Agriculture news in marathi Deadline for Aadhaar certification is 15th November | Agrowon

आधार प्रमाणीकरणास १५ नोव्हेंबरपर्यंत मुदत

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 26 ऑक्टोबर 2021

धुळे : ‘‘महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०१९ मधील जिल्ह्यातील ज्या ८११ शेतकऱ्यांचे कर्जखाते आधार क्रमांक प्रमाणीकरण प्रलंबित आहे. त्यांच्यासाठी १५ नोव्हेंबरपर्यंत विशेष मोहीम राबविण्यात येईल’’, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक अभिजित देशपांडे यांनी दिली. 

धुळे : ‘‘महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०१९ मधील जिल्ह्यातील ज्या ८११ शेतकऱ्यांचे कर्जखाते आधार क्रमांक प्रमाणीकरण प्रलंबित आहे. त्यांच्यासाठी १५ नोव्हेंबरपर्यंत विशेष मोहीम राबविण्यात येईल’’, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक अभिजित देशपांडे यांनी दिली. 

दरम्यान, ही योजना अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे आधार प्रमाणीकरणासाठी ही शेवटची संधी आहे. आधार प्रमाणीकरण न झाल्यास संबंधित लाभार्थ्यास कर्जमुक्तीचा लाभ मिळू शकणार नाही, असेही देशपांडे यांनी म्हटले आहे. 
राज्य शासनाच्या सहकार विभागाकडील शासन निर्णयानुसार धुळे जिल्ह्यातील धुळे व नंदुरबार जिल्हा बँक, सर्व राष्ट्रीयीकृत, व्यापारी व खासगी बँकांतर्फे महात्मा जोतिराव फुले शेतकरी व कर्जमुक्ती योजना-२०१९ ची अंमलबजावणी सुरू आहे. ही योजना सद्य:स्थितीत अंतिम टप्प्यात आहे.

योजनेंतर्गत कर्जमाफीचा लाभ मिळविण्यासाठी आधार प्रमाणीकरण बंधनकारक आहे. जानेवारी २०२१ अखेर शासनाकडून प्रसिद्ध झालेल्या याद्यांपैकी धुळे जिल्ह्यातील ८११ कर्जखाती आधार प्रमाणीकरणासाठी सप्टेंबर-२०२१ अखेर प्रलंबित असल्याचे दिसून येत आहे. 

शिल्लक लाभार्थ्यांची यादी संबंधित तालुका उप/सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था (धुळे, साक्री, शिरपूर, शिंदखेडा) यांच्या कार्यालयास पाठविलेली आहे, असे देशपांडे यांनी म्हटले. 

‘शेवटची संधी’ 

आधार प्रमाणीकरणासाठी ही शेवटची संधी आहे. अन्यथा, कर्जमुक्तीचा लाभ मिळू शकणार नाही. योजनेच्या निकषानुसार पात्र व कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांनी संबंधित उप/सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था यांच्या कार्यालयास किंवा संबंधित बँकेत तत्काळ संपर्क करावा, शिल्लक आधार प्रमाणीकरण यादीत नाव असलेल्या लाभार्थ्यांनी जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रावर, ‘सीएससी’ सेंटरवर मुदतीत आधार प्रमाणीकरण करून घ्यावे, असे आवाहन देशपांडे यांनी केले.


इतर बातम्या
किमान तापमानात घट होण्याची शक्यतापुणे : राज्यात पावसाने उघडिप दिल्यानंतर किमान...
‘महाडीबीटी’च्या कामात अडथळाअकोला ः कृषी खात्याच्या विविध योजनांचा लाभ...
कृषी निविष्ठा केंद्रांचे परवाने आता...पुणे ः राज्यातील कृषी सेवा केंद्रांना परवान्याची...
आयातीमुळे कडधान्य दर दबावातपुणे ः तुरीचा हंगाम पुढील काही दिवसांत सुरू होईल...
...तर द्राक्षाचे नुकसान टळले असतेनाशिक : गेल्या तीन वर्षांपासून कसमादे भागातील...
साहित्य संमेलनाचे अनुदान शेतकरी,...नाशिक : वामनदादा कर्डक जन्मशताब्दी साहित्यनगरी...
देशी वाणाने सकस उत्पादन ः राहीबाई पोपेरेसांगली : पारंपरिक बियाणाला रासायनिक खताच्या...
वीज पुरवठा सुरळीत न केल्यास  ढोरा...शेवगाव, जि. नगर : महावितरणने थकीत वीज बिलासाठी...
सहा हजार शेतकऱ्यांना नवीन पीककर्ज परभणी ः जिल्ह्यात यंदाच्या (२०२१-२२) रब्बी...
मॉन्सूनोत्तर पावसाचा सांगलीत  १२ हजार...सांगली : अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील द्राक्ष,...
शिवरायांच्या स्वराज्यापासून महात्मा...कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी...
मराठवाड्यात आंब्यावर संकटाचे ढगऔरंगाबाद : यंदा आंब्यावर संकटाचे ढग कायम आहेत....
उचंगी प्रकल्पग्रस्तांचे शंभर टक्के...   कोल्हापूर : आजरा तालुक्यातील उचंगी...
श्रीरामपुरात बिबट्याचे चार तास...श्रीरामपूर, जि. नगर ः श्रीरामपूर शहरातील मोरगे...
शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत करू :...सांगली ः गेल्या काही दिवसापांसून संपूर्ण राज्यात...
क्षारपड जमीन सुधारण्यासाठी  केंद्राचे...कोल्हापूर : क्षारपड जमीन सुधारणा योजनेस केंद्र...
पावसामुळे द्राक्ष बागांचे  दोन हजार...पुणे ः जिल्‍ह्यात गेल्या आठवड्यात १ आणि २ डिसेंबर...
खानदेशात पुन्हा ढगाळ वातावरण कायम जळगाव ः  खानदेशात पावसाळी व ढगाळ वातावरण...
चाळीसगाव (जि.जळगाव) : अवकाळी पावसामुळे...चाळीसगाव, जि.जळगाव : चाळीसगाव, पाचोरा, भडगाव आदी...
जळगावः अॅग्रोवन व आयसीएल कंपनीतर्फे...जळगाव ः ॲग्रोवन आणि आयसीएल कंपनीच्या संयुक्त...