पीकविमा प्रस्ताव सादर करण्यासाठी ३१ जुलैपर्यंत अंतिम मुदत

परभणी : ‘‘पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गंत जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी शुक्रवार (ता. १०) पर्यंत ६० हजार ३१ प्रस्ताव सादर केले आहेत. २९ हजार ५६२ हेक्टरवरील पिके संरक्षित केली आहेत.
 Deadline for submission of crop insurance proposal till 31st July
Deadline for submission of crop insurance proposal till 31st July

परभणी : ‘‘पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गंत जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी शुक्रवार (ता. १०) पर्यंत ६० हजार ३१ प्रस्ताव सादर केले आहेत. २९ हजार ५६२ हेक्टरवरील पिके संरक्षित केली आहेत. इच्छूक शेतकऱ्यांनी शुक्रवार (ता.३१) पर्यंत ऑनलाइन विमा प्रस्ताव सादर करावे’’, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकरी संतोष आळसे यांनी केले.

पंतप्रधान पीकविमा योजना यंदा जिल्ह्यातील सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडिद, ज्वारी, बाजरी या सात पिकांना लागू आहे. इच्छूक शेतकऱ्यांना जनसुविधा केंद्र (सामाईक सुविधा केंद्र) मार्फत ऑनलाइन पध्दतीने भरावे लागणार आहेत. त्यासाठी केंद्र चालकास कोणत्याही प्रकारचे शुल्क देण्याची गरज नाही.

पीक विमा प्रस्तावासाठी विहीत नमुन्यातील अर्ज, आधारकार्ड, सातबारा उतारा, अधिसूचित पिकांचे पेरणी केलेले स्वयंघोषणापत्र, भाडेपट्टा करार असलेल्या शेतकऱ्यांचा करारनामा किंवा संमतीपत्र, बँक पासबुकाची प्रत ही कागदपत्रे असणे आवश्यक आहे. 

पीक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत नैसर्गिक आग, विज कोसळणे, गारपीट, वादळ, चक्रीवादळ, पूर, क्षेत्र जोखीमींमुळे पिकांच्या उत्पन्नात येणाऱ्या घटीपासून ७० टक्के जोखीमस्तर निश्‍चित आहे. जिल्ह्यात खरीप, रब्बी हंगामासाठी पीकविमा योजना तीन वर्षांसाठी रिलायंन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडकडून राबविण्यात येणार आहे, असे आळसे, तंत्राधिकारी (सांख्यकी) एम. बी. लोंढे यांनी सांगितले.

पिकनिहाय हेक्टरी स्थिती

पीक विमा संरक्षित रक्कम शेतकरी हिश्‍याचा हप्ता
सोयाबीन ४५००० ९००
कापूस ४५०००  २२५०
तूर ३५०००  ७००
मूग २००००  ४००
उडीद २००००  ४००
ज्वारी   २५००० ५००
बाजरी २२०००  ४४०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com