agriculture news in Marathi, deary industry help to flood affected people, Maharashtra | Agrowon

डेअरी उद्योगाकडून पूरग्रस्तांना मदत

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 10 सप्टेंबर 2019

पुणे : कोट्यवधीचे अनुदान अडकल्यामुळे अडचणीत असलेल्या राज्याच्या दूध उद्योगाने संकटातही सामाजिक बांधीलकी सोडली नाही. पूरग्रस्तांसाठी तब्बल दीड कोटी रुपयांचा निधी डेअरी उद्योगाने दिला आहे.
 
राज्याच्या एका भागात चारापाणी टंचाई, तर दुसऱ्या भागाला पुराचा झटका बसलेला आहे. त्यात पुन्हा दुधाचे २५० कोटींचे अनुदान राज्य शासनाकडे अडकून पडले आहे. अशा स्थितीतदेखील पूरग्रस्तांसाठी मदत करण्याचा निर्णय डेअरी उद्योगाने घेतला. 

पुणे : कोट्यवधीचे अनुदान अडकल्यामुळे अडचणीत असलेल्या राज्याच्या दूध उद्योगाने संकटातही सामाजिक बांधीलकी सोडली नाही. पूरग्रस्तांसाठी तब्बल दीड कोटी रुपयांचा निधी डेअरी उद्योगाने दिला आहे.
 
राज्याच्या एका भागात चारापाणी टंचाई, तर दुसऱ्या भागाला पुराचा झटका बसलेला आहे. त्यात पुन्हा दुधाचे २५० कोटींचे अनुदान राज्य शासनाकडे अडकून पडले आहे. अशा स्थितीतदेखील पूरग्रस्तांसाठी मदत करण्याचा निर्णय डेअरी उद्योगाने घेतला. 

“आर्थिक अडचण असली तरी अजून त्रास सहन करावा; मात्र, मुख्यमंत्री निधीसाठी भरीव निधी गोळा झाला पाहिजे, असा निर्णय राज्यातील खासगी व सहकारी डेअरी संघांनी घेतला होता. त्यानुसार एक कोटी रुपयांचा निधी जमा झाला,” अशी माहिती सूत्रांनी दिली. 

दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघाचे खजिनदार डॉ. विवेक क्षीरसागर म्हणाले की, “राज्यातील सर्व डेअरी युनिटच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एक कोटीचा निधी सुपूर्त करण्यात आला. या निधीचा वापर सांगली, कोल्हापूर भागातील पूरग्रस्तांसाठी केला जाणार आहे.”

संघाचे उपाध्यक्ष गोपाळराव म्हस्के, कात्रज संघाचे अध्यक्ष विष्णूकाका हिंगे, सोनई दूध उद्योग समुहाचे अध्यक्ष दशरथदादा माने तसेच ऊर्जा डेअरीचे प्रकाश कुतवळ, पराग डेअरीचे संजय मिश्रा, चितळे उद्योगचे श्रीपाद चितळे, कन्हैया दूधचे मच्छिंद्र लंके तसेच इतर पदाधिकारी या वेळी उपस्थित होते. 

दरम्यान, चितळे डेअरी उद्योग समूहाने अजून एक पाऊल पुढे टाकून ५१ लाखांचा निधी पूरग्रस्तांसाठी दिला. संचालक श्रीपाद चितळे व संजय चितळे यांनी मुख्यमंत्र्यांकडे निधी दिला. 

या निधीसाठी भिलवडी स्टेशनमधील बी. जी. चितळे उद्योगाकडून २६ लाख रुपये, तर पुण्यातील चितळे बंधू मिठाईवाले यांच्याकडून २५ लाख रुपये देण्यात आले. 

चितळे डेअरी उद्योग समूहाचे संचालक श्रीपाद चितळे याबाबत म्हणाले की, “राज्यातील लाखो शेतकऱ्यांना दुधाच्या जोडधंद्याने सावरले आहे. महापुरामुळे सांगली व कोल्हापूर भागातील दूध उत्पादक शेतकरी उद्‌ध्वस्त झाले आहेत. या शेतकऱ्यांचे संसार पुन्हा उभे करावे लागतील. शासनाच्या प्रयत्नांना आपली देखील साथ असावी म्हणून आम्ही स्वतः पूरग्रस्त पशुपालकांचे व्यवसाय उभे करण्यासाठी स्वतंत्र अभियान हाती घेतले आहे. त्याअंतर्गत हजारो शेतकऱ्यांना दुभत्या जनावरांचे वाटप केले जात आहे.” 


इतर अॅग्रो विशेष
द्राक्ष पीककर्ज कर्जमाफीत बसेना आणि...नाशिक : द्राक्षासाठी घेतलेले पीककर्ज  ...
कर्जमाफीसाठी दीड हजार कोटीमुंबई: महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
जैविक खतांचा वापर सक्तीचा होणार पुणे: युरिया विकत घेताना जैविक खते देखील विकत...
राज्यातील पंधरा जिल्हा बँकांना ...लातूर ः राज्यातील अनेक जिल्हा मध्यवर्ती सहकारी...
राज्यात पावसाची रिपरिप सुरुच पुणे ः कोकण व मध्य महाराष्ट्रात रिमझिम असून...
निकृष्ट बियाणेप्रकरणी ४० न्यायालयीन खटलेवाशीम ः यंदाच्या हंगामात निकृष्ट बियाण्यामुळे...
चांदोली धरणग्रस्त विस्थापीतांनी केली २५...मांगले, जि. सांगली ः  चांदोली धरणग्रस्तामधील...
लोकसहभागातून शेती अन् ग्रामविकासाला...उंबरीवाडी (ता.जावली,जि.सातारा) हे लहानसे गाव....
जलसंधारण मोहिमेतून पाणी टंचाईवर मातआजही माण, खटाव हे  दुष्काळी तालुका म्हणून...
पावसाचा जोर कायम राहणार पुणे: गुजरातच्या दक्षिण भागात चक्राकार...
कृषी अधीक्षक, उपसंचालकांच्या बदल्यापुणे : कोविड १९ रोगाच्या पार्श्वभूमीवर कार्यरत...
मका विक्रीचे चुकारे ४० दिवसांनंतरही थकितजळगाव ः जिल्ह्यातील सुमारे साडेतीन हजार मका...
कोकणात मुसळधारेचा अंदाजपुणे ः  उत्तर प्रदेशचा नैऋत्य भाग ते...
राज्यात सर्वदूर हलका पाऊसपुणे ः राज्यातील बहुतांशी भागात हलका ते मध्यम...
सोयाबीनचे एकरी ५१.७७ क्विंटल उच्चांकी...जॉर्जिया येथील व्होलदोस्ता प्रांतामधील रॅंडी...
शेतकऱ्यांचे वनौषधी अनुदान पुन्हा रखडलेपुणे: राज्यात वनौषधी उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांचे...
दुर्गम शेतकऱ्यांसाठी जलकुंडे ठरली वरदानठाणे जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील दुर्गम...
बाजार समिती कर्मचाऱ्यांना शासन सेवेत...यावल, जि. जळगाव: केंद्राने ‘एक देश एक बाजार समिती...
‘एचटीबीटी’मुळे कपाशीतील आंतरपिके...पुणे : काळ्याबाजारातून आलेल्या तणनाशक सहनशील (...
केळी पिकात तयार केली ओळखमोहित्यांचे वडगाव (ता. कडेगाव,जि.सांगली) येथील...