Agriculture news in Marathi, Deadline for 'ABM' Admission application is till August 3 | Agrowon

‘एबीएम’ प्रवेश अर्जासाठी तीन ऑगस्टपर्यंत मुदत

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 1 ऑगस्ट 2019

पुणे : राज्यातील कृषी व्यवसाय व्यवस्थापन (एबीएम) पदवी प्रवेशासाठी अर्ज भरण्याची अंतिम मुदत तीन ऑगस्टपर्यंत ठेवण्यात आली आहे.तसेच, पहिल्या फेरीची निवड यादी १४ ऑगस्टला प्रसिद्ध होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

पुणे : राज्यातील कृषी व्यवसाय व्यवस्थापन (एबीएम) पदवी प्रवेशासाठी अर्ज भरण्याची अंतिम मुदत तीन ऑगस्टपर्यंत ठेवण्यात आली आहे.तसेच, पहिल्या फेरीची निवड यादी १४ ऑगस्टला प्रसिद्ध होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

‘एबीएम’ला ‘व्यावसायिक दर्जा’ देण्यासाठी विद्यार्थ्यांनी काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेसमोर जोरदार आंदोलन केले होते. राज्य शासनाने या समस्येबाबत कृषी सचिवांकडून अहवाल सादर करण्याच्या सूचनादेखील दिल्या आहेत. दरम्यान, एबीएम अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची प्रक्रिया २६ जुलैपासून सुरू केली गेली आहे. राज्यातील कृषी विद्यापीठांमार्फत ही प्रक्रिया राबविली जात आहे. एकूण ६०० जागांसाठी यंदा प्रवेश दिले जात आहेत. प्रवेशासाठी www.maha-agriadmission.in  या संकेतस्थळाची मदत विद्यार्थी घेत आहेत. सीईटी परीक्षा अथवा राष्ट्रीय स्तरावरील परीक्षेतील गुणांक भारानुसार ‘एबीएम’चे प्रवेश दिले जात आहेत. त्यासाठी विद्यार्थ्यांना प्रवेशाची सर्व कागदपत्रे शनिवारपर्यंत (ता. ३) अपलोड करावी लागतील. त्यानंतर विविध समस्या असलेल्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन हरकती ७ ते ९ ऑगस्टदरम्यान नोंदविता येतील.

हरकती व एकूण अर्जांचा आढावा घेत अंतिम गुणवत्ता यादी १२ ऑगस्टला प्रसिद्ध होईल. या विद्यार्थ्यांना १५ ते १७ ऑगस्टपासून संबंधित संस्थांमध्ये प्रवेश घेता येतील. २० ऑगस्टला दुसरी निवड यादी प्रसिद्ध होईल व त्याचे प्रवेश २१ ते २२ ऑगस्ट प्रवेश होतील. तिसरी निवड यादी २६ ऑगस्टला प्रसिद्ध होत असून, त्यातील प्रवेश २७ ते २८ ऑगस्टला पूर्ण होतील. 


इतर ताज्या घडामोडी
भाटी मिऱ्या समुद्रात नांगरलेली जहाज...चिपळूण, रत्नागिरी : निसर्ग चक्रीवादळाचा जोरदार...
जीएम पिकांच्या मान्यतेसाठी केंद्राकडे...नागपूर: जागतिकस्तरावर जीएम पिकांच्या लागवडीस...
विविध मागण्यांसाठी रेशन दुकानदार ...नाशिक: राज्यातील स्वस्त धान्य दुकानदार व...
मका खरेदी तातडीने सुरू कराबुलडाणा ः मोताळा तालुक्‍यात मागील दहा दिवसांपासून...
शेतकऱ्यांना त्रास झाल्यास भाजप आंदोलन...अकोला ः शेतकऱ्यांना बी-बियाणे, कर्जपुरवठा तसेच...
सिंधुदुर्गात पाऊस सुरूच सिंधुदुर्ग: जिल्ह्यात तिसऱ्या दिवशीही...
जादा खरेदी दर, नापासच्या अधिक ...अकोला ः महाबीजने सोयाबीन वाणाच्या प्रमाणित...
ऊस उत्पादक केंद्राचे वैरी आहेत काय? कोल्हापूर: केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दिलेल्या...
अकोला जिल्हा परिषदेचा ७६ कोटींचा निधी...अकोला  ः ‘कोरोना’मुळे निर्माण झालेल्या...
हिंगोली जिल्ह्यात ५९ कोटींचे पीककर्ज...हिंगोली   ः हिंगोली जिल्ह्यातील विविध...
कापूस, सोयाबीन उत्पादक विमा...गडचिरोली: धान उत्पादक ३४ हजार शेतकऱ्यांना सुमारे...
नांदेडमध्ये ४७ कोटी ४७ लाखांचे पीक कर्ज...नांदेड : नांदेड जिल्ह्यातील बॅंकांनी...
जालन्यात पाच हजार टन खते एकाच दिवशी...जालना  : जिल्ह्यात एकाच दिवशी पाच हजार...
कर्जमुक्‍ती योजनेची प्रक्रिया ३०...भंडारा ः शासनाने जाहीर केलेल्या महात्मा ज्योतिराव...
जयपूरमध्ये वीज पडून लाखो रुपयांच्या...नाशिक : पूर्वमोसमी पाऊस सुरू झाल्यानंतर बागलाण...
बुलडाणा जिल्ह्यात १५ तारखेपर्यंत...बुलडाणा  : यंदा जिल्ह्यात मॉन्सूनपूर्व पाऊस...
भाजीपाल्याची थेट खरेदी विक्री व्यवस्था...पुणे ः कोरोना टाळेबंदीमध्ये शहरातील विविध भागात...
सातारा जिल्ह्यात सर्वदूर पावसाची हजेरीसातारा ः जिल्ह्यात सोमवारी सर्वदूर पावसाने हजेरी...
कापूस खरेदीसाठी शेतकऱ्यांचा रास्तारोकोयवतमाळ ः महागाव तालुक्‍यातील गुंज येथील...
पुणे जिल्ह्यात पीककर्ज वितरणात...पुणे ः लाॅकडाऊनच्या काळात होरपळून निघालेल्या...