विचारला. या प्रश्नाबाबत थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले असून, दोन्ही प्रकरणांत गुन्ह्याची नोंद झाल्याची माहिती त्यांनी सभागृहाला दिली.
  
अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी (दि.१८) आमदार चव्हाण यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला. नाशिक जिल्ह्यातील बागलाणमधील बिजोटे व चांदवड तालुक्यातील वडाळीभोई, कुंडाणे,धोडंबे, मालसाने, शिंदे येथील सुमारे पस्तीस द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे एक कोटी ९० लाख रुपये रुपयांची फसवणूक करून निर्यातदार पळून गेल्याची घटना २२ एप्रिल २०१९ रोजी घडली आहे. त्यामुळे याप्रकरणी शासनाकडून चौकशी करण्यात आली काय आणि त्यानुसार फसवणूक करणाऱ्या निर्यातदार आरोपींविरोधात शासनाने काय कार्यवाही केली, अशी विचारणा आ.चव्हाण यांनी तारांकित प्रश्नाद्वारे केली. 

याप्रकरणी द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी वडनेर भैरव पोलिस स्टेशनमध्ये भादवि कलम ४२९,३४ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. या गुन्ह्यातील दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, ते न्यायालयीन कोठडीत असल्याचीही माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. तसेच  दुसऱ्या एकाप्रकरणी ओझर पोलिस स्टेशनमध्ये दोन गुन्हे दाखल असून तपास सुरू असल्याचेही शासनाकडून सांगण्यात आले. आमदार चव्हाण यांनी अधिवेशनादरम्यान फसवणूक झालेल्या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न सभागृहासमोर मांडल्याने शेतकरी वर्गाकडून याबाबत समाधान व्यक्त होत आहे.
 

इतर बातम्या
रत्नागिरी जिल्ह्याला पावसाने झोडपलेरत्नागिरी ः मुसळधार पावसाने जिल्ह्याला चांगलेच...
गोसे खुर्दमधून होणार चार हजार हेक्‍टरवर...चंद्रपूर ः धानपट्ट्यात पावसाअभावी अस्वस्थता आहे....
नाशिक जिल्ह्यात धरणांच्या तपासणीसाठी...नाशिक : जिल्ह्यातील धरणांच्या सुरक्षितेतसाठी...
पेठ तालुक्यात जमिनीतून निघताहेत...नाशिक : पेठ तालुक्यातील निरगुडे गावात दोन...
नांदेड जिल्ह्यात शेतकऱ्यांकडून २८...नांदेड : जिल्ह्यात पंतप्रधान पीकविमा योजनेंतर्गत...
पुणे, नगर जिल्ह्यात पावसाअभावी चारा...पुणे  : पावसाळ्यात जनावरांसाठी चाऱ्याची अडचण...
`स्वाभिमानी`चे नाशिक जिल्हा बॅंकेसमोर...नाशिक : जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची बँक आहे. ती...
आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली...मुंबई   : युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे...
नवती केळी दरात सुधारणाजळगाव  ः खानदेशात दर्जेदार नवती केळीच्या...
रत्नागिरीत भात लागवड अंतिम टप्प्यातरत्नागिरी   ः जिल्ह्यात उशिरा पण...
रत्नागिरी जिल्ह्यातील आठ हजार शेतकरी...रत्नागिरी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
युवा कृषी कौशल्य विकासासाठी सहकार्य करारपुणे ः आंतरराष्ट्रीय युवा कौशल्य दिनाचे औचित्य...
नगर जिल्ह्यातील ४८२ गावांमध्ये...नगर  ः पावसाळ्याचा एक महिना उलटून गेला असला...
नाशिकमध्ये ७९१ कोटींच्या प्रारूप...नाशिक : पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या...
दक्षिण महाराष्ट्रात देशी बेंदूर...कोल्हापूर : वर्षभर काबाडकष्ट करणाऱ्या...
महाराष्ट्राला ‘स्किल कॅपिटल' बनवावेः...मुंबई ः महाराष्ट्र शासनाच्या छत्रपती राजाराम...
कोकण, घाटमाथ्यावर हलक्या सरींचा अंदाज पुणे ः  उत्तर भारतामध्ये असलेल्या कमी...
तीन हजार शेतकऱ्यांच्या मूल्यांकनाचा...कोल्हापूर ः कृषी कौशल्य विकास प्रशिक्षण पूर्ण...
सांगली जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांचे...सांगली : जिल्ह्यातील एक हजारांवर द्राक्ष उत्पादक...
कर्जमाफीतील तक्रार निवारणासाठी समिती...पुणे ः छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...