नावातील त्रुटी दुरुस्तीसाठी रविवारपर्यंत मुदतवाढ

Deadline to Sunday to correct the error in the name
Deadline to Sunday to correct the error in the name

वाशीम : पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या तीन टप्प्यांतील मदतीचे वितरण नोव्हेंबरपासून त्यांच्या आधारकार्डसंबंधी माहितीद्वारे होणार आहे. त्यामुळे शेतकरी लाभार्थ्यांचे योजनेसाठी देण्यात आलेले नाव आणि त्यांच्या आधार कार्डवरील नाव तंतोतंत जुळणे आवश्यक आहे. जिल्ह्यात ९७ हजार शेतकऱ्यांच्या आधार कार्डवरील नाव आणि योजनेसाठी दिलेले नाव यामध्ये त्रुटी आढळून आल्या. या त्रुटींची दुरुस्ती करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने रविवार (ता. १५) पर्यंत मुदतवाढ केली आहे. 

जिल्ह्यात मोहीम सुरू केल्यापासून सुमारे ३५ हजार शेतकऱ्यांच्या नावातील त्रुटी दूर करण्यात आल्या. उर्वरित ६२ हजार शेतकऱ्यांच्या नावातील त्रुटी दूर करण्यासाठी विशेष मोहिमेला १५ डिसेंबरपर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात आली आहे. नोव्हेंबरपासून पंतप्रधान शेतकरी सन्मान निधीचे सर्व हप्ते आधारसंबंधित माहितीच्या आधारे शेतकऱ्यांना वितरित केले जाणार आहेत. त्यामुळे योजनेसाठी दिलेले नाव आणि आधार कार्डवरील नाव, नावाचा क्रम, स्पेलिंग तंतोतंत जुळणे आवश्यक आहे. 

तसेच नाव, वडिलांचे नाव व आडनाव यामधील पहिली अक्षरे कॅपिटल असणे गरजेचे आहे. ज्या शेतकऱ्यांच्या नावामध्ये त्रुटी आहेत, अशा शेतकऱ्यांची गावनिहाय यादी संबंधित गावांमध्ये तलाठ्यामार्फत दर्शनी भागात लावण्यात आली आहे. ज्यांनी अद्याप आपल्या माहितीमधील त्रुटी दूर केलेल्या नाहीत, अशा शेतकऱ्यांनी १५ डिसेंबरपर्यंत नजीकच्या कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये जाऊन अथवा स्वतः https://www.pmkisan.gov.in/UpdateAadharNoByFarmer.aspx या लिंकचा वापर करून आपल्या आधारविषयक माहितीमधील त्रुटी दुरुस्त करणे आवश्‍यक आहे.

अशा पद्धतीने करता येते दुरुस्ती शेतकऱ्यांना त्रुटी कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) मधून दुरुस्त केल्या जाऊ शकतात. तसेच स्वत: शेतकरीसुद्धा कोणत्याही अँड्रॉइड मोबाईलचा वापर करून दुरुती करू शकतो. त्यासाठी https://www.pmkisan.gov.in/UpdateAadharNoByFarmer.aspx या लिंकवर जाऊन माहिती दुरुस्त करावी. याशिवाय पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेच्या pmkisan.gov.in या संकेतस्थळावर जाऊन होम स्क्रीनवरील हिरव्या पट्टीमधील डावीकडून क्रमांक आठवर ‘फार्मर कॉर्नर’ची (Farmer Corner) सुविधा देण्यात आली आहे. या ‘फार्मर कॉर्नर’वर जाऊन त्यामधील ‘एडिट आधार फेल्युअर रेकॉर्डस’ (Edit Aadhar Failure Records) या पर्यायामध्ये जाऊन संबंधित लाभार्थ्याला आपला आधार क्रमांक टाकता येईल. आधार क्रमांक टाकल्यानंतर आधार क्रमांकाशी संलग्न नाव दुरुस्त करण्यासाठी उजव्या बाजूचे एडिट (Edit) बटण दाबून आधार कार्डावर नमूद नावाप्रमाणेच नाव टाकून उजव्या बाजूचे ‘अपडेट’ (Update) हे बटण दाबावे. ‘फार्मर नेम’ (Farmer Name) टाइप करताना आधार कार्डावर ज्याप्रमाणे नाव टाकलेले आहे, त्याच क्रमाने नाव टाइप करणे अपेक्षित आहे. नाव टाइप करताना स्वत:चे, वडिलाचे व आडनावाचे पहिले अक्षर हे मोठे (Capital) असावे. इतर अक्षरे लहान (Small) असावीत. नावाच्या स्पेलिंगमध्ये दुरुस्ती असल्यास आधार कार्डवरील नावाप्रमाणे त्याची अचूक दुरुस्ती करावी. उजव्या हातावरील निळ्या रंगाचे ‘अपडेट’ (Update) बटण दाबावे. त्यानंतर ‘रेकॉर्ड अपडेट सक्सेसफुली’ (Records Update Successfully) असा संदेश आल्यास आधार कार्डविषयी त्रुटी दुरुस्त झाली असे समजावे. ज्या व्यक्तीच्या आधारविषयी काहीच त्रुटी नाहीत, अशा व्यक्तीने त्यांचा आधार क्रमांक टाकल्यास ‘रेकॉर्ड नॉट फाउंड’ (Records Not Found) असा संदेश येईल. यावरून संबंधित व्यक्तीच्या आधार कार्डाविषयी कोणतीही दुरुस्ती नाही अथवा नव्हती असे समजावे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com