परभणी जिल्ह्यात कापूस विक्रीच्या नोंदणीसाठी रविवारपर्यंत मुदत

परभणी : राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाच्या जिल्ह्यातील केंद्रांवर कापूस विक्रीसाठी शेतकऱ्यांना रविवार (ता.६) रात्री १२ वाजेपर्यंत नोंदणी करता येईल.
Deadline for registration of cotton sales in Parbhani district till Sunday
Deadline for registration of cotton sales in Parbhani district till Sunday

परभणी : ‘‘राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाच्या जिल्ह्यातील परभणी , पाथरी, सोनपेठ, गंगाखेड, पालम या पाच बाजार समित्यांच्या कार्यक्षेत्रातील केंद्रांवर कापूस विक्रीसाठी शेतकऱ्यांना रविवार (ता.६) रात्री १२ वाजेपर्यंत नोंदणी करता येईल. नोंदणीकृत शेतकऱ्यांचा कापूस खरेदी केला जाईल,’’ अशी माहिती जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांनी दिली.

सुरवसे म्हणाले, ‘‘www.parbhani.gov.in/cotton या संकेतस्थळावर नोंदणी करावी. व्यापाऱ्यांनी कापूस विक्री केल्याचे आढळून आल्यास त्याचे चुकारे  मिळणार नाहीत. संबंधितांवर फौजदारी गुन्हे नोंदविण्यात येतील. चांगल्या दर्चाचा कापूस कमी किमतीत व्यापाऱ्यांना विकू नये. शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यास आपला सातबारा देऊ नये. ‘सीसीआय’तर्फे जिल्ह्यातील जिंतूर, सेलू, मानवत, पूर्णा, ताडकळस या ठिकाणी कापूस खरेदी सुरु झाली आहे. ऑनलाइन नोंदणी केल्यानंतर प्राप्त क्रमांकानुसार एसएमएस पाठविण्यात येईल.’’ 

नोंदणीधारकास बाजार समित्यांनी टोकन दिल्यानंतर पणन महासंघातर्फे कापूस खरेदी केली जाईल. शेतकऱ्यांनी सोबत कापूस पेऱ्याची नोंद असलेला ७/१२, तसेच होल्डींग प्रमाणपत्राची अद्ययावत प्रत, जनधन खात्या व्यतिरिक्त अन्य आधार संलग्न राष्ट्रीयकृत बॅंकेच्या पासबुकच्या पहिल्या पानाची सुस्पष्ट छायांकित प्रत, आधारकार्ड यांच्या प्रत्येकी दोन प्रती आणाव्या. कागदपत्रसोबत कार्यरत मोबाईल क्रमांक नमुद करावा.  एसएमएस पाठविल्यापासून तीन दिवसांच्या आत खरेदी केंद्रावर कापूस विक्रीस आणणे बंधनकारक आहे.

ऑनलाइन नोंदणी न केलेल्या शेतकऱ्याचा कापूस कोणत्याही स्वरूपात स्वीकारला जाणार नाही. कोरोना विषाणुचा संसर्ग टाळण्यासाठी बाजार समितीच्या आवारात, खरेदी केंद्रांत अनावश्यक गर्दी टाळावी, असे आवाहन जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी केले.

उत्पादकांची माहिती नवीन अॅपमध्ये

पणन महासंघाच्या केंद्रांवर कापूस विक्रीसाठी नोंदणी केलेल्या सर्व शेतकऱ्यांची माहिती एक्सेल शीटमध्ये भरली जाणार आहे.त्यास शेतकऱ्याचा आयडी, नाव, जिल्हा, जिल्ह्याचा आयडी, मंडळ, मंडळाचा आयडी, गाव, गावाचा आयडी, सात बारा गट क्रमांक,  आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक, आयएफसी कोड, शेतकऱ्याचा मोबाईल क्रमांक, सात बारावरील क्षेत्र, शेतकऱ्याचे धारणा क्षेत्र, कपाशीचे क्षेत्र आदी माहिती भरण्यात येईल. ही माहिती नवीन अॅप मध्ये ट्रान्स्फर करण्यात येणार आहे, अशी माहिती विभागीय व्यवस्थापक ए. डी. रेणके यांनी दिली

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com