agriculture news in marathi, deadline extend for last year sugar export | Agrowon

गेल्या वर्षीच्या साखर निर्यातीसाठी मुदतवाढ

राजकुमार चौगुले
शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020

कोल्हापूर : गेल्या वर्षीची (२०१८-१९) साखर निर्यात करण्यासाठी केंद्र सरकारने दीड महिन्याचा कालावधी वाढवून दिला आहे. १५ फेब्रुवारीअखेर आता कारखान्यांना नव्याने साखर निर्यात करता येणार आहे.

कोल्हापूर : गेल्या वर्षीची (२०१८-१९) साखर निर्यात करण्यासाठी केंद्र सरकारने दीड महिन्याचा कालावधी वाढवून दिला आहे. १५ फेब्रुवारीअखेर आता कारखान्यांना नव्याने साखर निर्यात करता येणार आहे.

गेल्या वर्षी ज्या साखर कारखान्यांनी काही प्रमाणात साखर निर्यात केलेली आहे. नवीन करार करताना ज्यांना अडचणी आल्या आहेत. त्यांना या मुदतवाढीचा फायदा मिळण्याची शक्‍यता आहे. सुरुवातीला ३० सप्टेंबरपर्यंत निर्यातीची मुदत होती. यानंतर यात वाढ होऊन ती ३१ डिसेबर अशी करण्यात आली. कारखान्यांच्या अडचणी पाहून या मुदतीत पुन्हा दीड महिन्याची वाढ करण्यात आल्याचे पत्र केंद्रीय अन्न नागरी पुरवठा ग्राहक मंत्रालयाचे सचिव जितेंद्र जुयल यांनी ११ फेबुवारीस कारखान्यांना दिले आहे. १५ फेब्रुवारीपर्यंत झालेले करार अनुदानास प्राप्त ठरणार आहेत.

दरम्यान, ही मुदत वाढ फक्त ज्यांनी थोड्या प्रमाणात तरी साखर निर्यात केली आहे, त्यांच्यासाठीच आहे. ज्या साखर कारखान्यांनी अजिबातच साखर निर्यात केलेली नाही. त्यांची माहिती मंत्रालयाने जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात कारखान्यांकडून मागविली आहे. येत्या काही दिवसांत ही माहिती केंद्राला प्राप्त झाल्यानंतर निर्यातीला नापसंती दाखविणाऱ्या कारखान्यांनाचा कोटा इतर कारखान्यांना देण्यात येणार आहे.

महाराष्ट्रातील कारखान्यांना फटका बसणार?
साखर निर्यातीच्या बाबतीत महाराष्ट्रातील कारखाने पिछाडीवर आहेत. उत्तर प्रदेशाने आपल्या कोट्याएवढी साखर निर्यात केली आहे. तेथील कारखाने खासगी असल्याने त्यांनी तातडीने आंतराष्ट्रीय पातळीवर वाढणाऱ्या दराचा फायदा घेऊन साखर निर्यातीचे करार केले. परंतु महाराष्ट्रातील कारखान्यांनी मात्र यात चालढकलपणा केला. राज्यातील साखरेवर बॅंकांचे कर्ज असल्याने काही कारखान्यांना साखर निर्यात करता आली नाही. याचा फटकाही कारखान्यांना बसू शकतो. उत्तर प्रदेशातील कारखान्यांनी निर्धारित निर्यात पूर्ण केल्याने हा कोटा तेथील कारखान्यांना मिळू शकतो. या कारखान्यांनी निर्यात करार न केल्यास केंद्राच्या इतर सवलतींपासूनही निर्यात न करणाऱ्या कारखान्यांना मुकावे लागण्याची शक्‍यता आहे.

गेल्या सहा महिन्यांपासून केंद्रीय अन्न नागरी पुरवठा ग्राहक मंत्रालयाच्या वतीने कारखान्यांना सातत्याने निर्यातीबाबतचे आवाहन करण्यात येत आहे. उत्तर प्रदेशातील साखर कारखान्यांनी याला तातडीने प्रतिसाद देऊन साखर निर्यात केले. साधारणत: ३० लाख मेट्रिक टनांचे साखर करार झाले आहेत. यापैकी १५ लाखांहून अधिक टन साखर निर्यात झाली आहे. निर्यात प्रक्रियेत उत्तर प्रदेश आघाडीवर आहे. जानेवारी महिन्यात महाराष्ट्रातील काही कारखान्यांनी काही प्रमाणात निर्यात करार करण्यास प्राधान्य दिले. पण ते कारखानेही अपेक्षित निर्यात करू शकले नसल्याची स्थिती आहे. राज्यातून केवळ ५ ते ६ लाख मेट्रिक टन साखर निर्यात होऊ शकली.

राज्यातील साखर कारखान्यांनी कोणत्याही परिस्थितीत जास्तीत जास्त साखर निर्यात करणे गरजेचे आहे. अन्यथा, या कारखान्यांचा कोटा उत्तर प्रदेशातील कारखान्यांना मिळू शकतो. सध्या आंतराष्ट्रीय पातळीवर असलेली दरवाढ ही किती दिवस राहील याची शाश्‍वती नसल्याने आताच निर्यात करण्यास कारखान्यांना संधी आहे.
- प्रकाश नाईकनवरे,
व्यवस्थापकीय संचालक, राष्ट्रीय सहकारी साखर महासंघ


इतर अॅग्रोमनी
अन्नधान्याचे यंदा विक्रमी उत्पादन नवी दिल्ली: देशात यंदा खरीप हंगामात...
राज्यातील रेशीम बाजारात १० कोटींची...नागपूर ः राज्यात रेशीमकोष खरेदी बाजारपेठेला...
आर्थिक निर्णयांनी वाढवला प्रियंकाताईंचा...पती गौरव काकडे यांच्या आग्रहावरून पुणे शहरातील...
गेल्या वर्षीच्या साखर निर्यातीसाठी...कोल्हापूर : गेल्या वर्षीची (२०१८-१९) साखर निर्यात...
आंतरराष्ट्रीय डाळ परिषदेकडे उद्योजकांचे...पुणे  : जागतिक कडधान्य उत्पादन व बाजारपेठेला...
कच्च्या साखरेच्या दरात उच्चांकी वाढकोल्हापूर : जागतिक बाजारात कच्च्या साखरेच्या दरात...
साखरेच्या दुहेरी किमतीसाठी सूत्र तयार...नवी दिल्ली: साखरेचे घसरणारे दर स्थिर...
आंतरपिकांतून कुटुंबाचे अर्थकारण केले...माचले (ता. चोपडा, जि. जळगाव) येथील दीपक माणिक...
खानदेशात १२ लाख गाठी बाजारात कापसाची आवकजळगाव : कापसाची खेडा खरेदी मागील आठवड्यात...
ब्राझील भारताकडून गव्हासह भरडधान्य...नवी दिल्ली: दोन्ही देशांच्या कृषिमंत्र्यांमध्ये...
हरभरा, सोयाबीन वगळता सर्व पिकांच्या...खरीप पिकाच्या उत्पादनात जरी घट अपेक्षित असली तरी...
खाद्यतेल आयात शुल्क कमी कराः ग्राहक...नवी दिल्ली: देशांतर्गत वाढलेले खाद्यतेलाचे...
खाद्यतेल बाजारात सटोडियांकडून खोड्याचा...पुणे : खाद्यतेलासह तेलबिया वायदे बाजारात सध्या...
नव्या बेदाण्यास १७५ रुपये दर तासगाव, जि. सांगली ः तासगाव कृषी उत्पन्न बाजार...
कापड गिरण्या बाजारातून कापूस खरेदीस...मुंबई ः साउथ इंडियन मिल्स असोसिएशनने केंद्रीय...
देशात साखर उत्पादनात २६ टक्के घटनवी दिल्ली ः देशात १५ जानेवारीपर्यंत ४४० साखर...
साखर दराची दुहेरी पद्धत ठरवाकोल्हापूर : साखर उद्योगाला बळकटी आणण्यासाठी...
जालन्यात रेशीम कोषाला मिळाला ५०० रुपये...जालना : येथील बाजार समितीच्या आवारात रेशीम कोष...
तादंळाच्या आफ्रिकेतील बाजारपेठेवर चीनचा...नवी दिल्ली : तांदळाची आयात करणारा देशच आता...
खान्देशची केळी निर्यातीत आघाडीकेळीने जगात जळगावला मोठी ओळख दिली आहे. ही ओळख...