तुरीच्या, हरभऱ्याच्या खरेदीसाठी ऑनलाइन नोंदणीची ३१ मेपर्यंत मुदत

औरंगाबाद : खरीप हंगामातील तुरीच्या, हरभऱ्याच्या खरेदीसाठी ऑनलाइन नोंदणीची मुदत ३१ मे पर्यंत वाढविण्यात आली आहे, अशी माहिती मार्केटिंग फेडरेशन व सहकार विभागाच्या सूत्रांनी दिली.
 Deadline for online purchase of Turi, Gram till 31st May
Deadline for online purchase of Turi, Gram till 31st May

औरंगाबाद : खरीप हंगामातील तुरीच्या, हरभऱ्याच्या खरेदीसाठी ऑनलाइन नोंदणीची मुदत ३१ मे पर्यंत वाढविण्यात आली आहे, अशी माहिती मार्केटिंग फेडरेशन व सहकार विभागाच्या सूत्रांनी दिली. 

आधी ३० एप्रिलपर्यंत सुरू असलेली तूर खरेदी आता ३१ मे पर्यंत सुरू राहील. परंतु, आता तुरीची ऑनलाइन नोंदणी करता येणार नाही. ज्या शेतकऱ्यांनी विहित मुदतीत तूर नोंदणी केली. त्यांनाच तूर खरेदी केंद्रावर आणता येईल. यासोबतच हंगाम २०१९-२० मध्ये नाफेडमार्फत हरबरा ऑनलाइन नोंदणीसाठी ३१ मे पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे सर्व सब एजंट संस्थांना विहीत मुदतीपर्यंत हरभरा नोंदणी सुरू ठेवण्याचे सूचित करण्यात आले आहे. 

औरंगाबाद जिल्ह्यात ८ केंद्र, जालन्यात ६, बीडमध्ये १० लातूर १२ खरेदी केंद्र आहेत. औरंगाबाद जिल्ह्यात महाराष्ट्र पणन महासंघ, जिल्हा पणन आधिकाऱ्यांतर्फे औरंगाबाद, खुलताबाद, गंगापूर, सोयगाव आणि विदर्भ सहकारी मार्केटिंग फेडरेशनतर्फे पैठण आणि लासूर स्टेशन येथे तूर खरेदी सुरू आहे. पणन महासंघातर्फे खुलताबाद, गंगापूर आणि औरंगाबाद येथे हरभरा खरेदी सुरू आहे. विदर्भ सहकारी महासंघातर्फे पैठण आणि लासूर स्टेशन येथे हरभरा खरेदी दोन दिवसांत सुरू होईल, असे जिल्हा उपनिबंधक कार्यालयातर्फे कळविण्यात आले.  कापूस खरेदी सुरु, मका खरेदीला प्रतीक्षा 

कापूस पणन महासंघातर्फे बालानगर, नीलजगाव (ता.पैठण), गंगापूर, सिल्लोड आणि खामगाव फाटा (ता. फुलंब्री) येथे आणि भारतीय कापूस निगमतर्फे (सीसीआय) दोनगाव, लासूर स्टेशनजवळ (ता.गंगापूर) येथे कापूस खरेदी सुरू आहे. औरंगाबाद जिल्ह्यात मका खरेदी सुरू करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार महाराष्ट्र पणन महासंघ मुंबई यांनी २० एप्रिल २०२० रोजी सहसचिव, अन्न व नागरी पुरवठा विभाग मुंबई यांना शिफारस केली आहे. आद्याप त्यास मान्यता मिळाली नसल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक दाबशेडे यांनी दिली.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com