Agriculture news in Marathi Deadline for registration of sale of cotton in Akola till Tuesday | Agrowon

अकोल्यात कापूस विक्री नोंदणीसाठी मंगळवारपर्यंत मुदत

टीम अॅग्रोवन
शनिवार, 23 मे 2020

अकोला : सध्या सुरू असलेल्या कापूस खरेदीचा वेग वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू असून हजारो शेतकऱ्यांकडे कापूस पडून आहे. अनेकांची नोंदणी व्हायची आहे. आता नोंदणी राहलेल्या शेतकऱ्यांना मंगळवार (ता. २६) पर्यंत मुदत देण्यात आली आहे.

अकोला : सध्या सुरू असलेल्या कापूस खरेदीचा वेग वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू असून हजारो शेतकऱ्यांकडे कापूस पडून आहे. अनेकांची नोंदणी व्हायची आहे. आता नोंदणी राहलेल्या शेतकऱ्यांना मंगळवार (ता. २६) पर्यंत मुदत देण्यात आली आहे.

अकोला जिल्ह्यात कापूस उत्पादक शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात कापूस शिल्लक आहे. तो कापूस शासनाने खरेदी करावा म्हणून शेतकरी, संघटना, लोकप्रतिनिधींनी शासनाकडे दबाव वाढवलेला आहे. शुक्रवारी (ता. २२) शेतकरी संघटनेने कापूस जाळा आंदोलनही केले. अशा स्थितीत शासनाने सीसीआयच्या केंद्रावर खरेदीला वेग देण्याचे जाहीर केले आहे. बाजार समितीतर्फे कापूस खरेदीसाठी वेळ निश्चित करून देण्यात आली आहे.

जिल्हा उपनिबंधकांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारपर्यंत शेतकऱ्यांना त्यांच्याकडील कापूस विक्रीसाठी नोंदणी करता येणार आहे. आगामी महिन्यात पाऊस सुरू होण्यापूर्वी कापूस खरेदीची प्रक्रिया करण्यासाठी प्रशासनाकडून कापूस पणन महासंघ व सीसीआय यांना वेळोवेळी सूचित करण्यात आले आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांकडे अजून कापूस विक्रीसाठी शिल्लक आहे, त्या शेतकऱ्यांनी २६ मेपर्यंत नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक डॉ. प्रवीण लोखंडे यांनी केले आहे.

जिल्ह्यात ९.८४ लाख क्विंटल कापसाची खरेदी
जिल्ह्यात या हंगामात सुरू असलेली कापूस खरेदी अद्यापही सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार आत्तापर्यंत ३२ हजार ५०० शेतकऱ्यांकडील ९ लाख ८४ हजार क्विंटल कापूस खरेदी झालेला आहे. कापूस खरेदीसाठी शेतकऱ्यांकडून जिल्ह्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये नोंदणी केली जात आहे. जिल्ह्यात कापूस पणन महासंघाकडून आजपर्यंत एकूण ४३३८ शेतकऱ्यांचा १ लाख २१ हजार ९८५ क्विंटल कापूस खरेदी झाला. तर सीसीआयने २८ हजार १९९ शेतकऱ्यांचा ८ लाख ६० हजार १६८ क्विंटल कापूस खरेदी केला. अद्यापही काही शेतकऱ्यांकडे कापूस विक्री व्हायचा आहे. या शेतकऱ्यांकडील कापूस खरेदी करण्यासाठी २६ मे पर्यंत नोंदणीची मुदत देण्यात आली आहे.

बार्शीटाकळी येथील केंद्र होणार २९ मे रोजी बंद
सीसीआयचे बार्शीटाकळी येथे कापूस खरेदी केंद्र आहे. या केंद्रावर ज्या शेतकऱ्यांनी कापूस खरेदीकरिता नोंदणी केली त्यांचा कापूस खरेदी करणे बाकी आहे. त्या शेतकऱ्यांना शुक्रवारी (ता. २९) सायंकाळी पाच वाजेपर्यंत विक्री करता येणार आहे. त्यानंतर बार्शीटाकळी येथील कापूस खरेदी केंद्र बंद करण्यात येणार आहे. संबंधित शेतकऱ्यांनी दिलेल्या दिवशी कापूस विक्रीसाठी केंद्रावर आणावा, असे आवाहन करण्यात आले आहे.


इतर बातम्या
'दोन वर्षांपर्यंतचे शेतकऱ्यांचे...नगर, : कोरोनामुळे सर्वच क्षेत्रांत गंभीर...
पिचकारी मारणाऱ्यांवर आता दंडात्मक...नगर : सार्वजनिक ठिकाणी पिचकारी मारणाऱ्यांवर...
नगर झेडपीची पहिल्यांदाच झाली लेखी...नगर : कोरोनामुळे लॉकडाउन असल्याने जिल्हा...
शेतकऱ्यांची अडवणूक झाली, तर...नगर : ‘‘शेतकऱ्यांसाठी काम करणे याला आपण सर्वांनी...
अतिवृष्टी आणि अतिक्रमणामुळेच पूरस्थिती...मुंबई : अतिवृष्टी आणि अतिक्रमणामुळेच...
शेतमालाचे ऑनलाइन तारण कर्ज होणार उपलब्ध...मुंबई : टाळेबंदी कालावधीत शेतकऱ्यांना राज्य वखार...
टोळधाड निर्मूलनासाठी कृषी विभागाचा...नगर : महाराष्ट्रात चार दिवसांपूर्वी टोळधाड...
मॉन्सून अरबी समुद्रात; सोमवारपर्यंत...पुणे  : नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून)...
पुणे बाजार समितीत भाजीपाला, फळ विभाग...पुणे : कोरोनाचा प्रादुर्भाव बाजार समितीलगतच्या...
उद्यापासून पूर्वमोसमी पावसाचा अंदाज;...पुणे : राज्यात अक्षरशः भाजून काढणाऱ्या उन्हापासून...
सहकाराच्या त्रिस्तरीय रचना मोडण्यास...पुणे : राज्यातील काही जिल्हा मध्यवर्ती सहकारी...
नाशिक बाजार समितीचे कामकाज आजपासून सुरूनाशिक : स्वच्छता व निर्जंतुकीकरण प्रक्रिया...
राज्यात ४० हजार टन दूध पावडर पडूनपुणे : राज्यात ४० हजार टन दूध पावडर (भुकटी) पडून...
टोळधाडीमुळे अवघे ५० हेक्‍टरचे नुकसान :...नागपूर: टोळधाडीचा धोका अमरावती विभागात टळला असला...
पीककर्जासाठी हेलपाटे, भ्रष्ट...संग्रामपूर, जि. बुलडाणा : वेळ सकाळी साधारण...
`गोकुळ' ची ४५ लाख लिटर दुधावर प्रक्रिया कोल्हापूर ः लॉकडाउनच्या काळात कोल्हापूर...
मागणीपेक्षाही एक लाख क्विंटल बियाणे...पुणे : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन असले...
जळगाव ‘झेडपी’चे कामकाज रुळावर जळगाव : जिल्हा परिषदेचे कामकाज रुळावर येत आहे....
जळगावात पीककर्जासाठी बॅंका पोटखराब...जळगाव : पीक किंवा शेती कर्ज देताना पोटखराब...
औरंगाबादमध्ये थेट फळे, भाजीपाला...औरंगाबाद : जिल्ह्यातील शेतकरी, शेतकरी गट, शेतकरी...