Deadline for participation in kharif season crop insurance in Sangli till 31st July
Deadline for participation in kharif season crop insurance in Sangli till 31st July

सांगलीत खरीप हंगामातील पीकविमा सहभागासाठी ३१ जुलैपर्यंत मुदत

सांगली : पंतप्रधान पीक विमा योजना जिल्ह्यात भात, खरीप ज्वारी, बाजरी, भुईमूग, सोयाबीन, मूग, उडीद, कापूस या पिकांसाठी महसूल मंडळ, मंडळ गटस्तरावर तसेच, मका व तूर पिकांसाठी तालुका गटस्तरावर विमा क्षेत्र घटक धरुन रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीतर्फे राबवण्यात येत आहे. या योजनेत शेतकऱ्यांनी भाग घेण्यासाठी अंतिम मुदत ३१ जुलैपर्यंत आहे.

या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे अर्थिक स्थैर्य अबाधित राखण्याचे काम होत आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी योजनेमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन कृषी विभागाने केले. पीकनिहाय प्रति हेक्‍टर शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता व कंसात विमा संरक्षित रक्कम अशी - भात ६०० (३० हजार रूपये), खरीप ज्वारी ५०० (२५ हजार रूपये), बाजरी ४४० (२२ हजार रूपये), भुईमूग ६०० (३० हजार रूपये), सोयाबीन ८०० (४० हजार रूपये), मूग ३६० (१८ हजार रूपये), तूर ५०० (२५ हजार रूपये), उडीद ३६० (१८ हजार रूपये), मका ६०० (३० हजार रूपये). 

योजनेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या कर्जदार शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज करताना सोबत आधार कार्ड /आधार नोंदणीची प्रत, ७/१२ उतारा, भाडेपट्टा करार असेल तर करारनामा, सहमती पत्र, पेरणी घोषणापत्र आणि बॅंक पासबुकची झेरॉक्‍स, मोबाईल क्रमांक इत्यादी अर्जास जोडणे आवश्‍यक आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com