Agriculture news in Marathi, Deadline for registration of exportable grapes till November 1 | Agrowon

जालना : निर्यातक्षम द्राक्षांच्या नोंदणीसाठी ३० नोव्हेंबरपर्यंत मुदत

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 12 नोव्हेंबर 2019

जालना : निर्यातक्षम द्राक्ष बागांची नोंदणी करण्याकरिता ग्रेपनेट या ऑनलाइन कार्यप्रणालीची सुविधा १४ ऑक्‍टोबर २०१९ पासून ‘अपेडा’च्या वेबसाइटवर कार्यान्वित करण्यात आली आहे. ३० नोव्हेंबरपर्यंत द्राक्ष उत्पादकांना यासाठी नोंदणी करता येणार आहे. तर उशिरात उशिरा ३१ डिसेंबर २०१९ पर्यंत नोंदणी करता येणार असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली. 

जालना : निर्यातक्षम द्राक्ष बागांची नोंदणी करण्याकरिता ग्रेपनेट या ऑनलाइन कार्यप्रणालीची सुविधा १४ ऑक्‍टोबर २०१९ पासून ‘अपेडा’च्या वेबसाइटवर कार्यान्वित करण्यात आली आहे. ३० नोव्हेंबरपर्यंत द्राक्ष उत्पादकांना यासाठी नोंदणी करता येणार आहे. तर उशिरात उशिरा ३१ डिसेंबर २०१९ पर्यंत नोंदणी करता येणार असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली. 

युरोपियन युनियन तसेच रशिया, चीन, हाँगकाँग, मलेशिया, दुबई व इतर देशांना द्राक्ष निर्यातीकरिता ‘ग्रेपनेट’द्‌वारे बागांची नोंदणी आवश्‍यक आहे. ३० नोव्हेंबरपूर्वी संबंधित तालुक्‍याचे तालुका कृषी अधिकारी त्यासाठी अर्ज करता येईल. मागील वर्षापासून ऑनलाइन द्राक्षबागांची नोंदणी करण्याकरिता अपेडा फार्मरकनेक्‍ट मोबाईल ॲपच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. 

यंदापासून ग्रेपनेट ही ऑनलाइन कार्यप्रणाली राज्यातील ३४ जिल्ह्यांसाठी कार्यान्वित केली आहे. निर्यातक्षम बागांची नोंदणी, नूतनीकरण करण्यासाठी शेतकऱ्यांनी विविध प्रपत्र-१ मध्ये अर्ज व अर्जासोबत सातबाराची प्रत व बागेचा नकाशा व ५० रुपये शुल्क अर्ज संबंधित कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक, कृषी अधिकारी किंवा संबंधित तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे करावा. 

नोंदणी केल्यानंतर ती झाल्याचा संदेश शेतकऱ्यांच्या मोबाईलवर पाठविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. चालू वर्षापासून बाहेरील देशाबरोबरच स्थानिक बाजारपेठेमध्ये ग्राहकांना कीडनाशक उर्वरित अंश मुक्‍त द्राक्ष उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून ९० हजार द्राक्ष बागांची नोंदणी करण्याचे उद्दिष्ट निर्धारीत करण्यात आले आहे. त्यासाठी द्राक्ष बागायतदारांसाठी प्रशिक्षणाचीही सोय करण्यात आली आहे. 

यामध्ये राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ, कृषी विभागाचे अधिकारी व इतर तज्ज्ञांमार्फत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. जालना जिल्ह्यातील कडवंचीसह इतर गावांमधील शेतकऱ्यांना याविषयी अवगत करण्यात आले असल्याची माहिती आत्माचे दत्तात्रय सूर्यवंशी यांनी दिली. जिल्ह्यात १४ ऑक्‍टोबरपासून आजपर्यंत एकही नोंदणी झाली नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.


इतर ताज्या घडामोडी
मधमाशीला हानिकारक कीटकनाशके टाळा : आर....‌अंबाजोगाई : ‘‘शेतकऱ्यांनी मधमाश्यांच्या जाती...
परभणी जिल्ह्यात साडेसहा हजारांवर...परभणी : जिल्ह्यात यंदाच्या रब्बी हंगामात...
सोलापूर : कांदा लिलाव बंद पाडण्याचा डाव...सोलापूर : सोलापूर बाजार समितीमध्ये गेल्या काही...
कोल्हापूर : शेती, घरांच्या नुकसानीसाठी...कोल्हापूर : जिल्ह्यातील अतिवृष्टी आणि...
विज्ञान, अध्यात्माच्या ताकदीने देश विश्...कुंडल, जि. सांगली :  ज्ञान, विज्ञान, संगणक व...
संत्र्याचे विपणनाचे जाळे विणण्याची गरज...अमरावती  ः सांघिक तत्त्वावर संत्रा...
फडणवीसांविरोधात पक्षांतर्गत नाराजांची...मुंबई ः भाजपवर विरोधी पक्षात बसण्याची नामुष्की...
कृषी पदवीधर तरूणांनी समाजासाठी काम...नगर : ‘‘देशात प्रामाणिकपणे काम केलेले अनेक शेतकरी...
फडणवीस सरकारची ३१० कोटींची हमी रद्द...मुंबई ः शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्र...
आचारसंहितेपूर्वीच्या निर्णयांची...मुंबई ः विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू...
पुणे जिल्ह्यात भातकाढणी अंतिम टप्प्यातपुणे ः पावसाने उघडीप दिल्यानंतर शेतकऱ्यांनी...
पश्‍चिम महाराष्ट्रात...पुणे ः पश्‍चिम महाराष्ट्रातील अतिवृष्टी आणि...
सातारा जिल्ह्यातील सर्व शेतकरी संघटना...कऱ्हाड, जि. सातारा ः राजकीय पक्षांचा आदर्श घेऊन...
नगर जिल्ह्यात रोजगार हमीच्या कामावर सात...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये आता रोजगार हमी योजनेच्या...
चंद्रशेखर भडसावळे यांना मार्टचा ‘फादर...खडकवासला, जि. पुणे : कृषी पर्यटन संकल्पनेचे...
देशी कापूस संशोधन केंद्राचा उद्या...परभणी: वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाच्या...
गांडूळखत अर्क निर्मितीसेंद्रिय शेतीमध्ये गांडुळे व गाडूळखताचे मोठे...
राज्यात काकडीला ५०० ते २००० रुपये दरअकोला येथील बाजारात गुरुवारी (ता. ५) काकडीची...
मंत्रिमंडळाचा विस्तार २१ डिसेंबरनंतरचमुंबई : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार २१...
केंद्राने कांदा साठवणूक मर्यादा ५०...नाशिक : गेल्या सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस...