कोल्हापूर : गार्डन्स क्लब आणि कोल्हापूर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ४९
ताज्या घडामोडी
आपत्तीचा सामना सकारात्मकतेने करा ः भावेश भाटिया
नाशिक : ‘‘मुश्किलो से भाग जाना आसाँ होता है, हर लम्हा एक नया इम्तेहाँ होता है, डर कर जीने वालो को कुछ नही मिलता, जिंदगीमे जो लडकर जीते है, उन के कदमो मे जहाँ होता है’’ अशा प्रेरक शब्दात अंध उद्योजक भावेश भाटिया यांनी आपले विचार मांडले. आपत्तीचा सामना सकारात्मकतेने करा आणि शेतकऱ्यांना धीराने सामोरे जाण्याचे आवाहन केले.
नाशिक : ‘‘मुश्किलो से भाग जाना आसाँ होता है, हर लम्हा एक नया इम्तेहाँ होता है, डर कर जीने वालो को कुछ नही मिलता, जिंदगीमे जो लडकर जीते है, उन के कदमो मे जहाँ होता है’’ अशा प्रेरक शब्दात अंध उद्योजक भावेश भाटिया यांनी आपले विचार मांडले. आपत्तीचा सामना सकारात्मकतेने करा आणि शेतकऱ्यांना धीराने सामोरे जाण्याचे आवाहन केले.
सह्याद्री फार्म्स येथे शनिवारी (ता. १६) शेतकऱ्यांना नव्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी ‘उमेद जागवू या’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात उद्योजक श्री. भाटीया यांच्यासह राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे खजिनदार कैलास भोसले, विभागीय अध्यक्ष रवींद्र बोराडे, सचिव अरुण मोरे, सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचे अध्यक्ष विलास शिंदे, बँक ऑफ महाराष्ट्रचे मुख्य व्यवस्थापक जी. एम. श्रीधर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजीव पडवळ यांनी मार्गदर्शन केले.
जी. एम. श्रीधर म्हणाले, की अडचणीच्या काळात शेतकऱ्यांसाठी पीककर्जाचे पुनर्गठन करण्यासंदर्भात बँक ऑफ महाराष्ट्रकडून प्रस्ताव तयार केला जाणार आहे. हा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला जाईल.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजीव पडवळ म्हणाले, की सलग महिनाभराच्या पावसाने नाशिक जिल्ह्यातील ६ लाख ३० हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. याबाबतचा अहवाल शासनाला सादर करण्यात आला आहे. या बाबत येत्या काही दिवसांत निर्णय होण्याची शक्यता आहे. सध्या राष्ट्रपती राजवट लागू असली तरी त्यामुळे शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
तांत्रिक सत्रात मंगेश भास्कर यांनी आपत्तीनंतर द्राक्षपिकावरील विविध उपाययोजने विषयी मार्गदर्शन केले. सुरेश नखाते यांनी सूत्रसंचालन केले. विलास शिंदे यांनी आभार मानले.
एकत्रित ताकदीनेच आव्हानांवर मात शक्य
‘द्राक्षबागांपुढील आव्हाने’ या परिसंवादात द्राक्षपिकाची सद्य:स्थिती व पुढील उपाययोजना याबाबत आढावा घेण्यात आला. विलास शिंदे म्हणाले, की आपत्तीला सामोरे जाण्यासाठी बदलत्या वातावरणाला अधिक सक्षम नवीन वाणांच्या लागवडीकडे वळणे गरजेचे आहे. सक्षम यंत्रणा उभ्या राहण्यासाठी शेतकऱ्यांची एकत्रित ताकद उभी राहणे आवश्यक आहे. कैलास भोसले यांनी द्राक्षशेती संदर्भातील शासनाच्या धोरणात आमूलाग्र बदल करण्याचा सूर कार्यक्रमात उमटला.