Agriculture news in Marathi, Deadline for proposals for agricultural schemes under Zilla Parishad | Page 2 ||| Agrowon

नांदेड ः जिल्हा परिषदेअंतर्गत कृषी योजनांच्या प्रस्तावांसाठी मुदतवाढ

टीम अॅग्रोवन
सोमवार, 9 सप्टेंबर 2019

नांदेड ः डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना आणि बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना (२०१९-२०) अंतर्गत नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ऑनलाइन अर्ज करण्यासाठी गुरुवार (ता. ५) ते गुरुवार (ता. १९ )पर्यंत विशेष बाब म्हणून कृषी आयुक्तालयाने मुदतवाढ दिली आहे.

नांदेड ः डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना आणि बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना (२०१९-२०) अंतर्गत नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ऑनलाइन अर्ज करण्यासाठी गुरुवार (ता. ५) ते गुरुवार (ता. १९ )पर्यंत विशेष बाब म्हणून कृषी आयुक्तालयाने मुदतवाढ दिली आहे.

यापूर्वी या योजनांतर्गत ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा www.agriwell.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर ५ ऑगस्ट ते बुधवार (ता. ४)पर्यंत उपलब्ध करून देण्यात आली होती. मंगळवार (ता. ३) पासून संकेतस्थळ पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होत नसल्यामुळे बरेच लाभार्थी ऑनलाइन नोंदणी करू शकले नाहीत. तसेच, ग्रामसेवक यांचे राज्यव्यापी आंदोलन सुरू असल्यामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणारे प्रमाणपत्र ग्रामसेवकाकडून मिळत नाही. 

त्यामुळे या योजनेंतर्गत ऑनलाइन अर्ज स्वीकारण्यासाठी मुदतवाढ मिळावी, यासाठी कृषी विकास अधिकारी संतोष नादरे यांनी कृषी आयुक्तालयास प्रस्ताव सादर केला होता. त्यामुळे या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी आता गुरुवार (ता. १९)पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. गरजू शेतकऱ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा. 

संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करावेत. अधिक माहितीसाठी पंचायत समितीचे कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती दत्तात्रेय लक्ष्मण रेड्डी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शरद कुलकर्णी, कृषी विकास अधिकारी संतोष नादरे यांनी केले आहे.


इतर ताज्या घडामोडी
अकोला बाजार समितीचे गरजूंना पाठबळअकोला ः कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पुढाकाराने...
उशिराच्या गव्हाला वाढत्या तापमानाचा...जळगाव  ः खानदेशात गहू पिकाची स्थिती...
पपई दरांचा नंदुरबारात पुन्हा तिढाशहादा, जि. नंदुरबार  : सध्या मंदी असल्याने...
पीकविमा भरपाई न मिळाल्यास तीव्र आंदोलन...अमरावती  ः जिल्ह्यात खरीप व रब्बी हंगामात...
गडचिरोली : 'आयसीएआर'ची काजू पीक...गडचिरोली  ः भात उत्पादक पूर्व विदर्भात...
ऐन फेब्रुवारीतच उन्हाळ्याच्या झळा पुणे : राज्यात कमाल तापमानात मोठी वाढ झाल्याने...
वनबंधू योजना सुरू करण्यासाठी केंद्राकडे...नाशिक : आदिवासी विभागाच्या वनबंधू योजनेअंतर्गत १४...
मराठवाड्यातील रेशीम प्रकल्पाला ग्रीन...औरंगाबाद : झपाट्याने विस्तारत असलेल्या रेशीम...
`गोवर-रुबेला'त सोलापूर जिल्ह्यात...सोलापूर : केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘गोवर-...
सांगली जिल्ह्यात शेत, पाणंद रस्त्यांचे...लेंगरे, जि. सांगली : शेत आणि पाणंद रस्त्यांचे...
पाणीवाटप संस्थेद्वारे मिळणार ‘ताकारी’चे...सांगली : ताकारी उपसा सिंचन योजनेच्या लाभ...
मका संशोधन केंद्राचे भिजत घोंगडेऔरंगाबाद : कार्यकारी परिषदेच्या ठरावानंतर...
पोकरा योजनाही आता टार्गेट ओरिएंटेडअकोला ः बदललेल्या वातावरणामुळे शेतीवर विपरीत...
यात्रोत्सवानिमित्त आदिशक्ती मुक्ताईचा...मुक्ताईनगर/चांगदेव, जि. जळगाव ः कोथळी व मेहूण...
पुणे विभागात हरभरा पेरणी क्षेत्रात घटपुणे ः बदलत्या हवामानामुळे अनेक शेतकऱ्यांनी...
फडणवीस सरकारच्या पन्नास कोटी...मुंबई ः फडणवीस सरकारच्या काळातील ५० कोटी...
पाणीप्रश्‍नावर चळवळ उभी राहणे गरजेचे ः...औरंगाबाद : पाण्याची उपलब्धता करून घेण्यासोबतच...
बागायती पिके पाण्याअभावी वाळू लागलीढेबेवाडी, जि. सातारा : ऊस व गव्हासह अन्य बागायती...
परभणीत शेतकरी प्रश्‍नांवर भाजपचे धरणे...परभणी ः जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सोयाबीनचा पीकविमा...
सुधारित पद्धतीने करा हळद काढणीहळद लागवडीच्या पद्धतीनुसार हळद काढणीची पद्धत...