Agriculture news in marathi For daytime power supply to agricultural pumps Provision of Rs. 1.5 crore in Ratnagiri | Agrowon

कृषिपंपांना दिवसा वीजपुरवठ्यासाठी रत्नागिरीत दीड कोटींची तरतूद

टीम अॅग्रोवन
रविवार, 5 जुलै 2020

रत्नागिरी  : अनिश्‍चित पावसाचा हंगाम लक्षात घेऊन शेतकऱ्यांना लागवडीसाठी प्रोत्साहित करण्यात येत आहे. यासाठी सौर कृषिपंप योजना राबवण्यात येत आहे. जिल्ह्यात कृषिपंपांना दिवसा वीजपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी दीड कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

रत्नागिरी  : अनिश्‍चित पावसाचा हंगाम लक्षात घेऊन शेतकऱ्यांना लागवडीसाठी प्रोत्साहित करण्यात येत आहे. यासाठी सौर कृषिपंप योजना राबवण्यात येत आहे. जिल्ह्यात कृषिपंपांना दिवसा वीजपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी दीड कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

जिल्ह्यात या योजनेला प्रतिसाद नव्हता. मात्र, आता सौरपंपाना वीज पुरवठा करण्यात येणार असल्याने यासाठी शेतकऱ्यांकडून ऑॅनलाईन प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. योजनेत कृषिपंपांना दिवसा कमीतकमी ४ तास वीज देण्यात येईल. त्यांना सवलतीच्या दराने वीज पुरवठा करण्यात येईल. 

शासनाने शेतकऱ्यांचा विचार करून लॉकडाऊन असताना विविध आर्थिक योजना नियोजित केल्या आहेत. सौर कृषिपंप योजनेद्वारे कृषिपंपांना दिवसा वीज पुरवठा देण्यासाठी ३३ लाखांचा निधी प्रस्तावित आहे. गेल्या २ वर्षांपासून शेती पंपासाठी नवीन वीज जोडणी देणे बंद आहे. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शेतीपंपासाठी कोकणातही लघुदाब वीज वाहिन्यांवरून नवीन वीज जोडण्या देण्याची योजना राबविण्यात येईल. आशियाई विकास बँकेच्या सहकार्यातून ही योजना लागू करण्यात येईल. 

सौर कृषी पंप योजना पुढील पाच वर्षांसाठी करण्यात आली आहे. या योजनाद्वारे प्रतिवर्ष एक लाख ५ हजार सौर कृषिपंप देण्यात येणार आहेत. अर्थसंकल्पात या योजनेसाठी ६७० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. योजनेत कृषिपंपांना दिवसा कमीतकमी ४ तास वीज देण्यात येईल. सध्या सरासरी वीजपुरवठा दर साडेसहा रुपये आहे. कृषिपंपांना १ रुपया ८८ पैसे या सवलतीच्या दराने वीज पुरवठा करण्यात येतो. 


इतर ताज्या घडामोडी
नांदेड, परभणी, हिंगोलीत जून, जुलैमध्ये...नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील ६९...
औरंगाबाद, जालन्यातील दोन मंडळांत...औरंगाबाद : औरंगाबाद व जालना जिल्ह्यातील दोन...
नांदेडमधील आठ केंद्रांत अडीच लाख...नांदेड : जिल्ह्यातील सात केंद्रांवरील शेतकऱ्यांची...
सोयाबीनमध्ये एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा...अंबड, जि. जालना  ः ‘‘सर्व शेतकऱ्यांनी...
नगर जिल्ह्यात १३२ टक्के पेरणीनगर ः नगर जिल्ह्यात यंदा चांगला पाऊस झाला....
खानदेशात ‘किसान सन्मान’चे अर्ज प्रलंबित...जळगाव  ः खानदेशात सुमारे सव्वालाख शेतकरी...
शेतकऱ्यांची कृषिमंत्र्यांना दोन हजार...जळगाव : केंद्र सरकारच्या हवामानावर आधारित फळ...
खानदेशात हलक्या जमिनीतील पिके संकटातजळगाव  ः खानदेशात मागील आठ ते १० दिवसांपासून...
जळगाव जिल्ह्यातील मका, ज्वारीची खरेदी...जळगाव : शासकीय मका, ज्वारी खरेदी पुन्हा सुरू...
माळेगाव कारखान्याचे अकरा लाख टन ऊस...माळेगाव, जि. पुणे ः माळेगाव सहकारी साखर...
अकोला कृषी विद्यापीठातील क्वारंटाइन...अकोला ः डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील...
नाशिक जिल्ह्यात चार हजारांवर शेतकरी मका...नाशिक : बाजारात व्यापाऱ्यांकडे खरेदी होणाऱ्या...
वीज बिल माफीसाठी सोमवारी राज्यभर धरणेकोल्हापूर : दरमहा ३०० युनिटसच्या आत वीज वापर...
कोल्हापूर जिल्ह्यात पुरेशा पावसाअभावी...कोल्हापूर : जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यांपासून...
पीकविमा भरण्यासाठी मुदतवाढीची मागणीअकोला ः पीकविमा पोर्टल व्यवस्थित न चालल्याने अनेक...
पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये कृत्रिम...रत्नागिरी : उच्च प्रतीची वंशावळ तयार करण्यासाठी...
कपाशीवरील फुलकिडे, पांढऱ्या माशीचे...फुलकिडे : ही कीड फिकट पिवळसर रंगाची असून अत्यंत...
सेंद्रिय शेतीबाबत शरद पवार घेणार बैठकपुणे ः राज्यातील सेंद्रिय व रासायनिक अवशेषमुक्त...
यवतमाळ जिल्ह्यात चार लाख शेतकऱ्यांनी...यवतमाळ : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पीक विमा...
कपाशीवरील किडींचे कामगंध सापळ्याद्वारे...पिकातील किडीच्या नियंत्रणासाठी एकात्मिक कीड...