Agriculture news in Marathi Deadline for funding expenditures to government departments | Agrowon

शासकीय विभागांना निधी खर्चाची ३१ मार्च डेडलाइन 

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 16 जानेवारी 2020

सातारा : पाच महिने निवडणुकीच्या आचारसंहितेत गेल्यामुळे नियोजन समितीकडून प्राप्त झालेला निधी खर्च झालेला नाही. त्यामुळे आता ३१ मार्चपर्यंत उपलब्ध निधी खर्च करण्याचे आव्हान सर्व शासकीय विभागांवर आहे. जिल्हा परिषदेचा ४५ कोटी रुपयांचा निधी अखर्चीत असून, जिल्हा नियोजन समितीला मिळालेल्या ६० टक्के निधीपैकी ३५ टक्के निधी अखर्चीत आहे. त्यामुळे अडीच महिन्यांत उपलब्ध झालेला निधी खर्च करावा लागणार आहे. 

सातारा : पाच महिने निवडणुकीच्या आचारसंहितेत गेल्यामुळे नियोजन समितीकडून प्राप्त झालेला निधी खर्च झालेला नाही. त्यामुळे आता ३१ मार्चपर्यंत उपलब्ध निधी खर्च करण्याचे आव्हान सर्व शासकीय विभागांवर आहे. जिल्हा परिषदेचा ४५ कोटी रुपयांचा निधी अखर्चीत असून, जिल्हा नियोजन समितीला मिळालेल्या ६० टक्के निधीपैकी ३५ टक्के निधी अखर्चीत आहे. त्यामुळे अडीच महिन्यांत उपलब्ध झालेला निधी खर्च करावा लागणार आहे. 

जिल्हा नियोजन समितीचा २०१९- २० साठीचा आराखडा २५६ कोटींचा होता; पण वर्षभर दोन वेळा लोकसभा व विधानसभेची एक वेळा निवडणूक झाली. या निवडणुकांच्या आचारसंहितेत पाच महिने गेले. त्यामुळे गेल्या वर्षी जुलैमध्ये झालेल्या नियोजन समितीची बैठक आता नवीन वर्षात जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात २१ तारखेला होणार आहे. यामध्ये नवीन वर्षात विविध विभागांना निधी वाटप होईल, तसेच अखर्चीत निधी खर्चासाठीचे ही नियोजन होणार आहे.

मुळात नियोजन समितीचा निधी ३१ मार्चपर्यंत खर्च करायचा असतो; पण निवडणुकीच्या आचारसंहितेत कालावधी गेल्याने नियोजन समितीला मिळालेला ६० टक्के निधी उपलब्ध झाला. कामे मंजूर असली, तरी आचारसंहितेमुळे ही कामे सुरू झालेली नाहीत. त्यामुळे ३५ टक्के निधी आगामी अडीच महिन्यांत खर्च करावा लागणार आहे. उर्वरित ४० टक्के निधी उपलब्ध झाल्यास त्याचे वाटपही विविध विभागांना करून तो खर्चाचे नियोजन करावे लागणार आहे.

जिल्हा परिषदेला सर्वाधिक ११० कोटींचा निधी नियोजन समितीतून दिला होता. मात्र, त्यापैकी ४५ कोटींचा निधी अखर्चीत राहिलेला आहे, तसेच २०१८-१९ मधीलही काही निधी अखर्चीत राहिलेला आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेकडून निधी खर्चासाठी प्रयत्न करावे लागणार 
आहेत.

पालकमंत्र्यांचे लक्ष राहणार 
मागील पालकमंत्री विजय शिवतारे हे पुरंदर तालुक्‍यातील असल्याने केवळ बैठका व कार्यक्रमांसाठी ते जिल्ह्यात येत होते. आता नवे पालकमंत्री बाळासाहेब पाटील हे जिल्ह्यातीलच असल्याने त्यांचे नियोजन समितीच्या कामकाजावर लक्ष राहणार आहे. केवळ निधीच नव्हे, तर सर्व विभागांना चांगल्याप्रकारे निधी उपलब्ध करून चांगल्या दर्जाची कामे करून घेण्यावरही नवीन पालकमंत्री निश्‍चित भर देतील, अशी सातारकरांना आशा आहे.


इतर ताज्या घडामोडी
असे करा जनावरांतील पोटफुगीला प्रतिबंधसर्वच मोसमामध्ये चांगल्या प्रतीचा चारा मिळेल अशी...
खानदेशात बाजरीचे क्षेत्र वाढणारजळगाव ः खानदेशात बाजरीचे क्षेत्र यंदा सुमारे...
बुलडाणा जिल्हा संपन्न करण्यासाठी...बुलडाणा  ः ‘‘जिल्ह्याच्या सर्वांगिण...
शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासन...नाशिक  : शेतकऱ्याला तातडीची मदत मिळावी,...
शरद पवार हेदेखील पंतप्रधान होऊ शकतात :...नाशिक : केंद्राने सूडबुद्धीने शरद पवार यांना...
रत्नागिरी जिल्हा परिषदेत रिक्तपदांमुळे...रत्नागिरी : मंजूर पदांपेक्षा रिक्त पदांची संख्या...
मराठवाड्यात ज्वारीवर चिकटा, मावा;...औरंगाबाद :  औरंगाबाद, जालना व बीड या...
शिवभोजन थाळी योजनेचे पुण्यात उद्‌घाटन पुणे : शासनाच्या अन्न, नागरीपुरवठा व ग्राहक...
शेतकऱ्यांच्या विकासासाठी सरकार कटिबद्ध...नगर  ः  शेतकरी केंद्रबिंदू मानून राज्य...
पुणे बाजार समितीत भाजीपाल्याचे दर स्थिरपुणे  ः पुणे बाजार समितीच्या शनिवार (ता. २५...
सातारा जिल्ह्यातील प्रलंबित सिंचन...सातारा  : प्रलंबित असलेले जिल्ह्यातील सिंचन...
बाजार समिती निवडणुकीत शेतकऱ्यांना ...नाशिक  : कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या...
पीकविमा योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी...मुंबई : अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना...
पुण्यात कृषी आयटीआय संस्था सुरू करणार...पुणे : कृषी, सहकार, उद्योग विभागाला चालना...
मराठवाड्यातील पाणीप्रश्नाबाबत...औरंगाबाद  : कुणावर आक्षेप घेण्यासाठी नव्हे;...
पद्मश्री जाहीर होताच हिवरेबाजारमध्ये...नगर ः आदर्श गाव संकल्प व प्रकल्प समितीचे...
हिवाळी हंगामात पौष्टिक चाऱ्यासाठी करा...बरसीम (शास्त्रीय नावः ट्रायफोलियम...
नगरमध्ये गवार, लसणाच्या दरांत सुधारणा...नगर ः नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत लसूण,...
सोलापुरात हिरवी मिरची, वांगी,...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
पुणे जिल्हा परिषदेचा ‘एक पुस्तक' पॅटर्न...पुणे : विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी...